दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - २४"
सरस्वतीताई काम करत असताना वैदही त्यांच्या समोर येऊन उभी राहते. वैदहीच्या गळ्यातील मंगळसूत्र बघून सरस्वतीताईंना धक्का बसतो. त्या खुर्चीवरून उठून उभ्या राहतात. त्यांच्या हातात फाईल असते.
"वैदही, हे काय? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र!" सरस्वतीताई आश्चर्याने विचारतात.
"ताई, माझं लग्न झालं आहे." वैदही आनंदाने बोलते.
"तू मस्करी करतेना" सरस्वतीताई बोलतात.
"नाही ताई, मी मस्करी नाही करत. आणि तुम्हाला वाटते का मी अशी मस्करी करेल!" वैदही बोलते.
"म्हणजे तुला हे सरप्राइज द्यादचे होते तर. पण एवढ्या घाईत का केले लग्न? तुला तर इतक्यात लग्न नव्हते करायचे." सरस्वतीताई बोलतात.
"हो ताई, मला इतक्यात लग्न नव्हते करायचे. पण घाई घाईत जमले, आणि घाई घाईतच झाले. बाबांनी मुहूर्त लवकरचा ठरवला. मग मीपण काही बोलू शकले नाही." वैदही बोलते.
"ठीक आहे. अभिनंदन तुझे. पण मुलगा कोण आहे? काय करतो? सरस्वतीताई बोलतात.
" ताई तुमच्यासाठी खरं सरप्राइज तेच आहे. माझ्या पतीचे नाव ऐकले तर तुम्हाला खूप आनंद होईल." वैदही बोलते.
"हो का. असा कोणता मुलगा आहे, ज्याचे नाव ऐकल्यावर मला आनंद होईल." सरस्वतीताई बोलतात.
"ताई ते आहे, अभिमन्यू आबासाहेब पाटील." वैदही बोलते.
वैदहीच्या तोंडून हे नाव ऐकून, सरस्वतीताईंच्या हातातली फाईल झपकन खाली पडते. त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्या खुर्चीवर बसून घेतात. त्यांच्या डोळ्यासमोर एकदम अंधार येतो. त्यांना काही क्षण काहीच सुचत नाही.
"ताई, मी म्हटले होतेना तुम्हांला धक्का बसेल." वैदही बोलते.
"वैदही तू खरंच मला खूप मोठा धक्का दिला आहे. पण वैदही लग्ना अगोदर तू मला एक कॉल करायचा होता." सरस्वतीताई बोलतात.
"ताई मी प्रयत्न केला होता तुम्हाला कॉल करायचा पण तुमचा कॉल लागलाच नाही." वैदही बोलते.
"वैदही, तू इतकी आनंदात आहेस म्हणजे तुला भूतकाळातील काही घटना माहीत नाही वाटतं?" सरस्वतीताई बोलतात.
"कोणत्या घटना ताई?" वैदही बोलते.
"म्हणजे तुला नाही माहित. अभिमन्यू तुझ्या पासून काही लपविण्याचा प्रयत्न करेल असे मला नाही वाटत." सरस्वतीताई बोलते.
"ताई, तुम्हांला काय बोलायचे आहे? वैदही बोलते.
"तुला माझ्याकडून कळण्या ऐवजी अभिमन्यूकडून कळलेलं बरं. तू जा घरी." सरस्वतीताई बोलतात.
सरस्वतीताई बोलल्यानंतर वैदही घरी जाण्यासाठी निघते. घरी जाताना तिच्या डोक्यात सरस्वतीताई जे बोलल्या त्याचेच विचार चालू होते.
"ताई कोणत्या भूतकाळाबद्दल बोलत होत्या...."
"अभिमन्यूनी माझ्यापासून काही लपवले आहे का...."
"अभिमान्यूचां काही भुतकाळा असेल का...."
"अभिमन्यूनी माझ्यापासून काही लपवले आहे का...."
"अभिमान्यूचां काही भुतकाळा असेल का...."
