दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - १९"
अभिमन्यूच्या सांगण्यावरून समीर वैदहिला चिठ्ठी द्यायला चालला होता. पण त्याला घरातच यशवंतराव भेटतात. यशवंतरावशी बोलल्यानंतर, समीर वैदहिला चिठ्ठी द्यायची की नाही अशा द्विधा मनस्थितीत सापडतो.
यशवंतराव यांच्या बरोबर बोलणे झाल्यानंतर समीर तिथून चालू पडतो. पण दरवाजातच थांबतो. त्याला कळत नव्हते, चिठ्ठी घेऊन वैदहीकडे जावे की नाही. तो परत माघारी यशवंतरावांकडे येतो.
"काका, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे." समीर यशवंतरावांना बोलतो.
"हा बोल, काय बोलायचे आहे." यशवंतराव बोलतात.
"काका, अभिने मला एक चिठ्ठी दिली आहे. ती चिठ्ठी त्याने मला, वैदही वहिनींना द्यायला सांगितली आहे." समीर बोलतो.
"बघू दाखव चिठ्ठी." यशवंतराव बोलतात.
समीर ती चिठ्ठी यशवंतरावांना देतो. यशवंतराव ती चिठ्ठी वाचतात. यशवंतराव लगेच समीरला घेऊन देवकी आणि आबासाहेबांकडे घेऊन जातो.
यशवंतराव आणि समीर दोघेही देवकी आबासाहेबांकडे आल्यावर, यशवंतराव त्या दोघांनाही सर्व सांगतात आणि चिठ्ठी त्यांच्याकडे देतात. चिठ्ठी वाचल्यावर देवकी निराश होते.
"हा मुलगा काही शांत बसणार नाही." देवकी निराशेने बोलते.
"आपणच काहीतरी करायला पाहिजे. देवकी तू अभी बरोबर बोलते का?" आबासाहेब बोलतात.
"नाही दादा, मला नाही वाटत त्याचा काही फायदा होईल. अभी काहीच ऐकणार नाही." यशवंतराव बोलतात.
"मग यशवंता तूच सांग काय करायचे?" आबासाहेब बोलतात.
"दादा, वहिनींचे आणि अभिचे अक्षर बऱ्यापैकी सारखेच आहे. वहिनींनी चिठ्ठी लिहितील आणि तीच चिठ्ठी आपण वैदहिला देऊ. वहिनी त्या चिठ्ठीत असे लिहितील ते वाचल्यावर वैदहीच्या मनात अभिबद्दल चांगलेच विचार येतील." यशवंतराव बोलतात.
"भाऊजी, मला काही हे पटत नाही." देवकी बोलते.
"वहिनी, मलाही हे पटतच नाही. पण दुसरा काही मार्गच नाही. जर अभिने दिलेली चिठ्ठी वैदहिने वाचली तर वैदहि सरळ सरळ लग्नाला नकार देईल." यशवंतराव बोलतात.
"भाऊजी, का कोणास ठाऊक पण मला असे वाटत आहे की अभी आणि वैदहीचे लग्न होईलच. मला वाटतंय देवानेच त्यांची गाठ स्वर्गात बांधली आहे." देवकी विश्वासने बोलते.
"वहिनी, असे बोलून कसे चालेल. सगळे नशिबावर सोडायचे का?" यशवंतराव बोलतात.
"भाऊजी, अभिला लग्नाला तयार करण्यासाठी आपण आतपर्यंत कमी प्रयत्न केले का! त्याला कितीतरी मुलींचे स्थळ पण आले होते. तेव्हा तो तयार झाला नाही. आत्ताच कसा तयार झाला? मला आता अस वाटतंय काहीही झाले तरी अभी आणि वैदहीचे लग्न होणारच." देवकी बोलते.
"दादा, तू तरी वहिनींना समजवं." यशवंतराव बोलतात.
"यशवंता, कधी कधी आपल्याला काहीच सुचत नाही. अशा वेळेस नशिबावर अवलंबून राहिलं तर तेच आपल्यासाठी चांगले असते." आबासाहेब बोलतात.
"ठीक आहे, आता तुमच्या दोघांची हीच इच्छा असेल तर मी काय बोलणार! समीर जा तू... दे ती चिठ्ठी वैदहिला." यशवंतराव बोलतात.
यशवंतराव बोलल्यानंतर समीर निघतो. वैदही आणि अभिमन्यूचे लग्न ठरले आहे ही बातमी, आबासाहेबांचे राजकीय विरोधक "सर्जेराव मोहिते" यांच्या पर्यंत पोहचते. सर्जेराव मोहिते जरी आबासाहेबांचे विरोधक असले तरी त्यांचे प्रतापरावांना बरोबर सबंध चांगले होते. प्रतापरावांचे आबासाहेबांपेक्षाही चांगले संबंध सर्जेराव यांच्या बरोबर होते.
पण आबासाहेब, सर्जेरावांपेक्षा खूप मोठी आसामी होती.
पण आबासाहेब, सर्जेरावांपेक्षा खूप मोठी आसामी होती.
"या आबासाहेब पाटलाने भारी डाव टाकला तर! प्रतापरावला स्वतःच्या गटात घ्यायला, पोऱ्याच्या लग्नाचे आमिष दाखवले." सर्जेराव बोलतात.
"बाबा, ही कल्पना तुम्हाला का नाही सुचली? मी केले असते, प्रतापरावांच्या मुलीबरोबर लग्न!" पंकज ( सर्जेरावांचा मुलगा ) बोलतो.
"आरे तुझं तोंड बघितले का आरशात! तू कुठं आणि ती प्रतापरावांची पोरगी कुठं." सर्जेराव बोलतात.
"काय झालंय माझ्या पोराला. एवढा चांगला तर आहे. गुणाच माझं पोरगं!" कामिनी ( सर्जेरावांची पत्नी ) बोलते.
"तुम्ही दोघेपण इथून जा. उगा माझं डोकं नका खाऊ." सर्जेराव चिडून बोलतात.
"आमच्यावर कशावर चिडताय. देसाईंच्या पोरीला, पोरासाठी मागणी घालायचं तुम्हाला सुचलं नाही. तेच आबासाहेबांना सुचलं यात आमची चूक आहे का?" कामिनी बोलते.
सर्जेराव पंकज आणि कामिनिला तिथून काढून देतात. प्रतापराव, आबासाहेबांच्या बाजूने हे राजकीय दृष्ट्या सर्जेरावांना परवडणारे नव्हते.
इकडे वैदही आश्रमात काम करत होती. समीर देखील आश्रमात वैदहिला चिठ्ठी देण्यासाठी आला होता.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक, कमेंट,फॉलो करा आणि पुढे काय होईल? समीर वैदहिला चिठ्ठी देईल? वैदहिला अभिमन्यूच्या भूतकाळ कळेल? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.
ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा