Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - १६

राजकीय फायद्याकरता झालेलं लग्न आणि लग्नानंतर उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग -१६"

शारदाने तिचे मत वैदहिला सांगीतलेले असते. एकंदरीत अभिमन्यूचा स्वभाव शारदाला कसा वाटला, त्याच्या बद्दलचा शारदाचा अनुभव शारदाने वैदहिला सांगितला. आता तिला वैदहीच्या उत्तराची प्रतीक्षा होती.

"आई, मलापण ते शांतच वाटले. आम्ही जेव्हा बोलत होतोना, तेव्हा त्यांनी मी बोलत असताना एकही शब्द मध्येच काढला नाही. मला टोकले नाही." वैदही बोलते.

"अरे बापरे! अरे वरून आहो वर गेलीकी तू. मुलगा आवडला वाटतं." शारदा हसून बोलते.

शारदा असे बोलल्यावर वैदही लाजून खाली बघते.

"अरे... अरे... मला तर माहितच नव्हते; माझ्या पोरीला लाजता पण येते." शारदा बोलते.

"आई..... वैदहीच्या तोंडून लाजत हे उद्गार निघतात.

"मला तुझे उत्तर समजले आहे. तरीपण ते तुझ्या तोंडून ऐकायला बर वाटेल. बोल तुझा निर्णय काय आहे?" शारदा बोलते.

"आई, अभिमन्यूंचा स्वभाव छान आहे. मला आवडला! मी तयार आहे, त्यांच्या सोबत लग्न करायला." वैदही बोलते.

"गुणाची माझी पोरगी! तुझा निर्णय ऐकून मला खूप भारी वाटत आहे. चल आपण खाली जाऊन बाबांना तुझा निर्णय सांगू." शारदा बोलते.

शारदा बोलल्यानंतर वैदही आणि शारदा दोघेही प्रतापरावांनाकडे जातात.

"अहो, ऐकले का! वैदहीचा निर्णय झाला आहे." शारदा बोलते.

"काय निर्णय घेतला आहे, वैदहिने?" प्रतापराव विचारतात?

"हो.... पसंत आहे वैदहिला मुलगा." शारदा खुश होऊन बोलते.

"काय सांगते!" वा!.... वा!... वा!... वैदही एकदम उत्तम निर्णय घेतला आहे. मला अभिमान वाटतो तुझा." प्रतापराव बोलतात.

प्रतापराव असे बोलल्यानंतर, वैदही, शारदा आणि प्रतापराव या दोघांच्याही पाया पडते.

"मला खात्री आहे वैदही, तू पाटलांच्या घरात एकदम सुखात राहशील. तुला कसलीही कमी तिथे भासणार नाही." प्रतापराव विश्वासाने बोलतात.

इकडे पाटलांच्या घरी, देवकी अभिमन्यूला समजवत असते.

"अभी जेवढा तू स्वतःला त्रास करून घेशील तेवढा तुला त्रास होईल. आरे, आयुष्याच्या या वळणावर आणि आयुष्यात इतक्या लवकर जर तू पूर्वीच्या घटनांना सोडू शकला नाही तर कसे चालेल." देवकी अभिमन्यूला बोलते.

"आई, मी नाही विसरू शकत त्या घटना! अभिमन्यू वेदनेने बोलते.

"मला माहित आहे तुला ते सगळे विसरणे कठीण आहे. पण बाळा तुला विसरावे लागेलच ना! संपूर्ण आयुष्य असेच काढणार आहे का!" देवकी काळजीने बोलते.

"आई, मला दुसरे काही सुचत नाही आणि खरं सांगू का त्यातून बाहेर यावे असे पण मला वाटत नाही." असे बोलून अभिमन्यू देवकीच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागतो.

अभिमन्यूला रडताना बघून देवकीच्या डोळ्यातही पाणी येते. पण स्वतःला देवकी सावरते कारण तिला अभिंमन्यूलाही सावरायचे होते. तिच्या डोळ्यात अश्रू बघितले तर अभिमन्यू अजून रडेल हेही देवकीला माहित होते. म्हणून स्वतःला सावरल्याशिवाय देवकी समोर दुसरा पर्याय नव्हता.

देवकी अभिमन्यूला सावरत बोलते, "एक सांगू अभी, का कोणास ठाऊक पण माझ्या मनाला वाटते, की ही वैदही तुझ्या भूतकाळातील सर्व घटनांवर पडदा टाकेल आणि तुझ्या आयुष्याला एक नवी दिशा देईन. बघ वैदही तुझ्या आयुष्यात सुखाचा अथांग सागर घेऊन येईल." देवकी आशेने बोलते.

देवकी, अभिमन्यूला समजवत असते. इकडे आबासाहेब आणि यशवंतराव यांच्या गप्पा चालू असतात तितक्यात प्रतापरावांचा कॉल यशवंतरावांना येतो.

"दादा, प्रतापरावांचा कॉल आहे." यशवंतराव, आबासाहेबांना बोलतात.

"बघ काय बोलतात?" आबासाहेब बोलतात.

"दादा, जर त्यांचा निर्णय झाला असेल तर आपण त्यांना काय सांगायचे?" यशवंतराव बोलतात.

तितक्यात देवकी तिथे येते. यशवंतराव व आबासाहेबांच्या बोलण्यात प्रतापरावांचा कॉलही कट झालेला असतो. प्रतापरावांना काय सांगायचे हा विचार आबासाहेब आणि यशवंतराव करत असतात.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा आणि पुढे काय होईल? प्रतापराव अभिमन्यू आणि वैदही यांच्या लग्नाला तयार होतील? आबासाहेब सरस्वतीताई बरोबर खोटे का बोलले असतील? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.

ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
0

🎭 Series Post

View all