दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ११"
वैदहीचा मोर्चा यशस्वी झालेला असतो. मीडियाने देखील मोर्चाला खूप उचलून धरलेले असते. संपूर्ण जिल्ह्यात या मोर्चाची आणि वैदहीची चर्चा चालू होती. मोर्चा झाल्यानंतर आश्रमामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
"स्वरस्वतीताई इथे नसताना तुम्ही मोर्चा यशस्वी करून दाखवला, याबद्दल सर्वप्रथम तुमचे अभिनंदन वैदहिताई. सर्वांना वाटत होतं की कालची मुलगी तिला काय जमणार आहे? आता तुम्ही त्यांना काय उत्तर देणार." पत्रकार वैदहिला विचारतात.
"कोण काय बोलतोय याकडे लक्ष देण्याऐवजी मला माझे काम करायला आवडते." वैदही आत्मविश्वासाने बोलते.
"आता तुमचे भविष्यातल्या काय योजना आहे?" पत्रकार विचारतात.
"असेच लोकांसाठी काम करत राहायचे." वैदही बोलते.
"भविष्यात तुमच्या राजकारणात, कुठल्या पक्षात येण्याचा काही विचार." पत्रकार विचारतात.
"मला राजकारण करायला आवडत नाही. त्यामुळे हा प्रश्नच बिनबुडाचा आहे असे मला वाटते." वैदही बोलते.
"अनेक जण असेच बोलून समाजसेवेच्या नावाने राजकारणात जातात मग तुम्हीही ते करणार नाही कशावरून?" पत्रकार विचारतात.
"मीही इथेच आहे, तुम्हीही इथेच आहे. मी राजकारणात गेले तर तुम्ही मला अवश्य टोका." वैदही बोलते.
पत्रकार परिषद संपलेली असते. आश्रमातील कामे आटपून वैदही घरी येतो. मोर्चा यशस्वी झाला हे तिच्या चेहऱ्यावरुन आनंद व्यक्त होत होता त्यावरूनच कळत होते.
"एकदम आनंदात दिसत आहे, मोर्चा यशस्वी झाल्याचे तुझ्या चेहऱ्यावरच दिसत आहे." शारदा बोलते.
वैदही आईला मिठी मारून बोलते,"मी हे केलं कारण तुझा आणि बाबांचा आशीर्वाद माझा पाठीशी होता."
"आता झालाना मोर्चा, आता ते राहूदे आणि उद्या पाटलांच्या घरी जायचे आहे त्याची तयारी कर." शारदा बोलते.
"आई, तुम्ही माझ्या मनासारखं केले. आता मिपण तुमच्या मनासारखे करेल." वैदही बोलते.
"बर...बर... आमच्या मनासारखं करते का!" शारदा मिश्कीलपणे बोलते.
वैदही खूप खुश असते. इकडे पाटलांच्या घरी दुसऱ्या दिवशीची तयारी सुरू होती. आबासाहेब आणि यशवंतराव यांच्या गप्पा सुरू होत्या.
"दादा, उद्या कसे करायचे? जर अभिने त्या मुलीला सगळे सांगितले तर पुढे काहीच होणार नाही." यशवंतराव आबासाहेबांना बोलतात.
"माझ्याही डोक्यात तेच सुरू आहे, आपल्याला यावर काहीतरी तोडगा काढावा लागेल." आबासाहेब बोलतात.
"दादा, आपण त्यांना एकट्यात बोलायला जाऊनच द्यायचे नाही. काहीतरी कारण सांगून त्यांना थांबवायचे." यशवंतराव बोलतात.
"पण समजा त्या मुलीने म्हटले मला एकट्याने बोलायचे आहे तर मग कसे थांबवणार?" आबासाहेब बोलतात.
"दादा हा विषय आपण स्वतःहून काढायचाच नाही. जर त्यांनी काढला आणि अभी आणि वैदही बाजूला बोलायला गेले तर त्यांना जास्त वेळ द्यायचाच नाही." यशवंतराव बोलतात.
"अरे हे झाले त्यावेळे पुरते पण नंतर लग्न जमलं तर तेव्हा पासून लग्नापर्यंत काय करायचं? अभी तेव्हाही बोलू शकतोना!" आबासाहेब बोलतात.
"दादा, आपण प्रतापरावांना सांगायचे आम्हाला लग्नाची घाई आहे. आम्हाला लवकर लग्न करायचे आहे. तेवढ्या वेळेत मी काळजी घेईल की अभी वैदहिला सत्य सांगणार नाही." यशवंतराव बोलतात.
"ठीक आहे करू असेच आपण!" आबासाहेब बोलतात.
इकडे मालती आणि दिग्विजय यांचीही अभिमन्यूच्या लग्ना बद्दल चर्चा चालू होती.
"मला वाटल नव्हतं भाऊजी लग्नाला तयार होतील." मालती दिग्विजयला बोलते.
"अभिने लग्नाला फक्त होकार दिला आहे पण तो लग्न नाही करणार." दिग्विजय बोलतो.
"म्हणजे?" मालती विचारते.
"अभी मला बोलला की तो त्या मुलीला भेटल्यावर सगळे सत्य सांगणार आहे. आणि मग ती मुलगीच लग्नाला नकार देईल." दिग्विजय बोलतो.
"असेल कदाचित असे, मला नाही वाटत आबासाहेब हे लग्न मोडून देतील." मालती बोलते.
"का? तुला असे का वाटते? दिग्विजय विचारतो.
"या लग्नाने आबासाहेबांचा तिहेरी फायदा होणार आहे." मालती बोलते.
"तिहेरी फायदा तो कसकाय? दिग्विजय विचारतो.
"वैदही देसाई हे नाव सध्या जिल्ह्यात खूप चर्चेत आहे. तुम्ही आजच बातम्यांना बघितले असेल तिने किती मोठा मोर्चा यशस्वी केला. ती जर आपल्या घरात आली तर तिच्या प्रसिद्धीचा फायदा, सरस्वतीताई यांच्या विरोधातही कधी कधी वैदहीचा वापर केला जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाच, प्रतापराव देसाई यांच्या सारखा श्रीमंत मासा आबासाहेबांच्या गळाला लागेल." मालती बोलते.
"तू बोलतेय ते खरच विचार करण्यासारखे आहे. हे जर लग्न झाले तर खरच आबासाहेबांना राजकीय दृष्टिकोनातून खूप फायदा होईल. दिग्विजय बोलतो.
"पण एक गोष्ट लक्षात घ्या. यात सगळ्यात जास्त तोटा आपलाच होईल. घरातील प्रत्येकजण त्या वैदहीचाच उदो...उदो... करतील." मालती बोलते.
"असे असेत हे लग्न होता कामा नये. आपल्याला काही करून हे लग्न थांबवावे लागेल." दिग्विजय बोलतो.
"तुमचं बरोबर आहे. आणि हे करताना आपल्याला हेही लक्षात घ्यावे लागेल यात आपले नाव कुठेच येणार नाही." मालती बोलते.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा आणि पुढे काय होईल? अभिमन्यू वैदहिला सगळे खरे सांगेल? दिग्विजय आणि मालती लग्न जमवण्यात काही विघ्न आणतील का? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.
ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा