Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ५

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न, आणि लग्नानंतर उमलणारे प्रेम.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ५"

देवकी आणि घरातील सगळ्यांचे अभिमन्यूच्या लग्नाबद्दल बोलणे झाल्यानंतर, घरातील सगळ्यांनी अभिमन्यूला तयार करण्याची जबाबदारी देवकीवर सोपवली.

अभिमन्यू समोर लग्नाचा विषय कसा काढायचा?....
त्याला तयार कसे करायचे?.....
त्याला त्रास तर होणार नाहीना?....
तो दुखावेल का?....

असा सगळा विचार देवकी करत असते.

इकडे वैदहीच्या घरी प्रतापराव, वैदही आणि शारदा जेवायला बसले असताना; प्रतापराव बोलतात "वैदेही तुझ्यासाठी एक स्थळ आले आहे."

"काय सांगता, कोणाचे आहे स्थळ?" शारदा एकदम उत्साहाने बोलते.

"आबासाहेब पाटील यांचा मुलगा अभिमन्यू." प्रतापराव सांगतात.

या नावाने वैदही क्षणभर स्तब्ध होते. हातातला घास हातातच राहतो. काही क्षणांनी वैदही आश्चर्यचकित होऊन बोलते, "काय?"

"वैदही, तू एवढं आश्चर्यचकित का झाली." शारदा विचारते.

"नाही, काही नाही. पण बाबा मी असे ऐकले होते, तो परदेशात आहे." वैदही विचारते.

"हो, तो परदेशात होता, पण यशवंतराव म्हणजे अभिमन्यूचे काका म्हणाले की तो परदेशातून परत आला आहे." प्रतापराव बोलतात.

"मग वैदही काय करायचं?" शारदा वैदहीला विचारते.

"आई, मी विचार करून सांगते." वैदही विचार करून बोलते.

"विचार कर तू, केला पण पाहिजे पण एक लक्षात घे वैदही; इतक चांगलं स्थळ तुला शोधूनही भेटणार नाही. आबासाहेब पाटील म्हणजे आपल्या जिल्ह्यातील एक मोठ व्यक्तिमत्व आहे. आणि तू त्यांच्या घरात जाशील." प्रतापराव वैदहिला बोलतात.

वैदही, शारदा आणि प्रतापराव यांचे बोलणे झाल्यानंतर अभिमन्यू परदेशातून परत आला आहे हे सरस्वतीताईंना सांगायला हवे असे वैदहिला वाटते. यासाठी वैदही त्यांना कॉल करते.

"हॅलो, बर झालं वैदही तू कॉल केला, मी तुलाच कॉल करणार होते." सरस्वतीताई बोलतात.

"ताई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे." वैदही बोलते.

"मलाही तुला एक सांगायचं, आपल्या अनाथ आश्रमातील मुलगी काव्याच्या घरच्यांची माहिती मिळाली आहे. ती माहिती खरी आहे का खोटी हे तपासून मला ती मुलगी त्यांच्याकडे सोपवायची की नाही हे सगळे बघावं लागणार आहे. आणि यासाठी मला दिल्लीला जावं लागणार आहे. मला तिकडे किती दिवस लागतील माहित नाही, मी परत येईपर्यंत आश्रमाची जबाबदारी तुझी आहे." सरस्वतीताई बोलतात.

"ठीक आहे ताई, जावा तुम्ही." वैदही बोलते.

"तुला काहीतरी सांगायचे होते मला, काय सांगायचं? " सरस्वतीताई विचारतात.

"नाही ताई, काय नाही नंतर सांगेल तुम्ही कधी निघणार आहे?" वैदही विचारते.

"उद्या पहाटेच निघणार आहे." सरस्वतीताई बोलतात.

वैदही आणि सरस्वतीताई यांचे बोलणे झाल्यानंतर वैदही हाच विचार करत असते की त्यांना अभिमन्यूबद्दल सांगायला हवे होते की नाही. मी त्यांना न सांगून चूक तर केली नाही ना. पण नको त्यांना आता बाहेर जायचे आहे, आणि अशात मी त्यांना सांगितले असते तर त्याचे तिकडे लक्ष लागले नसते.

वैदही हा सगळा विचार करत असताना शारदा तिथे येथे.

"काय विचार करते? मला माहित अशा वेळेस मुलींना गोंधळ्यासारखं होतं. पण हीच वेळ असते निर्णय घेण्याची." शारदा वैदहीला समजून सांगते.

"आई मी थोडा वेगळा विचार करत होते." वैदही बोलते.

"काय वेगळा विचार करत होती, मला तरी कळुदे?" शारदा बोलते.

"नाही, काही नाही आई असंच. तू का आली होती?" वैदही विचारते.

"अगं बाबा काय बोलले त्यावर तू काय विचार करते? हे बघायला आलते." शारदा बोलते.

"आई, खरं सांगू लग्नाचा विचार केलाच नाही अजून." वैदही बोलते.

"मग आता विचार करायची वेळ आहे असं समज. हेच वय असत या गोष्टींचा विचार करायचा." शारदा बोलते.

"आई, मी उद्या सकाळी सांगेल तुला माझा निर्णय." वैदही बोलते.

"हे बघ, तुला जो निर्णय घ्यायचा तो घे आणि ऐक मुलगा बघणं आणि लग्न होण यात खूप फरक आहे. मुलगा बघायला तयार झाली म्हणजे काही लगेच लग्न नाही होणार तुझं. मला जर विचारशील तर तू एकदा त्याला बघावं असं मला वाटतं. बाकी तू तुझा निर्णय घे." असे बोलून शारदा तेथून निघून जाते.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा आणि पुढे काय होईल? वैदही बघण्याच्या कार्यक्रमाला तयार होईल? अभिमन्यू वैदहीचे लग्न जमेल? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.

ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all