दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - १०"
प्रतापराव आणि वैदहीचे बोलणे झाल्यानंतर वैदही घराबाहेर रागाने निघून आली होती. वैदहिला खूप एकटे वाटत होते.
"हे लग्न करण्याचा निर्णय घेऊन मी चूक तर नाही केली"....
"हे लग्न माझ्या स्वप्नाच्या आड तर येणार नाही"....
"हे लग्न माझ्या स्वप्नाच्या आड तर येणार नाही"....
असे विचार वैदहीच्या मनात येत होते. वैदहीने एकटेपणा दूर करण्यासाठी तिची मैत्रीण शुभांगी हिला बोलवून घेतलेले असते. शुभांगी आल्यानंतर वैदही तिला सगळं घटनाक्रम सांगते.
"वैदही यात तुझीच चूक आहे, तू काकांना अगोदर सांगायला हवे होते." वैदहीने सगळे सांगितल्यावर शुभांगी बोलते.
"बर बाई मान्य मला माझी चूक आहे पण आता बाबांनी माझं ऐकायला नको?" वैदही बोलते.
"असा ठरवून कार्यक्रम कॅन्सल कारणे, कसे दिसेल ते?" शुभांगी बोलते.
"तुला इथे प्रश्न विचारण्यासाठी नाही बोलावले यातून मार्ग काढण्यासाठी बोलावलंय." वैदही बोलते.
"मला यावर एकच मार्ग दिसतो आणि तो म्हणजे अभिमन्यू पाटील यांची भेट घ्यायची. आता तेच यावर काही तरी करू शकतात." शुभांगी बोलते.
"काही वेड वैगरे लागलं का तुला? काही बोलते." वैदही बोलते.
"काही नाही योग्य तेच बोलते. काका कार्यक्रम पुढे ढकलणार नाही मग पाटलांच्या घरातून कार्यक्रम पुढे गेला पाहिजे. तिथे कोणाला सांगणार आबासाहेबांना!" शुभांगी बोलते.
वैदही विचार करत बसते.
"अगं एवढा विचार नको करू चल माझ्याबरोबर. आपण अभिमन्यू पाटील यांची भेट घेऊ." शुभांगी बोलते.
वैदही कसं बस अभिमन्यूला भेटण्यासाठी तयार होते.
वैदही कसं बस अभिमन्यूला भेटण्यासाठी तयार होते.
नंतर दोघीही आबासाहेब पाटील यांच्या बंगल्या बाहेर येतात. शुभांगी सिक्युरिटीकडे जाऊन बोलते, "आम्हाला अभिमन्यू पाटील यांना भेटायचे आहे."
"काय काम आहे? एवढ्या रात्री कशाला आलात? परवानगी आहे का? सिक्युरिटी गार्ड विचारतो.
"परवानगी नाहीये पण आमचं खूप महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे." शुभांगी बोलते.
"परवानगी शिवाय भेटता येणार नाही." सिक्युरिटी गार्ड बोलतो.
शुभांगी खूप विनंती करते पण सिक्युरिटी गार्ड काही ऐकत नाही. नंतर शुभांगी वैदहिला बोलावते आणि सिक्युरिटी गार्डला बोलते "ही कोण आहे माहिती का तुम्हाला?" शुभांगी असे बोलल्यावर वैदही तिला धक्का देते. तितक्यात अभिमन्यू तिथे येतो जो बाहेर चाललेला असतो.
"काय चाललंय इथे?" अभिमन्यू सिक्युरिटी गार्डला विचारतो.
"ओ बघणां आम्हाला अभिमन्यूंना भेटायचे. हे भेटून देत नाहीये." शुभांगी बोलते.
"आमचं फार महत्वाचं काम आहे अभिम्युकंडे आम्ही फार वेळ नाही घेणार त्यांचा." वैदही बोलते.
"मीच आहे अभिमन्यू, बोला काय काम माझ्याकडे?" अभिमन्यू बोलतो.
अभिमन्यू असे बोलल्यावर वैदही जणू गोठून जाते. डोळे नकळत अभिमन्यूवर स्थिरावतात. समोरचा व्यक्ती अनोळखी असूनही सात जन्माची ओळख असल्यासारखा वाटतो. वैदही अभिमन्यूकडे एकटक बघत होती. वैदहीचे भान हरपले होते. वेळ जणू तिच्यासाठी थांबली होती.
काहीक्षण निघून जातात. वैदही असच अभिमयूकडे एकटक बघत असते. मग शुभांगी वैदहिला धक्का देऊन तिला भानावर आणते.
