दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगत फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ३"
आबासाहेब आणि यशवंतरावांचे अभिमन्यूच्या लग्नाच्या विषयी बोलणे झाल्यानंतर हा विषय आबासाहेबांच्या मनात घोळत राहतो. आबासाहेब हा विषय देवकी जवळ काढतात.
"यशवंताने अभिमान्यू साठी एक मुलगी बघितली आहे, तो बोलत होता अभिमन्यूच लग्न करायला पाहिजे" आबासाहेब देवकिला बोलतात.
"हो, नर्मदाही मला बोलत होती, अभिच्या लग्नाबद्दल पण भाऊजींनी अभिसाठी (अभिमन्यूला घरात लाडाने अभी म्हणत ) कोणती पोरगी बघितली हे काही बोलली नाही नर्मदा" देवकी बोलते.
"ते प्रसिद्ध व्यावसायिक प्रतापराव देसाई आहेना, त्यांची मुलगी आहे. वैदही! मला माहित आहे ती मुलगी, सरस्वतीताई बरोबर काम करते." आबासाहेब बोलतात.
"पुढे कसं होईल? ती मुलगी आणि तिच्या घरचे लग्नाला तयार होतील?" देवकी चिंतेने बोलते.
"यशवंत बोलला आहे, ते सगळं तो बघेल. पण सर्वात महत्वाचं आहे; अभिने तयार होणे. अभिला तयार करण्याची जबाबदारी तुझी आहे." आबासाहेब बोलतात.
सकाळ सकाळी उठल्यानंतर देवकी देवाची पूजा करत असते. देवाला देवकी प्रार्थना करत असते."माझ्या अभिला परत पहिल्यासारखा कर. त्याचा चेहऱ्यावर हसू आण."
"जो अभी सगळ्यांच्या मदतीला धावून जायचा ज्याने स्वप्नात पण दुसऱ्या बद्दल वाईट विचार केला नाही त्याच्यावर तू अशी वाईट वेळ का आणली?" असा जाब देवकी देवाला विचारते.
पूजा आटोपल्यानंतर देवकी अभिमन्यूला उठवायला जाते.
"अभी, ये बाळा अभी; उठकी सकाळचे नऊ वाजले आहे. उठ आता, लवकर आवरून घे मी तुझ्यासाठी नाष्टा घेऊन येते." देवकी अभिमन्यूला बोलते.
"डोक खूप दुखतंय आई, डोक जड झाल्यासारखं वाटतंय." अभिमन्यु बोलतो.
"तुला नाही सहन होत मग कशाला पितो? तुला माहित आहेना तू पिला का तुला त्रास होतो. सोडून देणा दारू. काही कामाच बघ. तुला राजकारण नाही आवडत हे माहित आम्हाला, तू राजकारणात नको जाऊ पण आरे आपले एवढे कारखाने, व्यवसाय ते सांभाळ." देवकी अभिमन्यूला बोलते.
" आई मला काय हवंय माहित तुला?" अभिमन्यू देवकीला बोलतो.
"काय हवंय?" देवकी अभिमन्यूला विचारते.
"मृत्यू पाहिजे मला! मला नाही जगायचं. मी फक्त तुझ्यामुळे इथ आहे. नाहीतर कधीच हे घर, हे जग सोडून गेलो असतो".
अभिमन्यू बोलतो.
अभिमन्यू बोलतो.
"खबरदार परत अस काही बोलला तर, मी बोलणार नाही तुझ्यासोबत." देवकी ओरडून आणि रागाने अभिमन्यूला बोलते. पण तिच्या बोलण्यात भीती होती.
देवकी अभिमन्यूला उठून देते, आणि नंतर खाली हॉल मध्ये जाते. तिथे आबासाहेब, यशवंतराव आणि घरातील मंडळी बसलेले असतात.
"वहिनी तुम्ही बोलला का अभिशी लग्नाविषयी काही? यशवंतराव देवकीला विचारतात.
"नाही, तो आताच उठला. नंतर बोलते."देवकी बोलते.
नंतर घरातील सर्व आपआपल्या कामासाठी बाहेर पडतात. यशवंतराव ऑफिसला जाताना प्रतापराव देसाई यांना फोन करतात.
नंतर घरातील सर्व आपआपल्या कामासाठी बाहेर पडतात. यशवंतराव ऑफिसला जाताना प्रतापराव देसाई यांना फोन करतात.
"काय यशवंतराव आज बऱ्याच दिवसांनी आमची आठवण काढली" प्रतापराव बोलतात.
"जरा भेट घ्यायची होती तुमची प्रतापराव, आहे का आमच्यासाठी वेळ?" यशवंतराव बोलतात.
"यशवंतराव तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी वेळ काढायचा! या आज ऑफिसला मस्त निवांत भेटून गप्पा मारुया." प्रतापराव बोलतात.
वैदही सरस्वतीताईंच्या आश्रमात जाते. आश्रमात गेल्यावर सरस्वतीताई वैदहीला बोलतात "वैदही, आपल्याला नशामुक्तीसाठी अजून काही तरी केले पाहिजे? ते पण असं की सरकार त्यावर गांभीर्याने विचार करेल."
"ताई मला असे वाटते की आपण महिला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जायला हवं, आणि त्या मोर्चामध्ये महिला पण अशा पाहिजेल ज्यांच्या घरात अशी नशा करणाऱ्या व्यक्ती आहे. त्या महिलांनी नशेचा त्रास अनुभव केला आहे." वैदही बोलते.
"छान कल्पना आहे, आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल यासाठी. आपण एक काम करू अशा कोणी महिला आपल्या आजुबाजूला आहे का त्याची चौकशी करू आणि त्यांना आपल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी विनंती करू." सरस्वतीताई बोलतात.
"ताई कालच्या पत्रकार परिषदेत ते आबासाहेब पाटील आपल्या सोबत होते, मला एक शंका ते खरंच मनापासून आले होते का फक्त राजकीय देखावा होता." वैदही सरस्वतीताईंना विचारते.
"माझं मत विचारत असशील तर मला राजकीय देखावा जास्त वाटला, हा आता खर काय आहे? हे आबासाहेबांच्या मनालाच माहिती असेल." सरस्वतीताई बोलतात.
"ताई सर्व राजकारणी लोक स्वार्थीच असतात का? तुम्हांला तर माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे." वैदही स्वरस्वतीताईंना विचारते.
"नाही, सर्वच राजकारणी स्वार्थी असतात असे काही नाही, काही खरोखर मनापासून जनतेसाठी काम करतात. उदाहरण द्यायचं झालं तर या आबासाहेबांचाच मुलगा अभिमन्यू उत्तम उदाहरण आहे. तुला सांगते अभिमन्यू कॉलेजला असताना त्याने आपल्या आश्रयासाठी खूप काम केले होते. पण आता सध्या अभिमन्यू कुठे आहे हे काही माहीत नाही?" सरस्वतीताई बोलतात.
"म्हणजे आता नाहीये का तो इथे? वैदेही स्वरस्वतीताईंना विचारते.
"माहित नाही? त्याचा काही संपर्क नाहीये. मी मध्यंतरी आबासाहेबांना विचारले होते त्याच्याबद्दल, तेव्हा आबासाहेब म्हटले होते की अभिमन्यू परदेशात शिकायला गेला आहे." सरस्वतीताई बोलतात.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा आणि पुढे काय होईल? अभिमन्यू आणि वैदेहीचे लग्न ठरेल? आबासाहेब सरस्वतीताई बरोबर खोटे का बोलले असतील? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.
ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा