दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ६"
वैदही आणि शारदाचे बोलणे झाल्यानंतर वैदहीने निर्णय घेण्यासाठी वेळ घेतलेला असतो. हा फक्त एक निर्णय नव्हता तर संपूर्ण आयुष्याचा प्रश्न होता. मनात विचारांचे वादळ होते त्यामुळे विचार करायला वेळ लागत होता.
इकडे देवकीला अभिमन्यूला तयार लग्नासाठी तयार करायचे असते पण त्याच्यासमोर विषय कसा काढायचा हे देवकीला कळत नव्हते. तरीपण देवकी अभिमन्यू सोबत बोलायला जाते.
"अभी, तुझ्यासोबत थोडं बोलायचं मला." देवकी बोलते. तिच्या बोलण्यात आईची माया आणि काळजी होती.
"हा बोलना आई." अभिमन्यू बोलतो.
"पण तू चिडचिड नाही करणार ना?" देवकी बोलते.
"आई, नाही करणार चिडचिड. तू बोल." अभिमन्यू बोलतो.
देवकी क्षणभर थांबून बोलते, "अभी, आम्ही तुझ्यासाठी एक पोरगी बघितली.....
देवकीचे बोलणे पूर्ण होऊन न देता , अभिमन्यू देवकीला थोडा चिडून बोलतो "आई, तू का हा विषय माझ्या पुढे काढते?"
"अरे अभी चिडू नको, मी एक काय बोलते ऐक तर." देवकी बोलते.
"आई, या विषयावर मला कोणाचेच काहीच ऐकायचे नाहीये." अभिमन्यू आता जरा जास्त चिडलेला असतो.
"अभी, इतके दिवस आम्ही तुझ्या मनासारखं केलं...
आता तरी आमचं ऐक... तुला असं नाही बघवत रे आम्हाला." देवकी अभिमन्यूला समजवण्याचा प्रयत्न करते.
आता तरी आमचं ऐक... तुला असं नाही बघवत रे आम्हाला." देवकी अभिमन्यूला समजवण्याचा प्रयत्न करते.
"आई, मला नाही बोलायचं या विषयावर काही. मला आहे असंच राहूद्या! नका मला त्रास देऊ!" अभिमन्यू वैतागून बोलतो.
देवकीचाही आता संयम सुटलेला असतो, ती चिडूनच बोलते.
"अच्छा, म्हणजे तुला तुझाच त्रास दिसतो तर, तुला असं बघून आम्हाला काय वाटत असेल याचा विचार केला कधी? आरे शंभर जण समोर बोलायला आली तरी तू त्यांना बोलून देत नसायचा. आरे तुझे आबा तुला "ढान्या वाघ" बोलायचे. विसरलास का हे सगळे?"
"अच्छा, म्हणजे तुला तुझाच त्रास दिसतो तर, तुला असं बघून आम्हाला काय वाटत असेल याचा विचार केला कधी? आरे शंभर जण समोर बोलायला आली तरी तू त्यांना बोलून देत नसायचा. आरे तुझे आबा तुला "ढान्या वाघ" बोलायचे. विसरलास का हे सगळे?"
"आई"....... एवढे बोलून अभिमन्यू परत शांत बसतो.
"अरे अभी तुला असं बघून आम्हाला किती त्रास होत असेल हे तुला नाही कळणार! झालं गेलं विसरून जा, आता त्यातून बाहेर पडायला नको का?" देवकी आता शांतपणे बोलते.
"आई, मला नाही लग्न करायचं." अभिमन्यू बोलतो.
"ठीक तर मग तुझा हाच अट्टहास असेल तर माझं पण ऐक, जोपर्यंत तू मुलगी बघायला तयार होत नाही तोपर्यंत मी अन्नपाणी काही घेणार नाही." असे चिडून बोलून देवकी तिथून निघून जाते.
आबासाहेब आणि यशवंतराव गप्पा मारत बसलेले असतात. त्यांच्या राजकीय आणि इतर गप्पा चालू असतात. त्या झाल्यावर आबासाहेब, यशवंतरावांना विचारतात "कारे यशवंता, ते प्रतापरावांचा काही फोन वैगरे आला होता का?"
"दादा, मीच केला त्यांना फोन केला होता; ते म्हटले त्यांचा निर्णय उद्या सांगतो", यशवंतराव बोलतात.
"देवालाच माहित पुढे काय होणार आहे ते?" आबासाहेब बोलतात.
"दादा, मला खात्री आहे प्रतापराव तयार होतील." यशवंतराव बोलतात.
"तुला एवढी खात्री का आहे त्या प्रतापरावांबद्दल?" आबासाहेब विचारतात.
"मी त्यांना चांगलं जवळून ओळखतो म्हणून खात्री आहे, पण मला खरं टेन्शन आहे ते अभिचं!" यशवंतराव बोलतात.
आबासाहेब आणि यशवंत यांचे बोलणे चालू असताना, तिथे देवकी येते.
"तू बोललीस का अभिशी?" आबासाहेब देवकिला विचारतात.
"मी बोलले अभिशी, पण त्याचं वागणं पहिल्यासारखंच आहे; ऐकायलाच तयार नाहीये. शेवटी मी त्याला म्हटलं जोपर्यंत तू मुलगी बघायला तयार होत नाही तोपर्यंत मी अन्नपाणी घेणार नाही." देवकी बोलते.
" देवकी असं का करायचं, प्रेमाने समजावयाच सोडून, असं करायला नको होत." आबासाहेब नाराज होऊन बोलतात.
"त्याला आतापर्यंत खूप वेळ प्रेमाने समजवलं, त्याला प्रेमाने ऐकायचं असत त्यांनी आतपर्यंत कधीच ऐकले असते. अभिला त्याच्या जुन्या आठवणीतून आता असच बाहेर काढावं लागेल." देवकी ठामपणे बोलते.
दिग्विजय खोलीमध्ये येरझाऱ्या घालत असतो तेवढ्यात तिथं मालती येते. दिग्विजयला येरझाऱ्या घालताना पाहून मालती त्याला विचारते,"काय ओ, अशा येरझाऱ्या का मारताय?"
"येरझाऱ्या नाही मारत, अभिच्या लग्नाचा विचार करतो. तो लग्न करायला तयार झाला तर, आणि तो परत पहिल्यासारखं नीट वागायला लागला तर, म्हणजे घरात परत त्याचाच उदो उदो होईन." दिग्विजय जेलसीने बोलतो.
"तुम्ही नका टेन्शन घेऊ, भाऊजी काय लग्नाला तयार नाही होणार, ते जुन्या गोष्टी विसरूच शकत नाही." मालती विश्वासाने बोलते.
"अभी नीट व्हावा, त्याने पहिल्यासारखं वागावं, त्याचं सगळं नीट व्हावा असे मलापण वाटते; पण असं झालं तर घरातील मोठा मुलगा म्हणून जो मान, सन्मान, अधिकार मिळायचे ते सगळे अभिला मिळतील." दिग्विजय बोलतो.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा आणि पुढे काय होईल? वैदहीचा निर्णय काय असेल? अभिमन्यू देवकीच्या हट्टापुढे झुकेल? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.
ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा