दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - २०"
वैदही आश्रमात काम करत असते. समीर, अभिमन्यूची चिठ्ठी घेऊन आश्रमात आलेला असतो. शुभांगीही आश्रमात वैदहिला भेटण्यासाठी आलेली असते. वैदही कामात असल्याने शुभांगी आश्रमाच्या ऑफिस मध्ये बसते.
शुभांगी ऑफिस मध्ये बसून तिच्या होणाऱ्या नवऱ्याने दिलेली चिठ्ठी वाचत असते. तितक्यात वैदही येऊन तिला घेऊन जाते. शुभांगीची चिठ्ठी तिथेच टेबल वर राहते. शुभांगीची बॅगही तिथेच टेबल वर असते.
वैदही आणि शुभांगी बाहेर आश्रमाचे काम करत असतात. तिथेच समीर अभिमन्यूची चिठ्ठी घेऊन येतो.
"नमस्कार, मी अभिमन्यूचा मित्र समीर. अभिमन्यूने तुमच्यासाठी चिठ्ठी दिलेली आहे." असे समीर वैदहिला बोलून चिठ्ठी देतो.
वैदही चिठ्ठी घेते. समीर तिथून निघून जातो. समीर गेल्यावर शुभांगीला आठवते, वैदही आणि ती एक रात्री घरी जात असताना एक मुलगा दारू पिऊन त्यांच्या रिक्षाला धडकलेला होता. हा मुलगा त्याच्या त्या दारू पिणाऱ्या मित्राला घ्यायला आला होता.
शुभांगी लगेच वैदहिला बोलते, "वैदही, हा मुलगा तुला आठवतो का?"
"नाही, मला आत्ताच कळले की ते अभिमन्यूचे मित्र आहे, आणि तेपण ते बोलल्यावर." वैदही बोलते.
"अगं वेडे, आपण एक दिवस घरी जात असताना एक दारुडा मुलगा आपल्या रिक्षाला धडकला होता. आठवते का तुला, हाच त्याला घ्यायला आला होता." शुभांगी बोलते.
"नाही, मला नाही आठवत." वैदही बोलते.
"वैदही, अभिमन्यू याचे मित्र म्हणजे तो दारू पिऊन रिक्षाला धडकलेला, अभिमन्यू तर नाही ना?" शुभांगी बोलते.
"तुझं डोकं नीट आहे का! अभिमन्यू दारू नाही पित." वैदही चिडून बोलते.
"तुला काय माहित? तू तर त्यांना आत्ता भेटली आहे." शुभांगी बोलते.
"मलाच नाही तर या आश्रमातील सगळ्यांना माहित आहे की अभिमन्यू दारू पिऊ शकत नाही. एकेकाळी अभिमन्यूनी या आश्रमात काम केलेलं आहे. सगळे त्यांना ओळखतात इथे. एक मिनिटे थांब." वैदही बोलते.
वैदही पंढरी काकांना आवाज देऊन बोलवून घेते.
"पंढरी काका, तुम्ही अभिमन्यू पाटील म्हणजेच आबासाहेब पाटील यांचा मुलगा; त्यांना ओळखतात ना!" वैदही बोलते.
" वैदही, तुला पाठीमागेच त्यांच्या बद्दल सांगितले. विसरली का तू?" पंढरी काका बोलतात.
"नाही काका, मी विसरले नाही. फक्त मला एक सांगा; अभिमन्यू दारू पिऊ शकतील का? वैदही पंढरी काकांना विचारते.
"पोरी, एकवेळ सूर्य पश्चिमेकडून उगवेल पण अभिमन्यू दादा असल काही वंगाळ करणार नाही." पंढरी काका बोलतात.
"ठीक आहे पंढरी काका, तुम्ही जावा तुमच्या कामाला." वैदही बोलते.
पंढरी काका जातात.
"तुला अजून काही बोलायचे आहे?" वैदही शुभांगी बोलते.
"पण मग याने त्यादिवशी कोणाला नेले असेल! शुभांगी बोलते.
"शुभांगी, तुझ्या म्हणण्यानुसार हे तेच असतील तर यांना थोडीना अभिमन्यू एकटेच मित्र असतील. अजूनही असू शकता. आणि असेही अभिमन्यू परदेशात होते आत्ताच काही दिवसांपूर्वी ते इथे आले आहे." वैदही बोलते.
"हम... असेही असू शकते. ती चिठ्ठी तर वाच, बघ त्यात काय आहे!" शुभांगी वैदहिला चिडवून बोलते.
"मी तुझ्या समोर का वाचू? माझं मी नंतर वाचेन." वैदही बोलते.
"हो का! आत्ता नवरा आला म्हणून, तू कोण का! शुभांगी बोलते.
शुभांगी असे बोलल्यावर दोघेही हसू लागतात. वैदही एका मुलाला बोलवून चिठ्ठी ऑफिस मध्ये ठेवायला सांगते. तो मुलगा ऑफिस मध्ये गेल्यावर शुभांगीची बॅग त्याला वैदहीची वाटते आणि त्या बॅग मधेच तो चिठ्ठी ठेवतो.
नंतर थोड्या वेळाने शुभांगी निघते. शुभांगी बॅग उचलून तशीच घेऊन जाते. टेबलवर शुभांगीची चिठ्ठी तशीच राहते. वैदही, शुभांगीची चिठ्ठी स्वतःची म्हणून वाचायला घेते. त्यात शुभांगच्या पतीने, शुभांगीसाठी मैत्रीचे शब्द लिहिले होतें.
"लग्नानंतर आपण पती-पत्नी पेक्षा मित्र म्हणून राहू"
"कायम एकमेकांची साथ देऊ"
"आपल्याकडून चुकाही होतील, आपल्या वाद होतील, रुसवे फुगवे होतील पण आपण कायम एकमेकांना समजून घेऊ"
"कायम एकमेकांची साथ देऊ"
"आपल्याकडून चुकाही होतील, आपल्या वाद होतील, रुसवे फुगवे होतील पण आपण कायम एकमेकांना समजून घेऊ"
असे त्या चिठ्ठीत लिहिलेले असते. मुख्य म्हणजे त्यात शुभांगीचे नाव नसल्याने; वैदहिला वाटते ही चिठ्ठी अभिमन्यूनेच हीच तिच्यासाठी दिली आहे.
वैदहीची चिठ्ठी तर शुभांगीकडे गेलेली असते. ती चिठ्ठी नंतर शुभांगी कडून गहाळ होते. शुभांगी तिच्या होणाऱ्या पतीला सांगते; चिठ्ठी गहाळ झाली आहे. तो तिला समजून घेतो आणि चिठ्ठीत जे लिहिले होते ते भेटल्यावर सांगतो.
इकडे वैदही खूप खुश असते. तिने तिच्या नकळत अभिमन्यूची छबी स्वतःच्या मनात एक चांगला व्यक्ती म्हणून केलेली असते. पण पुढे एक भयानक सत्य तिची वाट बघत होते...
मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक, कमेंट,फॉलो करा आणि पुढे काय होईल? वैदहिला चिठ्ठीचे सत्य कळेल? वैदही आणि अभिमन्यूचे लग्न होईल का? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.
ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा