Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - १२

राजकीय फायद्यासाठी झालेलं लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026


"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - १२"

देसाईंच्या घरी पाटील वाड्यावर जाण्याची तयारी सुरू होती. प्रतापराव आणि शारदा यांची लगबग सुरू होती. "हे घेतले का?" "ते घेतले का?" असे प्रश्न शारदा प्रत्येकाला विचारत होती.

"वैदहीचे आवरले का नाही शारदा? आपल्याला उशीर झाला आहे. आतापर्यंत आपण निघायला हवे होते." प्रतापराव शारदाला बोलतात.

"वैदहीचे आवरले आहे; शुभांगी आहे तिच्याबरोबर." शारदा बोलते.

प्रतापराव आणि शारदा बोलत असताना, पायऱ्या उतरत वैदही आणि शुभांगी येत असतात. वैदहीने साडी घातलेली असते. गळ्यात एक छान, छोटी चैन होती आणि एकदम हलकासा मेकअप. वैदहीचा साधेपणाच खूप उठून दिसत होता.

"वा.... वा.... वा.... किती गोड दिसतं माझी चिमणी." प्रतापराव बोलतात.

"होना! आपलीच नजर लागायची आपल्या पोरीला." शारदा बोलते.

"काकू, तुम्हाला सांगते; वैदहिला बघून अभिमन्यू पाटील जाग्यावर बेशुद्ध पडणार आहे." शुभांगी हसून बोलते.

शुभांगी बोलल्यावर शुभांगी, प्रतापराव, शारदा तिघेही हसतात.

"बर चला.... चला.... अगोदरच आपल्याला निघायला उशीर झाला आहे." प्रतापराव बोलतात.

देसाई कुटुंब पाटील वाड्यावर येण्यासाठी निघाले होते. इकडे पाटील वाड्यातही धावपळ चालू होती.

"नर्मदा, जेवण झाले ना बनवून?" देवकी नर्मदाला विचारते.

"हो ताई, झाले आहे बनवून." नर्मदा बोलते.

"तू नीट खात्री केली आहे ना? सगळं एकदम व्यवस्थित आहे का?" देवकी नर्मदाला विचारते.

"ताई, सगळं एकदम व्यवस्थित आहे. ताई, मी तुम्हाला एवढ बेचेन कीर्तीच्या ( अभिमन्यूची थोरली बहीण ) बघण्याच्या कार्यक्रमाला पण बघितले नव्हते." नर्मदा देवकीला बोलते.

"कीर्तीची बाब वेगळी होती. ती लग्नासाठी मनापासून तयार होती. अभी आता यावेळेला तयार झाला आहे, पण त्याचे काही सांगता येत नाही म्हणून काळजी वाटते." देवकी काळजीने बोलते.

"ताई, तुम्ही काळजी नका करू होईल सगळे नीट." नर्मदा देवकीला धीर देत बोलते.

इकडे अभिमन्यूच्या खोलीत दिग्विजय आणि कीर्ती अभिमन्यूला तयार करत असतात.

"अभी, एकदम हँडसम दिसतो तू." कीर्ती बोलते.

अभिमन्यू कीर्तीला काहीही प्रतिसाद देत नाही.

"कायरे अभी एवढा शांत का आहे? बोल काहीतरी." कीर्ती बोलते.

"ताई ही सगळ माझ्या मनाच्या विरोधात चालू आहे, तू तुझ्या घरी होती त्यामुळे तुला माहित नाही आईने मला कसे तयार केले आहे." अभिमन्यू कीर्तीला बोलतो.

"मी आल्यावर आईने मला सर्व सांगितले आहे. आणि आईने केले ते बरोबरच आहे. तसही तू कोणाचेही ऐकले नसते. आणि अजून किती दिवस जुन्या आठवणीत जगणार आहे. आयुष्य खूप मोठे आहे आता तुला पुढे गेले पाहिजे." कीर्ती बोलते.

"राहूदे! मला काय वाटते हे तुम्हाला कोणालाच नाही कळणार." अभिमन्यू निराशेने बोलतो.

"अवघड आहे बाबा तुझं. मी जाते खाली. दादा, तूच समजाव आता याला." असे बोलून कीर्ती तिथून निघून जाते.

कीर्ती गेल्यावर दिग्विजय अभिमन्यूला बोलतो, "हे बघ अभी जेव्हा तू आणि वैदही बाजूला बोलायला जाल ना तेव्हा वैदहिला तुझा सगळा भूतकाळ सांग. तिला अंधारात नको ठेवू." दिग्विजय बोलतो.

"दादा, मी तिला एकच सांगणार आहे ते म्हणजे मला तुझ्याशी लग्न नाही करायचे पण मला नकार देता येत नाही त्यामुळे तूच मला नकार दे." अभिमन्यू बोलतो.

"शेवटी हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणाचे ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचे ऐक." दिग्विजय बोलतो.

बराच वेळ निघून गेलेला असतो. पाटील कुटुंबातील सर्व जण देसाई कुटुंबाची वाट बघत होते. अभिमन्यू आणि दिग्विजय देखील हॉल मध्ये येऊन उभे होते.

"यशवंता, तू प्रतापरावांना फोन केला होता का? कुठ पर्यंत आली ती मंडळी." आबासाहेब यशवंतरावांना विचारतात.

"दादा, थोड्या वेळा पूर्वी झाले माझे प्रतापरावांशी बोलणे. ते निघाले होते. बहुतेक येतील इतक्यात." यशवंतराव बोलतात.

"देवा, पांडुरंगा सगळं नीट पार पडूदे रे देवा. देवकी देवाला प्रार्थना करते.

"एवढी काळजी नको करू, होईल सगळे नीट होईल. आबासाहेब देवकिला बोलतात.

सगळे देसाई कुटुंबाची वाट बघत असताना दिग्विजय आणि मालती मात्र कोणालाही कळणार अशा पद्धतीने आपआपसात कुजबुजत असतात.

"अहो, लग्न ठरले नाही तर मग काय करायचे? मालती सावकाश पणे दिग्विजयला विचारते.

"मी अभिला सांगितले आहे, स्वतःच्या मनाचे ऐक बाकी कोणाचे ऐकू नको. आता बघू पुढे काय होते. दिग्विजय सावकाश मालतीला बोलतो.

दिग्विजय आणि मालती कुजबुजत असतात तेवढ्यात देसाई, पाटील वाड्याच्या दरवाजावर आलेले असतात....

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा आणि पुढे काय होईल? अभिमन्यू आणि वैदहीचे लग्न ठरेल? दिग्विजय आणि मालती लग्न जमवण्यात काही विघ्न आणतील का? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.

ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"