असे असंख्य विचार वैदहीच्या मनात चालू होते. त्या विचारात वैदही घरी पोहचते. रात्र झालेली असते वैदही तोच विचार करत खोलीत बसलेली असते.
रात्रीच्या जेवणाची वेळ होते. वैदही जेवायला आली नाही म्हणून देवकी वैदहिला जेवणासाठी बोलवायला जाते. तेव्हा देवकीला जाणवते की वैदही कसला तरी विचार करते.
"काय ग वैदही, कसला एवढा विचार करते." देवकी बोलते.
"नाही, आई काही नाही." वैदही बोलते.
"चल मग जेवायला. सगळे खाली वाट बघत आहे." देवकी बोलते.
"आई, एक विचारू?" वैदही बोलते.
"तू असं का विचारू... विचारू विचारत असतेस. तुला सांगितले आहे मनात आले ते निःसंकोच पणे विचारायचे. विचार काय विचारायचे आहे." देवकी बोलते.
"आई, अभिमन्यूंचा काही भूतकाळ होता का? वैदही बोलते.
वैदही असे बोलल्या बरोबर देवकीच्या लक्षात येते की, हिला अभिमन्यूच्या भूतकाळाबद्दल काही माहीत नाहिये. जेवायचे असते म्हणून तो विषय त्यावेळेस देवकी टाळते.
"अगोदर जेवण करू, मग बोलू आपण." असे बोलून देवकी वैदहिला जेवायल घेऊन जाते.
वैदही जेवणाच्या टेबल जवळ जाते पण तिला अभिमन्यू दिसत नाही.
"आई, अभिमन्यू नाहीये का जेवायला? वैदही बोलते.
"नाही, तो बाहेर गेला आहे. तो आला की जेवेल तो." देवकी बोलते.
"मग आई मी अभिमन्यू आल्यावरच जेवते." वैदही बोलते.
"त्याला यायला उशीर होईल, कदाचित तो बाहेरून जेऊन पण यायला बसला. त्यामुळे तू जेवायला बस." देवकी बोलते.
देवकीने सांगितल्यानंतर वैदही जेवायला बसते. सगळ्यांचे जेवण आटोपते. वैदही जेवण करून झाल्यानंतर पुन्हा खोलीत जाते.
वैदही गेल्यावर देवकी घरातील सर्वांना बोलते,"बहुतेक अभिमन्यूचा भूतकाळ वैदहिला माहित नाही."
"अभिने तर तिला चिठ्ठी लिहून दिली होती. मग तुला कशावरून असे वाटते." आबासाहेब बोलतात.
"वैदही मला विचारत होती, अभिमन्यूचा काही भुतकाळा आहे का. जर तिला माहीत असते तर तिने मला कशाला विचारले असते." देवकी बोलते.
"दादा, वहिनी बोलताय ते विचार करण्यासारखे आहे." यशवंतराव बोलतात.
"हम... विचार करण्यासारखे आहे पण अभिने तिला तर चिठ्ठी पाठवली होती. पण बघू पुढे काय होतेय ते सत्य कळेल कधी ना कधी." आबासाहेब बोलतात.
सगळ्यांच्या गप्पा झाल्यावर सर्व झोपायला जातात. इकडे वैदही, अभिमन्यूची वाट बघत होती. तिला अभिमन्यूला भूतकाळाबद्दल विचारायचे होते. ती विचार करत होतीच तोच अभिमन्यू आलेला असतो.
अभिमन्यूच्या हातात दारूची बाटली होती. त्याच्या शर्टाची काही बटण उघडी होती. केस विस्कटलेले होते. तोंडातून वास येत होता. आणि त्याला धड उभे पण राहता येत नव्हते.
अभिमन्यूची ही अवस्था बघून वैदहीच्या पाया खालची जमीनच सरकते. तिला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही.
वैदही तशीच पुतळ्या सारखी उभी राहते....
वैदही तशीच पुतळ्या सारखी उभी राहते....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा