दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - २२"
अभिमन्यू आणि वैदहीचे लग्न पार पडते. वेळ असते निरोपाची. वैदही कायमची पाटलांच्या घरी जाणार होती. वैदही नजर बाबांना शोधत असते, आणि तिला बाबा दिसतात.
वैदही बाबांकडे जाऊन त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागते. तिचे बाबांचे घर आता तिच्यासाठी परके झाले होते,आणि तिच्या बाबांसाठी त्यांचा काळजाचा तुकडा परका झाला होता.
दोघांच्याही आठवणी जाग्या होतात.
"लहानपणी वैदहीसाठी घोडा झालेला बाबा"....
"आई नसल्यावर तिची वेणी बांधणारा बाबा"....
"वैदहिला वाईट काळात तिच्या बरोबर खंबीरपणे उभा राहणारा बाबा"....
"तिचे हट्ट पुरवणारा बाबा"....
अशा सगळ्या आठवणी ताज्या होत होत्या.
"लहानपणी वैदहीसाठी घोडा झालेला बाबा"....
"आई नसल्यावर तिची वेणी बांधणारा बाबा"....
"वैदहिला वाईट काळात तिच्या बरोबर खंबीरपणे उभा राहणारा बाबा"....
"तिचे हट्ट पुरवणारा बाबा"....
अशा सगळ्या आठवणी ताज्या होत होत्या.
प्रतापरावांच्याच बाजूला उभी असलेल्या शारदावर, वैदहीची नजर जाते, आणि लगेच तोंडातून उद्गार निघतात, "आई"...
वैदही शारदाच्या गळ्यात पडते. दोघींच्याही डोळ्यातून अश्रु येतात. त्यांच्याही आठवणी जाग्या होतात.
"लहानपणी जेवण भरवणारी आई ते मोठेपणी जेवण बनवायला शिकवणारी आई"....
"बाबांपासून वाचविणारी आई ते बाबांना तक्रारी करणारी आई"...
"पोरीला फटका दिल्यानंतर, तिच्यापेक्षा जास्त त्रास होणारी आई"...
"बाबांपासून वाचविणारी आई ते बाबांना तक्रारी करणारी आई"...
"पोरीला फटका दिल्यानंतर, तिच्यापेक्षा जास्त त्रास होणारी आई"...
असे सर्व डोळ्यासमोर येते.
देवकी पुढे येऊन वैदही आणि शारदाला धीर देते.
"आबासाहेब, सांभाळा माझ्या पोरीला. खूप लाडात वाढली आहे माझी वैदही. त्यामुळे कधी जर तिच्याकडून चूक झालीना; माझ्यावर रागवा, मला फटके द्या पण माझ्या चिमणीला काही बोलू नका." प्रतापराव भावुक होऊन बोलतात.
"प्रतापराव, मी एकच बोलेल. आमची सून नाही तर आमची मुलगी घेऊन चाललो आहे." आबासाहेब असे बोलून प्रतापरावांना मिठी मारतात.
"देवकी ताई, मी माझ्या मुलीला सर्व संस्कार देण्याचे प्रयत्न केले. जरी ती कुठ कमी पडली तर ती माझी कमी समजा. माझ्यात नव्हते म्हणून तिच्यात आले नाही, असे समजा."
शारदा, देवकीला बोलते.
शारदा, देवकीला बोलते.
"वैदहीच्या आई, ज्यादिवशी तुम्हाला असे वाटेल की, मी तुमच्या मुलीला सून म्हणून वागवले आहे त्यादिवशी तुम्ही बोलाल ती शिक्षा मी भोगेन." देवकी, शारदाला बोलते.
प्रतापराव, अभिमन्यूच्या जवळ जातात. अभिमन्यू समोर हात जोडून प्रतापराव बोलतात, " अभिमन्यूराव काळजी घ्या माझ्या पोरीची. तिला तुमच्या स्वाधीन केले आहे."
