Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४

राजकीय फायद्यासाठी झालेल्या लग्न, लग्नानंतर उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

" अलगत फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४"

यशवंतराव आणि प्रतापराव यांची ठरल्याप्रमाणे भेट होते. सुरवातीला व्यवसाय, राजकारणा आणि इतर औपचारिक गप्पा होतात. पण यशवंतरावांच्या मनात वेगळेच होते. योग्य क्षणाची वाट पाहून यशवंतराव प्रतापरावांना बोलतात, "प्रतापराव मला आपली मैत्रीला पुढे न्यायच आहे, तिला नात्यात बदलायच आहे."

प्रतापराव क्षणभर थबकतात.

"माफ करा यशवंतराव मला समजले नाही, तुम्हाला नेमके काय बोलायचे आहे?" प्रतापराव थोड गोंधळून बोलतात.

"प्रतापराव, तुमच्या मुलीसाठी मी माझा पुतण्या अभिमन्यूचा विचार करत आहे! अभिमन्यू आणि तुमच्या मुलीचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे." यशवंतराव बोलतात.

"ही तर फार चांगली कल्पना आहे यशवंतराव, परंतु आबासाहेब आणि इतर तुमच्या घरातील सदस्यांचे काय म्हणणे आहे." प्रतापराव आनंदी होऊन बोलतात.

"प्रतापराव मी घरातील सगळ्या सोबत बोलल्यानंतरच तुमच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला आहे, तुम्ही फक्त आता तुमच्या घरात बोला. आणि एवढेच नाही बरका प्रतापराव, सरकारने आपल्या जिल्ह्यासाठी नवीन घोषित केलेला पाचशे कोटींचा धरण पुनर्विकास प्रकल्प याचे टेंडर तुमच्या कंट्रस्शन कंपनीला मिळावे, यासाठी मी पुढाकार घेईल." असे यशवंतराव बोलतात.

हा प्रस्ताव केवळ लग्नाचा नसून सत्तेचा, पैशाच्या व्यवहाराचा होता. पैशाचे, सत्तेचे आमिष दाखवून लग्न जुळवायचे होते.

वैदही आणि सरस्वतीताई यांची मोर्चाची तयारी चाललेली असते. आखणी, घोषणा, मोर्चाची दिशा या सगळ्या बाबींचे नियोजन चालू होते. सरस्वतीताई यांनी मोर्चाची जबाबदारी आणि नेतृत्व वैदहीकडे सोपवले असते. वैदहीने मोर्चाची पूर्ण आखणी केलेली असते.

"ताई आपण तीन दिवसांनी मोर्चा घेऊन जाऊ. मोर्चा एकदम शिस्तबद्ध असेल. आपण कुठलही गोंधळ, आरडाओरडा नाही करायचा. एकदम शांतपणे आपल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यापुढे मांडायचा." वैदही बोलते.

"मोर्चा कुठून नेणार आहे? कसा नेणार आहे? मोर्चाचा मार्ग ठरला आहे का?" सरस्वतीताई विचारतात.

"हो ताई, त्या सर्व गोष्टी ठरल्या आहेत. फक्त पोलिसांची परवानगी बाकी आहे." वैदही बोलते.

"पोलिसाची परवानगी सुद्धा तुलाच घ्यायची आहे. तस मी बोलेल कमिश्नर साहेबांशी परंतु त्यांच्याकडे परवानगी घ्यायला मात्र तू जायचं." सरस्वतीताई वैदहीला सांगतात.

"ताई तुम्ही तर संपूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकली, तुम्ही काहीच नाही बघणार का? मला जमेल का हे सर्व? माझी पहिलेच वेळ अशी मोर्चा वैगेरे करायची." वैदही थोडस दडपणाखाली बोलते.

"वैदही का जमणार नाही तुला? तू नक्कीच करशील मला खात्री आहे आणि खरं सांगू वैदही मी आता थकले आहे. ज्यावेळेस अभिमन्यू आपल्या आश्रमात येत होता त्यावेळी मला कशातही लक्ष द्यायला लागायचं नाही." सरस्वतीताई बोलतात.

"ताई, मी नेहमी तुमच्या बोलण्यात अभिमन्यूच नाव ऐकले आहे. हा अभिमन्यू म्हणजे आबासाहेबांचाच मुलगाना? वैदही सरस्वतीताईंना विचारते.

"हो, आबासाहेब पाटील यांचाच मुलगा. वैदही मी लग्न नाही केले, मला मुलगा नाही पण मी नेहमी अभिमन्यूमध्ये माझा मुलगा बघत आले. मला जर मुलगा असता तर अभिमन्यू सारखाच." सरस्वतीताई थोड्या हळव्या होऊन बोलतात.

"पण ताई मी आश्रमात आल्यापासून त्याला कधीच तुमच्या बरोबर बघितले नाही." वैदही बोलते.

"मला माहितच नाहीये अभिमन्यू कुठे आहे!" सरस्वतीताई थोड निराशेने बोलतात.

"मग तुम्ही माहित का काढली नाही? तो कुठे आहे? काय करतोय?" वैदही विचारते.

"खूप प्रयत्न केला, पण काहीच माहिती मिळाली नाही. आबासाहेब म्हणाले की अभिमन्यू परदेशात आहे पण परदेशात कुठे हे कधीच सांगितले नाही आणि त्याचा काही कॉन्टक पण नाही दिला. मी बऱ्याचदा विचारले त्यांना पण त्यांनी नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली." सरस्वतीताई बोलतात.

"मला एक कळत नाहीये आबासाहेबांनी अभिमन्यू बद्दल तुम्हांला काहीच का सांगतले नाही?" जर तो परदेशात असेल तर यात लपवण्यासारखे काय आहे? अभिमन्यू कुठे गेला आहे हे तर आबासाहेबांनी सांगायला हवे होते? वैदही शंकेने बोलते.

"तेच तर यात लपवण्यासारखे काहीच नाहीये! मला वेगळीच शंका येते त्याच्या बाबतीत काही चुकीच तर झाले नसेल?" असे बोलताना सरस्वतीताईच्या डोळ्यात पाणी येते.

वैदही स्वरस्वतीताईंना धीर देत बोलते, "ताई तुम्ही काळजी नका करू; मी शोधून काढेल अभिमन्यू कुठे ते. शब्द देते तुम्हांला."

आबासाहेबांच्या घरी यशवंतराव घरातील सर्वांना सांगतात की त्यांचे प्रतापराव देसाई यांच्या बरोबर अभिमन्यूसाठी त्यांच्या मुलीबद्दल चर्चा झाली आहे.

"मग काय म्हटले देसाई?" नर्मदा उत्साहाने विचारते.

"देसाई म्हटले, मी माझ्या घरातल्या सोबत बोलून सांगतो. आणि दादा, वहिनी मला खात्री आहे ते नाही म्हणणार नाही."
यशवंतराव बोलतात.

"त्यांच झाले रे, पण अभिच काय? आबासाहेब चिंतेने बोलतात.

"वहिनी अभिला तयार करण्याचं काम तुमचं आहे, तो तुमचंच ऐकेल." नर्मदा बोलते.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा आणि पुढे काय होईल? वैदेही मोर्चाचे नियोजन नीट करेल? सरस्वतीताईंना अभिमन्युबद्दल कळेल? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.

ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all