Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - १७

राजकीय फायद्याकरता झालेले लग्न आणि लग्नानंतर होणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - १७"

यशवंतराव आणि आबासाहेब गप्पा मारत असतात. तेवढ्यात प्रतापरावरावांचा कॉल यशवंतरावांना येतो, तो कटही होतो. तितक्यात देवकीही तिथे आलेली असते.

"वहिनी बर झालं तुम्हीच आला. अभी काही बोलला का? त्याने त्याचा निर्णय सांगितला का? आत्ताच प्रतापरावांचा कॉल आला होता." यशवंतराव देवकीला बोलतात.

"अभीने काही त्याचा निर्णय सांगितला नाही. पण प्रतापरावांचा निर्णय हा असेल तर आपलाही निर्णय त्यांना हा म्हणूनच सांगा." देवकी बोलते.

"पण देवकी, अभी काहीच बोललेला नसताना त्यांना हा सांगायच. परत काही अडचण यायला नको!" आबासाहेब बोलतात.

"तुम्हाला वाटते का, अभी त्याचा निर्णय देईल? खरं सांगू वैदहीला बघितल्या पासून मला असच वाटतय की अभिमन्यूसाठी तिच योग्य आहे. त्यामुळे भाऊजी तुम्ही देसाईंना "हा" कळवा." देवकी बोलते.

देवकीने सांगितल्यानंतर यशवंतराव, प्रतापरावांना कॉल करतात.

"नमस्कार यशवंतराव, मी आत्ताच तुम्हांला कॉल केला होता." प्रतापराव, यशवंतरावांना कॉलवर बोलतात.

"हो... हो...तुमचा कॉल आला होता. माफ करा मी जरा कामात होतो, त्यामुळे कॉल उचलू शकलो नाही." यशवंतराव बोलतात.

"यशवंतराव, माफी कसली मागताय. चालूच असतात या गोष्टी. बरं, मी कॉल यासाठी केला होता की आमचा निर्णय झाला आहे. हे तुम्हाला सांगायचे आहे." प्रतापराव बोलतात.

"हो का. निर्णय आमचा पण झाला आहे प्रतापराव. आमच्या अभिला तुमची वैदही पसंत आहे. आणि आम्हा सगळ्यांनाही वैदही सून म्हणून पसंत आहे. तुम्ही तुमचा निर्णय काय आहे ते सांगा आता?" यशवंतराव बोलतात.

"यशवंतराव, आम्हालाही अभिमन्यूराव जावई म्हणून पसंत आहे. आमच्या वैदहिलाही अभिमन्यूराव पसंत आहे. व्याहीबुवा आता पुढे काय आणि कसे करायचे ते बोला?
प्रतापराव आनंदाने हसून बोलतात.

"प्रतापराव, ते सगळे मी तुम्हांला सांगतो पण त्याअगोदर ही आनंदाची बातमी मला घरात सांगुद्या. मग मी तुम्हांला कॉल करतो." यशवंतराव बोलतात.

यशवंतराव आणि प्रतापराव यांचे फोन वरचे बोलणे संपते.

"दादा, वहिनी आनंदाची बातमी आहे. प्रतापरावांचा होकार आला आहे. वैदहिला अभिमन्यू पसंत आहे." यशवंतराव आनंदाने बोलतात.

"देवा, पांडुरंगा तुझीच कृपारे. मी पहिले जाऊन देवापुढे साखर ठेवते." देवकी बोलते.

"प्रतापरावांच्या घरून होकार आला, हे खूप चांगले झाले आहे. पण आता पुढे आपल्याला हे लग्न लवकरात लवकर करावे लागणार आहे. आणि लग्न होईपर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे." आबासाहेब यशवंतरावांना बोलतात.

"ते तर आहेच दादा, पण लग्न लवकर करायचे या संबंधात प्रतापरावांना बरोबर बोलायला लागेल." यशवंतराव बोलतात.

"उद्या आपण प्रतापरावांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करू. तसं तू फोन करून कळव." आबासाहेब बोलतात.

आबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे यशवंतराव, प्रतापरावांना फोन करून दुसऱ्या दिवशी प्रतापरावांच्या घरी भेटायचं नक्की करतात.

आजचा दिवस वैदही आणि अभिमन्यू दोघांसाठीही एकदम दोन टोकाचा होता. एकीकडे वैदही नवीन आयुष्याची स्वप्न बघत होती. अभिमन्यूच्या साथीने आयुष्याचा एक सुखद प्रवास करायचा, असा विचार करत होती.

तर दुसरीकडे अभिमन्यूला मात्र हा प्रवासच नको होता. त्याला त्याच्या एकाकी आयुष्यातून बाहेरच यायचे नव्हते.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आबासाहेब, देवकी, यशवंतराव आणि नर्मदा प्रतापरावांच्या घरी जातात. अभिमन्यू त्यांच्या बरोबर नसतो. पण वैदहीचे डोळे त्याला शोधत असतात. वैदही सगळ्यांच्या पाया पडते.

"अभिमन्यूराव, नाही आले! प्रतापराव बोलतात.

"तो येणारच होता, पण त्याचे जरा काम होते म्हणून तो बाहेर गेला." आबासाहेब बोलतात.

आबासाहेब असे बोलल्यानंतर वैदहीच्या चेहऱ्यावर निराशेची छाया पडते.

"अच्छा....अच्छा.... मी आपलं सहज विचारले. आता घाटभेट होतच राहील." प्रतापराव बोलतात.

"प्रतापराव, आता पुढे काय, कसे करायचे हे ठरवावे लागेल!
आबासाहेब बोलतात.

"आबासाहेब, तुम्ही फक्त सांगा काय काय करायचे, सगळ करण्याची माझी तयारी आहे." प्रतापराव बोलतात.

"नाही... नाही... प्रतापराव आम्हला तुमच्याकडून काही नकोय. मला पण एक मुलगी आहे, त्यामुळे एका बापाचा त्याच्या मुलीवर किती जीव असतो; हे माहित आहे मला.
तुम्ही तुमची मुलगी आमच्या घरात देताय, आमच्यासाठी हेच खूप आहे." आबासाहेब बोलतात.

"आबासाहेब, तुमचे विचार खरच खूप चांगले आहे. तुमच्या सारखा विचार करणारी माणसे आजकाल दुर्मिळ झालिये." प्रतापराव बोलतात.

"प्रतापराव, आम्हाला लग्न एकदम साधे आणि आपल्या जवळच्या लोकांत करायचे आहे. यामुळे लग्नातील जो अनावश्यक खर्च आहे तो वाचेल आणि तोच पैसा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अभी आणि वैदही यांच्या नावाने द्यायचा. असे आम्हाला वाटते." आबासाहेब बोलतात.

"उत्तम विचार आहे आबासाहेब. आम्हाला काहीच अडचण नाहीये." प्रतापराव बोलतात.

"खरतर ही कल्पना आम्हाला, अभिमन्यूने सुचवली. त्याची इच्छा आहे असे करण्याची." यशवंतराव जाणूनबुजून अभिमन्यूचे नाव सांगतात.

अभिमन्यूचे या कल्पनेमागे नाव ऐकून वैदहिच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसतो.

"प्रतापराव, पुढे निवडणुकांचा काळ आहे, हे तुम्हालापण माहीत आहे. त्यामुळे हे लग्न पुढच्या सात ते आठ दिवसांत व्हावे अशी आमची इच्छा आहे." आबासाहेब बोलतात.

आबासाहेब असे बोलल्यानंतर प्रतापराव, शारदा आणि वैदही एकमेकांकडे बघू लागतात....

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक, कॉमेंट, फॉलो करा आणि पुढे काय होईल? अभिमन्यू आणि वैदहीच्या लग्नात काही अडथळा येईल का ? प्रतापराव आठ दिवसांत लग्नासाठी तयार होतील? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.

ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
0

🎭 Series Post

View all