"तुम्ही आम्हाला ओळखले का?" शुभांगी बोलते.
"माफ करा, पण मी नाही ओळखले तुम्हाला." अभिमन्यू बोलतो.
"मी पण काय विचारलं, कसे ओळखणार आपली पहिलीच वेळ आहे भेटायची. मी शुभांगी आणि ही माझी मैत्रीण वैदही देसाई." शुभांगी बोलते.
"ओ... पण एवढ्या रात्री असे का आलात? अभिमन्यू बोलतो.
"वैदहिला तुमच्या बरोबर बोलायचे आहे." शुभांगी बोलते.
"पण ती आल्यापासून गप्पच आहे, काहीच बोलत नाहीये." अभिमन्यू बोलतो.
अभिमन्यू बोलल्यावर शुभांगी वैदहिला बोलायला सांगते.
"आपण इथे नको बोलायला, दुसरीकडे जायचं का? वैदही बोलते.
"हम... चला घरात जाऊन बोलू." अभिमन्यू बोलतो.
"घरात नको." वैदही बोलते.
मग अभिमन्यू, वैदही, शुभांगी गार्डन मधल्या एका बाकावर जातात.
"उद्या आपला कांदेपोह्याचां कार्यक्रम आहे पण उद्याच मला मोर्चा आहे. त्याच झालं असं की मी मोर्चाची तारीख अगोदरच ठरवली होती आणि हे बाबांना माहित नव्हते. त्यामुळे त्यांनी आपला उद्याचा कार्यक्रम फिक्स केला. मी त्यांना मोर्चाचे सांगितले तर बाबा बोलले आता आपला कार्यक्रम कॅन्सल करणे चांगले दिसणार नाही. माझी विनंती तुम्ही आपला कार्यक्रम उद्या ऐवजी परवा केला तर." वैदही बोलते.
"एवढचं, आणि त्यासाठी तू माझी परवानगी घ्यायला आली. तुला मोर्चासाठी जायचे तू निर्धास्त जायला हवे त्यासाठी तुला कोणाच्या परवानगी घेण्याची काय गरज आहे." अभिमन्यू बोलतो.
"तसं नाही, गैरसमज नको व्हायला म्हणून आली." वैदही बोलते.
"ठीक आहे, मी सांगतो उद्याचा कार्यक्रम परवा करायला. जा तू आता. खूप रात्र झाली आहे आणि आता तुम्हाला इथे कोणी नको बघायला." अभिमन्यू बोलतो.
वैदही आणि शुभांगी तिथून निघतात. वैदही शुभांगीला तिच्या घरी सोडते. वैदही घरी यायला निघणार असते तेव्हा शुभांगी वैदहिला चिडवून बोलते, "लगेच कोणाला तरी परवानगी भेटली बाबा. ( वैदही लाजते) अरे देवा कोणतरी लाजतंय." वैदही एक सांगू पोरगा चांगला वाटतोय."
नंतर वैदेही घरी जायला निघते. इकडे अभिमन्यूने देवकीला बोलतो, "आई, उद्याचा बघण्याचा कार्यक्रम परवा कर."
"कारे, उद्या का नको? देवकी बोलते.
"आई, प्लीज माझं ऐक मी तुझं ऐकतोना." अभिमन्यू बोलतो.
अभिमन्यूच्या बोलण्यानंतर देवकी कार्यक्रम पुढे ढकलण्यास तयार होते. नंतर देवकीच्या सांगण्यावरून यशवंतराव प्रतापरावांना कॉल करून सांगतात की बघण्याचा कार्यक्रम उद्या ऐवजी परवा करूया. त्यासाठी प्रतापरावही तयार होतात. तेवढ्यात तिथे वैदही येते.
"घे वैदही तुझ्या मनासारखं झालं आहे उद्याचा कार्यक्रम परवा होणार आहे आता, तुला हेच पाहिजे होते ना!" प्रतापराव बोलतात.
वैदही खूप खुश होते आणि झोपायला जाते. पण तिच्या मनात अभिमन्यूचेच विचार चालू असतात. अभिमन्यू जे बोलला ते सारखे तिच्या डोळ्यासमोर येत होते. वैदहिला झोपच येत नाही.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा आणि पुढे काय होईल? वैदहीच्या मनात अभिमन्यू बद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होईल का? वैदहिचा मोर्चा नीट होईल का?मोर्चात काही विघ्न येईल? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.
ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा