Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - २३

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - २३"

वैदही खोलीत एकटीच विचार करत बसली होती. तितक्यात तिचा फोन वाजतो. तिला सरस्वतीताईंचा फोन आलेला असतो. सरस्वतीताईंचा फोन आलेला बघून वैदहीला खूप आनंद होतो. ती कॉल उचलते.

"हॅलो, ताई तुम्ही कशा आहात? आणि कुठे आहात? मी तुम्हाला किती वेळा कॉल केला पण तुमचा कॉल लागलाच नाही." वैदही फोनवर सरस्वतीताईंना बोलते.

"हॅलो, अगं वैदही जरा श्वास घे. किती प्रश्न विचारशील. मी आले आहे परत, आता आश्रमात आहे." सरस्वतीताई बोलतात.

"काय! तुम्ही परत आला आहात. केव्हा? तुम्ही मला अगोदर कॉल का नाही केला?" वैदही बोलते.

"दिल्ली मध्येच माझ्या फोनला जरा प्रॉब्लेम झाला होता. मला तिकडे पाहिजे तशा फोन भेटला नाही म्हणून मग आता इथे आल्यावर घेतला आहे." सरस्वतीताई बोलतात.

"अच्छा, हो का. त्या मुलीचे काय झाले? तिला तिचे आईवडील भेटले का? वैदही बोलते.

" हो, भेटले तिला तिचे आईवडील. सर्व खात्री केली आणि मग नंतरच तिला त्यांच्या स्वाधीन केले." सरस्वतीताई बोलतात.

"चांगलेच झाले! बाकी काय तुम्ही ठीक आहात ना?" वैदही बोलते.

"हो, मी ठीक आहे. तू कुठे आहे? आश्रमात येना." सरस्वतीताई बोलतात.

"ताई मला आत्ता यायला नाही जमणार. मी उद्या येईल." वैदही बोलते.

" बर ठीक आहे. पण अशा कोणत्या कामात आहे, त्यामुळे तू मला भेटायला येत नाही." सरस्वतीताई बोलतात.

"ताई ते तुमच्यासाठी सरप्राइज आहे. तुम्हाला ते सरप्राइज बघून खूप आनंद होईल." वैदही बोलते.

"असं काय सरप्राइज आहे? सरस्वतीताई बोलतात.

"ताई, सरप्राइस आहे, उद्याच कळेल." वैदही बोलते.

वैदही, सरस्वतीताईं यांचे बोलणे चालू असते. इकडे अभिमन्यूने स्वतःच्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलेले असते. देवकी त्याच्या सोबत बोलायला जाते, तरी तो दरवाजा खोलात नाही.

देवकीही त्याला जबरदस्ती करत नाही. त्याला त्याचा वेळ घेऊन देते. खाली हॉल मध्ये सर्वजण बसलेले असतात.

"देवकी, तू गेली होतीना अभीशी बोलायला; काय म्हटला अभी?" आबासाहेब बोलतात.

"मी प्रयत्न केला अभीशी बोलण्याचा पण त्याने दरवाजा नाही उघडला. नंतर मीच विचार केला, त्याला त्याचा वेळ घेऊन देऊ आणि मग नंतर बोलू त्याच्या सोबत." देवकी बोलते.

"ठीक आहे. घेऊदे त्याला त्याचा वेळ. त्याच्या सोबत कोणीही थट्टा करू नका. आणि वैदही बराच वेळ एकटी बसली आहे तिच्या सोबत कोणीतरी बोलायला जा." आबासाहेब बोलतात.

आबासाहेबांनी सांगितल्या नंतर देवकी, नर्मदा, कीर्ती वैदहीकडे जातात. वैदही विचार करत बसलेली असते. या तिघींना आलेले बघून वैदही उठून उभी राहते.

"आग बस... बस... कशाला उठली! आम्ही तुझ्या सोबत बोलायलाच आलो आहोत." देवकी बोलते.

"आई, एक बोलू का?" वैदही देवकीला बोलते.

"विचारतेस काय, बोल काय बोलायचे तुला." देवकी बोलते.

"आई, मला असे बसून राहण्याची सवय नाहीये. मला खूप कंटाळा आला आहे. मला काही काम असेल तर करूद्याना." वैदही बोलते.

"काही काम नाही करायचं. आणि तुला कंटाळाच आला आहे तर आमच्या सोबत गप्पा मार. त्यासाठीच तर आलोय आम्ही." देवकी बोलते.

यांच्या गप्पा अशाच चालू राहतात. इकडे अभिमन्यू स्वतःशीच भांडत होता. या लग्नासाठी त्याने तयारच व्हायला नव्हते लागत असे त्याला वाटत होते. यातच लग्नाचा दिवस जातो.

दुसरा दिवस उजाडतो. पाटील घरात सत्यनारायण पूजेची तयारी चालू होती. कीर्ती पूजेसाठी वैदहिला तयार करत होती. यशवंतराव, अभिमन्यूला पूजेसाठी तयार करण्यासाठी गेले होते पण अभिमन्यू त्यांचे ऐकत नाही.

यशवंतराव देवकीला येऊन सांगतात, "वहिनी, अभी पूजेला बसणार नाही बोलतोय."

"आता काय करायचे या पोराचे, परत हा तसंच करायला लागला." देवकी बोलते.

"तू जा अभिकडे त्याला समजून सांग. पाहुणे आले आहे, उगाच पाहुण्यामध्ये तमाशा नको." आबासाहेब बोलतात.

अभिमन्यू खोलीत एकटा बसलेला असतो. देवकी त्याला पूजेसाठी तयार करण्यासाठी जाते.

"अभी, चल पूजेला. पूजेची वेळ झाली आहे." देवकी बोलते.

"आई, मला नाही यायचे पूजेला." अभिमन्यू बोलतो.

"नाही यायचं म्हणजे; तुझ्याच लग्नाची पूजा आहेना!" देवकी बोलते.

"कोणात लग्नं, कसलं लग्न सर्व माझ्याकडून जबरदस्तीने करून घेतले आहे." अभिमन्यू बोलतो.

"अभी बघ, एक दिवस तूच मला बोलशील. आई, बरं झालं तुम्ही माझं लग्न वैदही बरोबर लावून दिले. खाली पाहुणे आले आहे, देसाई आले आहे. तू जर खाली नाही आला तर खूप गोंधळ होईल." देवकी बोलते.

"जे व्हायचय ते होऊदे. मी नाही येणार." अभिमन्यू बोलतो.

"ठीक आहे. मी त्यांची जाऊन माफी मागते. आता तुलाच जर मला त्यांच्यापुढे झुकवायचं आहे तर कोण काय करणार." असे बोलून देवकी चालायला लागते.

"थांब आई, येतो मी खाली." अभिमन्यू बोलतो.

अभिमन्यू पूजेला बसतो. पूजा एकदम चांगली पार पडते. अभिमन्यू आणि वैदही सगळ्यांचे आशीर्वाद घेतात.

"आत्ता खरी तुमच्या संसाराला सुरुवात झाली." असे शारदा आणि प्रतापराव बोलतात.

पाटील घरातील मात्र कोणीच काहीही बोलत नाही. कारण त्यांना अभिमन्यू काय बोलेल याची भीती असते. सर्व पाहुणे पूजा झाल्यावर जातात. वैदही आश्रमात जाण्यासाठी देवकीची परवानगी घेते आणि देवकी तिला परवानगी पण देते.

सरस्वतीताई आश्रमात काम करत असतात. त्या त्यांच्या कामात व्यस्त असतात तोच वैदही येऊन त्यांना आवाज देते "ताई...."

सरस्वतीताईंची नजर वैदहीच्या गळ्यातील मंगळसूत्र जाते. आणि त्या उठून उभ्या राहतात....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all