Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - २१

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - २१"

चिठ्ठींच्या अदलाबदली नंतर अखेर तो दिवस येतो, जेव्हा अभिमन्यू आणि वैदहीचे लग्न होणार असते. वैदहिला चिठ्ठी दिली आहे, असे समीरने अभिमन्यूला सांगितलेले असते. तेव्हापासून अभिमन्यू, वैदहीचा तिरस्कार करू लागला होता.

"मी या मुलीला सगळे सांगूनही, ही लग्नाला कशी तयार झाली?" हा प्रश्न अभिमन्यूला सतत भांडवून सोडत होता.

"मी हिला लग्न करू नको, असे सांगितल्यावरही ही मुलगी लग्न करते म्हणजे हिचा काहीतरी स्वार्थ असेल" असे वैदही बद्दल अभिमन्यूला वाटत होते. या सगळ्यामुळे अभिमन्यूच्या मनात वैदहीची एक वाईट छबी तयार झाली होती आणि त्यामुळे अभिमन्यू वैदहीचा तिरस्कार करू लागला होता.

लग्न एकदम साध्या पद्धतीने, घरातच चालू होते. जवळची काही निवडक पाहुण्यांनाच आमंत्रण दिले गेले होते. पाटील कुटुंब आणि देसाई कुटुंब एकदम आनंदात होते.

देवकीला आता चिंता वाटत नव्हती, कारण अभिमन्यूने चिठ्ठीद्वारे वैदहिला सर्व भूतकाळ सांगितला असतानाही, वैदही लग्नासाठी तयार झाली; असे तिला वाटत होते आणि त्यामुळे तिला वैदहीचा अभिमान वाटत होता. पाटील घरात सर्वांनाच वाटत होते की वैदहीने अभिमन्यूच्या भूतकाळाचा स्वीकार केला आहे. जो वैदहिला काहीच माहीत नव्हता.

या सर्व पार्श्वभूमीवर मुहूर्ताची वेळ येते. भटजींची सर्व तयारी झाली होती. आता वेळ होती नवऱ्या मुलाला आणि नवरी मुलीला बोलावण्याची.

"नवऱ्या मुलाला आणि नवरी मुलीला घेऊन या".... असे भटजी सांगतात.

शारदा वैदहिला तर कीर्ती अभिमन्यूला आणण्यासाठी जातात.

अभिमन्यूने पांढरे शुभ्र धोतर, क्रीम रंगाचा रेशमी कुर्ता, गळ्यात साधी उपरणी, डोक्यावर लालसर फेटा असे पेहराव केला होता. पण त्याच्या डोळ्यात तिरस्कार आणि चेहऱ्यावर राग होता. समीर आणि महेशराव अभिमन्यू बरोबर असतात.

कीर्ती अभिमन्यूला विधीला घेऊन जाण्यासाठी आली होती. पण अभिमन्यूचे पाय मात्र निघत नव्हते. जड पावलांनी आणि जड अंतःकरणाने अभिमन्यू तिच्या बरोबर जातो.

इकडे वैदही मात्र आनंदात होती. काठपदरी नऊवारी साडी, तिचा रेशमी पदर, नाकात छोटीशी नथ, कानात छोटेशे झुबे, गळ्यात एक छोटी चैन, कपाळावर चंद्रकोर टिकली, केसांत गजरा आणि एकदम साधा मेकअप अशी तयार झाली होती वैदही.

चेहऱ्यावर एक समाधानाचे स्मितहास्य होते. कोणीही बघतच रहावे असे तिचे सौंदर्य खुलून दिसत होते.

"वैदही, एकदम कडक दिसते. अभिमन्यू राहूदे, आपण दोघीच लग्न करून टाकू." शुभांगी गमतीने वैदहिला बोलते.

"काहीही बोलते का तू!" वैदही बोलते.

"वैदही, नाही... नाही... बोलता; माझ्या नंतर लग्न ठरवून माझ्या अगोदर लग्नाला उभी पण राहिली." शुभांगी बोलते.

