Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - १८

राजकीय फायद्याकरता झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - १८"

अभिमन्यू आणि वैदहीचे लग्न पुढच्या आठ दिवसात करायचे, अशी इच्छा आबासाहेबांनी, प्रतापरावांना सांगितलेली असते. हे ऐकून प्रतापरावांना जरा धक्काच
बसला. प्रतापराव, शारदा आणि वैदही एकमेकांकडे बघू लागले.

क्षणभर शांत राहून प्रतापराव आबासाहेबांना बोलतात, "आबासाहेब.... इतक्या घाई-घाईत लग्न करायचे? आम्ही एवढ्या लवकर लग्न करण्याचा विचारच केला नाही." प्रतापराव बोलतात.

"प्रतापराव तुमचं बरोबर आहे. पण तुम्हालाही माहिती आहे, पुढे निवडणुका आल्या आहेत. निवडणुकीच्या गडबडीत लग्न ठेवले तर काही गडबड नको व्हायला." आबासाहेब बोलतात.

"प्रतापराव, तुम्हाला तर माहीत आहे, निवडणूक म्हटले की लोक किती खालच्या थराला जातात. आणि त्याचा लग्नावर काही परिणाम होऊ नये अस दादाला वाटतं म्हणून तो लग्न लवकर करायचे बोलत आहे." यशवंतराव बोलतात.

"यशवंतराव, तुमचं बरोबर आहे. पण एवढ्या लवकर लग्नाची तयारी कशी करायची? प्रतापराव बोलतात.

"प्रतापराव, तुम्ही एवढी काळजी करू नका! असे पण लग्न आपल्याला साधे करायचे आहे. मग तयारीला पण जास्त वेळ लागणार नाही. तुम्हाला काहीही मदत लागली तर आम्ही आहोतच, तुम्ही निःसंकोचपणे आम्हाला सांगा." आबासाहेब बोलतात.

क्षणभर विचार करून प्रतापराव बोलतात, "ठीक आहे. तुमचं म्हणणं पण बरोबर आहे. आठ दिवसा नंतरचा मुहूर्त आपण ठरवून टाकू."

लग्नाचा मुहूर्त ठरला जातो. एकमेकांना पेढा भरवून तो क्षण साजरा केला जातो.

अभिमन्यू आणि वैदहीच्या लग्नाचा मुहूर्त ठरलेला असतो. वैदहीच्या मनाला वाटत होते की जरा घाई होत आहे पण प्रतापरावांनी हो म्हटल्यावर ती काहीच बोलू शकत नव्हती.
लग्नाचा मुहूर्त ठरल्या नंतर पाटील कुटुंब घरी येते. घरातील सर्व मंडळी हॉल मध्येच बसलेली असतात.

यशवंतराव सगळ्यांना सांगताय की, "अभिच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. आठ दिवसांनी अभिचे लग्न होणार....

यशवंतराव असे बोलताच अभिमन्यू जागेवर उभा राहून बोलून उठतो, "काय?!"

"अभी, काय झाले? देवकी अभिमन्यूला विचारते.

"आई, तुम्ही मला न सांगता लग्नाचा मुहूर्त काढून पण आला; आणि मला विचारते काय झाले?" अभिमन्यू बोलतो.

"तू मला बोलला होता, तू बोलशील ते मी करेल." देवकी बोलते.

"मला नाही लग्न करायचं!" असे बोलून अभिमन्यू तिथून चालू पडतो.

"थांब अभी. तुला जर माझी काळजी वाटत नसेल तर नको करू हे लग्न. आणि एक लक्षात ठेव....तू जर असाच राहणार असशील आणि हे लग्न केलं नाही तर मी तुझ्या सोबत कधीच बोलणार नाही." देवकी बोलते.

देवकीचे हे शब्द त्याच्या काळजावर घाव करतात. अभिमन्यू त्याच्या खोलीत जातो. त्याला खूप एकटे वाटत होते. अभिमन्यूला त्याचे दुःख सहनही होत नव्हते आणि कोणाला सांगता पण येत नव्हते.

इकडे वैदही आनंदात असते. तिचे लग्न ठरले आहे, तेही अभिमन्यू बरोबर. हे तिला सरस्वतीताईंना सांगायचे असते. पण त्याचा काहीच संपर्क होत नाही.

" अभिमन्यू परत आले आहे.... आणि त्यांच्या सोबत माझे लग्न होणार आहे." हे सरस्वतीताईंना कळल्यावर त्यांना खूप आनंद होईल असा विचार करत वैदही स्वप्न फुलवीत असते.

ती रात्र अभिमन्यूसाठी फार जड होती . त्याला वैदहिला सगळे सत्य सांगायचे असते. दुसऱ्या दिवशी सकाळीच अभिमन्यूने त्याच्या भूतकाळातील घटना बद्दल आणि त्याला हे लग्न नाही करायचे हे एका चिठ्ठीत लिहिलेले असते.

आता अभिमन्यूला ही चिठ्ठी वैदही पर्यंत पोहोचवायची असते. त्यासाठी अभिमन्यूने समीरला ( अभिमन्यूचा मित्र ) बोलवून ती चिठ्ठी वैदहिला द्यायला सांगितली होती. समीर ती चिठ्ठी वैदहीकडे घेऊन जात असताना, त्याला यशवंतराव भेटतात.

"काय रे समीर, आज भरपूर दिवसांनी घरी आला." यशवंतराव समीरला विचारतात.

"काका, काही नाही. अभिमन्यूकडे आलो होतो." समीर बोलतो.

"तुला माहित आहे का अभिमन्यूचे लग्न ठरले आहे? यशवंतराव बोलतात.

"हो काका, मला माहिती आहे. आत्ताच अभिने सांगितले." समीर बोलतो.

"समीर, तुला अभिमन्यूचा सर्व भूतकाळ माहित आहे. त्यामुळे मला विश्वास आहे, तू अस काहीच करणार नाही ज्याने अभिमन्यूच्या लग्नात बाधा येईल." यशवंतराव गंभीर होऊन बोलतात.

यशवंतराव बोलल्यानंतर समीर विचारत पडतो. त्याच्या मनाची द्विधास्थिती होते, ही चिठ्ठी वैदहीला द्यावी की नाही....

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक, कमेंट,फॉलो करा आणि पुढे काय होईल? समीर वैदहिला चिठ्ठी देईल? वैदही समीरला ओळखेल? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.

ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all