Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - १५

राजकीय फायद्याकरता झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग -१५"

अभिमन्यूला कसे थांबवयाचे असा विचार करत असतानाच यशवंतराव जाणूनबुजून सटकून पडतात आणि आवाज देतात "अभी"....

अभिमन्यू आणि वैदही दोघेही धावत येऊन यशवंतरावांना उचलतात.

"काका, तुम्हाला लागले नाहीना?" अभिमन्यू यशवंतरावांना विचारतो.

"नाही, फारसे काही लागले नाही. पण मला नाही वाटत मला आता मला पायऱ्या उतरता येतील. तू मला खाली घेऊन चालतो का?" यशवंतराव अभिमन्यूला विचारतात.

"हो काका, चला." असे बोलून अभिमन्यू यशवंतरावांना खाली हॉल मध्ये घेऊन येतो. वैदही देखील त्यांच्या बरोबर खाली हॉल मध्ये आलेली असते.

"काय झाले यशवंता? अभिने तुला असे पकडून का आणले आहे?" आबासाहेब यशवंतरावांना विचारतात.

"अरे काही नाही दादा, ते मी टेरेस वर घसरून पडलो." यशवंतराव बोलतात.

"अरे देवा, फार लागले नाहीना भाऊजी तुम्हाला?" देवकी काळजीने विचारते.

"नाही वहिनी. एवढ काळजी करण्यासारखं काही नाही." यशवंतराव बोलतात.

"यशवंतराव चालताना काळजी घेत जावा." प्रतापराव बोलतात.

" हो नक्कीच, आणि ते मी विचारांत होतो म्हणून घसरलो." यशवंतराव बोलतात.

"बर अभी, वैदही झाले का तुमचे बोलून." आबासाहेब बोलतात.

अभिमन्यू काही बोलण्याच्या आत यशवंतराव बोलतात, "हो दादा, त्यांचे बोलून झाले आहे."

यशवंतराव असे बोलल्यामुळे अभिमन्यूला काहीच बोलता येत नाही. तो तसाच शांत राहतो. यशवंतराव बोलणे झाले आहे, असे बोलल्यामुळे प्रतापराव घरी निघण्याची तयारी करतात.

"बर आबासाहेब, निघतो आता आम्ही. आमचा काय निर्णय असेल कळवतो तुम्हाला? प्रतापराव बोलतात.

"हो चालेल चालेल. आम्हीही आमचा काय निर्णय असेल ते सांगू तुम्हाला." आबासाहेब बोलतात.

प्रतापराव देसाई, पाटील घरातील सगळ्यांचा निरोप घेऊन निघतात. देसाई कुटुंब गेल्यानंतर अभिमन्यूही तणतण करत स्वतःच्या खोलीत जातो. त्याला मनातील वैदहिला सांगता आले नव्हते.

अभिमन्यू खोलीत गेल्यावर, आबासाहेब यशवंतरावांना विचारतात, "सगळे ठीक आहे ना?"

"हो दादा, सगळे ठीक आहे. अभिला, वैदहिला काही सांगताच नाही आले." यशवंतराव बोलतात.

"काय रे ऐ दिग्विजय, तुला नसता शहाणपणा कोणी करायला सांगितला होता! आबासाहेब रागाने बोलतात.

"बघण्याच्या कार्यक्रमाला मुलगा आणि मुलगी एकांतात बाजूला बोलायला जातातच की, मी ही तेच सांगितले. काय चूक केले? दिग्विजय बोलतो.

"मला नको शिकवू काय बरोबर आणि चूक! आरे डोके चालत नाही तर चालवायचे नाही. गप आपलं बसून रहायचं. ते दिले सोडून आणि नाही तिथे डोक चालवायचं." आबासाहेबांचा पारा आता चढलेला असतो.

"मी काय म्हणते, अभिने वैदहिला काही सांगितले नाहीना मग जाऊदे. द्या विषय सोडून." देवकी बोलते.

देवकी बोलल्यानंतर आबासाहेब शांत होतात. अभिमन्यूने त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. त्याला खूप एकटे वाटत होते. त्याच्या मनातील वेदना डोळ्यातील अश्रूनवाटे बाहेर पडत होत्या.

रात्र झालेली असते. इकडे देसाईंच्या घरी प्रतापरावांनी शारदाला वैदहीचा निर्णय काय आहे हे विचारण्यासाठी वैदहिकडे पाठवले होते. वैदही तिच्या विचारांत हरवली होती आणि तिच्या चेहऱ्यावर हलकेशे हसू होते.

शारदा वैदहीच्या खोलीचा दरवाजा नॉक करून बोलते, "वैदही येऊ का आत?"

"आई तुला कधीपासून माझ्या खोलीत यायला परवानगी लागायला लागली गं?" वैदही बोलते.

"नाही, तस परवानगीची गरज नाहीये. पण तू तुझ्या विचारांत गुंतली होती; मग म्हटलं नको तुला डिस्टर्ब करायला." शारदा बोलते.

"नाही आई, एवढ काही नाही." वैदही बोलते.

"कसला एवढा विचार करत होती?" शारदा विचारते.

"काही नाही आई, असंच! तू कशासाठी आली होती?" वैदही विचारते.

"मी हे विचारण्यासाठी आले आहे की, तुला मुलगा कसा वाटला? काय ठरलं तुझं?" शारदा विचारते.

"आई, तुला कसा वाटला?" वैदही विचारते.

"मलाच काय विचारते. तुझ्यासाठी आले आहे स्थळ; मग तू सांग." शारदा बोलते.

"हो आई, मी सांगते. पण एकंदरीत तुझा अनुभव काय सांगतो?" वैदही विचारते.

"मला विचारशील तर मला मुलगा एकदम शांत, आणि समजुतदार वाटला. आता तुला कसा वाटला ते सांग? शारदा बोलते.

शारदाचे बोलणे झाल्यानंतर, शारदा वैदहीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होती...

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा आणि पुढे काय होईल? वैदही अभिमन्यूला लग्नासाठी हो म्हणेल? अभिमन्यूला, वैदहिला होकार देण्यासाठी देवकी तयार करेल? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.

ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
0

🎭 Series Post

View all