"तुला तर माहीत आहे ना; सर्व किती घाईत झाले आहे." वैदही बोलते.

"अगं, मी फक्त गंमत करते. एवढ काय लगेच गंभीर होते. आणि चल लवकर अभिमन्यू जिजू वाट बघत असतील." शुभांगी बोलते.

शुभांगी असे बोलल्यावर दोघीही हसू लागतात. तितक्यात तिथे शारदा येते.

"ऐ पोरींनो, हसत काय बसलाय. आवरा लवकर, मुहूर्ताची वेळ झाली आहे." शारदा बोलते.

"काकू, आपण नक्की जायचेना खाली. नाहीतर बघा, वैदहीचे सौंदर्य बघून पाटलांचे राजकुमार बेशुद्ध पडायचे." शुभांगी बोलते.

शुभांगी असे बोलल्यावर, वैदही तिच्या डोक्यात टपली मारून बोलते, "जास्त फाजीलपणा नको करू."

शारदा आणि शुभांगी, वैदहिला लग्न मंडपात घेऊन येतात. जिथे अभिमन्यू अगोदरच आला होता. शुभांगी वैदहिला नेऊन अभिमन्यूच्या बाजूला बसवते. भटजी त्यांचे विधी चालू करतात.

प्रतापराव, वैदहिला बघून भावूक होतात. कधी आपली मुलगी लग्नाची झाली हे त्यांना कळलेच नाही. आजही लग्न मंडपात नवरी म्हणून बसलेली त्यांची वैदही त्यांना बोबडी बोलणारी लहानगी पोरगीच वाटत होती. त्या काही क्षणांत वैदहीचे आतापर्यंतचे सर्व आयुष्य, बालपण त्यांच्या नजरे समोरून जाते. प्रतापरावांच्या डोळ्यात त्यांच्याही नकळत आपोआप अश्रू येतात.

अभिमन्यूला लग्नं मंडपात बघून देवकीही भावुक होते. तिच्याही नजरे समोरूनही अभिमन्यूचा भूतकाळ जातो. माझ्या पोराचं कस होईल! या चिंतेने तिने काढलेले दिवस देवकीला आठवतात. माझा पोराचा कोणी हात हातात घेईल का! असा कायम विचार करणाऱ्या देवकीला आज तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. अभिमन्यूला बघून देवकीचेही डोळे पाणवतात.

शेवटी ती वेळ येते. अभिमन्यू सगळ्यांच्या साक्षीने वैदहीच्या गळ्यात "मंगळसूत्र" बांधतो. नंतर भटजी अभिमन्यू आणि वैदही यांना सात फेरे घेण्यासाठी उठवतात. सात फेरे होता असताना, एकमेकांना वचने दिली जात होती.

सात फेरे वैदहीच्या मनात भावना होती की,
"माझे पती माझी कायम साथ देतील"....
"मला ते कधीच अंतर देणार नाही"....

वैदहीच्या मनात अभिमन्यू बद्दल विश्वास, आदर, सन्मान होता.

परंतु अभिमन्यूच्या मनात वैदही बद्दल फक्त तिरस्कार होता. अभिमन्यूच्या मनात चालले होते,
"मी या मुलीला कधीच माफ करणार नाही"....
"मी हिला असे सहजासहजी सोडणार नाही"....
"मी हिला कधीच सुख लाभू देणार नाही"....

दोघांच्या या विचारातच त्यांचे सात फेरे पूर्ण होतात. दोन जीव देवा-ब्राह्मणाच्या, उपस्थित सर्वांच्या साक्षीने लग्नाच्या बंधनात अडकले जातात. पण एक विश्वासावर आणि एक तिरस्कारावर...

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हांला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. लाईक, कमेंट,फॉलो करा आणि पुढे काय होईल? वैदहिला अभिमन्यूचे सत्य कधी कळेल? सत्य कळल्यानंतर वैदही, अभिमन्यू बरोबर थांबेल का? काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि कथा शेअर करा.

ही कथा पूर्णता काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
0

🎭 Series Post

View all