इतका वेळ तिरस्काराच्या भावनेत असलेला अभिमन्यू, प्रतापरावांनी हात जोडल्यावर आपोआप त्यांचे हात हातात घेतो. तो काहीच बोलत नाही पण त्याच्या मनातला तिरस्कार त्या वेळेपुरता नाहीसा होतो.
निघण्याची वेळ होते. वैदही एकदा परत आई, बाबा, शुभांगीला भेटून घेते. त्यांचा निरोप घेऊन वैदही सासरी जाण्यासाठी निघते....
अभिमन्यू आणि वैदही पाटील वाड्याच्या दरवाजात उभे असतात. कीर्तीने त्यांचा दरवाजा अडवलेला असतो.
"अगोदर उखाणा घ्या तरच तुम्हाला घरात प्रवेश मिळेल." कीर्ती बोलते.
वैदही लाजते पण अभिमन्यू चिडून बोलतो, "मी काही उखाणा - बिखाणा घेणार नाही."
क्षणभर वैदहिला वाटते, अभिमन्यू असे का बोलले असतील. नंतर तिला वाटते, दगदगीमुळे त्यांची चिडचिड होत असेल.
"पोरकट पणा बंद करा, असेही पोरं थकली असतील. त्यांना लवकर आत घ्या." आबासाहेब बोलतात.
"वैदही तुला घ्यायचा आहे का उखाणा?" देवकी वैदहिला विचारते.
"आबा, आई वैदहिला तरी घेऊद्या उखाणा! वैदही, अभिला नको घेऊदे, तू घे उखाणा." कीर्ती बोलते.
"गोकुळच्या गोड गाण्यात, राधा कृष्णाचा साज सजला;
अभिमान्युरावांचे नाव घेते, आयुष्यभराची साथ भेटली मजला."
अभिमान्युरावांचे नाव घेते, आयुष्यभराची साथ भेटली मजला."
वैदही उखाणा घेते. सर्वजण टाळ्या वाजवतात, वैदहीचे कौतुक करतात.
वैदही माप ओलांडून, अभिमन्यूच्या साथीने पाटील घरत प्रवेश करते. पाटील वाडा आता तिचा झाला होता. अभिमन्यूच्या साथीने तिला नवीन आयुष्याची सुरुवात करायची होती. पण तिला माहीत नव्हते तिने रंगवलेले स्वप्न तिला किती त्रास देणार आहे.
कीर्ती, अभिमन्यू आणि वैदहीला बसायला सांगते. पण अभिमन्यू अंगावरची उपरणी झटकून रागात वरती त्याच्या खोलीत निघून जातो.
अभिमन्यूच्या अशा वागण्याने वैदहिला जरा धक्का बसतो. पण कीर्ती तिला समजावते.
"कीर्ती, वैदहिला जरा आमच्या खोलीत घेऊन जा. वैदही, जा वर जाऊन जरा आराम कर. उद्या तुमची सत्य नारायणाची पूजा होईल. मग तुमच्या संसाराला सुरुवात होईल." देवकी बोलते.
कीर्ती, वैदहिला आराम करण्यासाठी घेऊन जाते.
"वैदही तू बस इथे, आराम कर. काही मदत लागली तर आवाज दे. मी बघते आईला काही मदत हवी आहे का!" असे बोलून कीर्ती खाली हॉल मध्ये येते.
वैदही अभिमन्यूच्या वागण्याचा विचार करत असते.
"अभिमन्यू का चिडून गेले असतील?"....
"ते माझ्यावर चिडले असतील का?"....
"त्यांच्या मनात काय असेल?"....
"अभिमन्यू का चिडून गेले असतील?"....
"ते माझ्यावर चिडले असतील का?"....
"त्यांच्या मनात काय असेल?"....
असा विचार वैदही करत असते. नंतर वैदहिला वाटते अभिमन्यूची दगदगीमुळे चिडचिड झाली असेल.
वैदही विचारात असतानाच तिचा फोन वाजतो. तिला सरस्वतीताईंचा फोन आले असतो....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा