दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - २५"
वैदही खोलीमध्ये एकटीच विचार करत बसलेली असते. तोच अभिमन्यू दारू पिऊन आलेला असतो. त्याला बघितल्यावर वैदहिला काही क्षण काहीच सुचत नाही. तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते.
थोडा वेळ गेल्यावर वैदहिला, अभिमन्यू बरोबर बोलायचे असते. पण अभिमन्यू बोलायच्या अवस्थेत नव्हता. अभिमन्यू कपाटातून कसल्या तरी गोळ्या काढून खातो.
वैदहिला प्रश्न पडतो या गोळ्या कसल्या असतील?
वैदहिला प्रश्न पडतो या गोळ्या कसल्या असतील?
काही वेळ निघून जातो. वैदही आहे त्याच जागेवर उभी होती.
ती अभिमन्यूकडे बघत होती. अभिमन्यू रडायला लागतो. वैदहिला काहीच कळत नाही काय होत आहे. ती अभिमन्यू जवळ जाऊन त्याला विचारू लागते, "तुम्हाला काय होतंय अभिमन्यू. तुम्हाला काही त्रास होतोय का?"
ती अभिमन्यूकडे बघत होती. अभिमन्यू रडायला लागतो. वैदहिला काहीच कळत नाही काय होत आहे. ती अभिमन्यू जवळ जाऊन त्याला विचारू लागते, "तुम्हाला काय होतंय अभिमन्यू. तुम्हाला काही त्रास होतोय का?"
अभिमन्यूचे रडणे काही थांबत नाही. रडता रडता तो बोलत असतो.
"आरे नका त्रास देऊ तिला..."
"मला त्रास द्या, मला करा काय करायचं ते..."
"मला मारून टाका...."
"आई, मला नाही जगायचं...."
"मला त्रास द्या, मला करा काय करायचं ते..."
"मला मारून टाका...."
"आई, मला नाही जगायचं...."
अभिमन्यूची ही अवस्था वैदहिला बघवत नाही. अभिमन्यू पुन्हा दारू प्यायला लागतो. अभिमन्यू स्वतःचे डोकं पकडतो जोरात ओरडतो, "आई, खूप डोक दुखतंय. आस वाटतंय डोक फुटून जाईन. मला कोणीतरी मारून टाका."
असे बोलून अभिमन्यू पुन्हा दारू पिऊ लागतो. वैदहिला आता काहीच सुचत नव्हते. ती पूर्णपणे घाबरलेली असते.
वैदही तशीच धावत देवकीच्या खोलीकडे जाते.
वैदही तशीच धावत देवकीच्या खोलीकडे जाते.
"आई, आबा दरवाजा उघडा." वैदही जोराजोरात दरवाजा ठोकत बोलते.
देवकी दरवाजा उघडून बोलते, "काय ग वैदही काय झाले?"
"आई तुम्ही चला लवकर. अभिमन्यू बघा कसे करताय!" वैदही बोलते.
वैदही बोलताच देवकी, वैदही आणि आबासाहेब धावत अभिमन्यूच्या खोलीत जातात.
देवकीला बघताच अभिमन्यू देवकीच्या मांडीवर डोके ठेवून रडत बोलतो, "आई खूप त्रास होतोय. जगूशी नाही वाटत."
देवकी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलते, "तू गोळ्या घेतल्या का?"
"हो आई त्यांनी कपाटातून कसल्या तरी गोळ्या घेतल्या आहे." वैदही असे बोलून देवकीला त्या गोळ्या दाखवते.
देवकीने ईशारा करून गोळ्या बरोबर आहे असे सांगितल्यावर वैदही गोळ्या ठेवून देते. थोडावेळ जातो, मग अभिमन्यू झोपी जातो. वैदही, आबासाहेब आणि देवकीकडे बघते. दोघांच्याही डोळ्यात पाणी होते.
"वैदही, जेवायला जायच्या अगोदर तू मला विचारत होती; अभिमन्यूचा भूतकाळ काय आहे म्हणून. तुला माहित नाही का?" देवकी बोलते.
"नाही आई, मला काहीच माहित नाही." वैदही बोलते.
"पण लग्ना अगोदर अभिने तर तुला चिठ्ठीत सर्व लिहून पाठवले होते." देवकी बोलते.
"नाही आई, मला असली कोणतीही चिठ्ठी नाही मिळाली." वैदही बोलते.
"अभिने लग्ना अगोदर तुला चिठ्ठी पाठवली नव्हती. हे कस शक्य आहे?" देवकी बोलते.
"आई, लग्ना अगोदर मला अभिमन्यूची एक चिठ्ठी मिळाली होती पण त्यात त्यांच्या भूतकाळाबद्दल काहीच नव्हते." वैदही असे बोलून ती चिठ्ठी देवकीला दाखवते.
चिठ्ठी बघितल्यावर देवकी बोलते,"वैदही, ही अभिमन्यूने तुला दिलेली नसेल कारण हे अक्षरच अभिचे नाहीये."
"काय!" वैदही बोलते.
"मला वाटत या विषयावर आपण सकाळी बोलू, अभी पण झोपला आहे. रात्रपण खूप झाली आहे. वैदही चालेलना सकाळी बोललेले?" आबासाहेब बोलतात..
"हो चालेल आबा." वैदही बोलते.
आबासाहेब आणि देवकी निघून जातात. अभिमन्यू शांतपणे झोपलेला असतो. वैदहीची मात्र झोप उडालेली असते. जे काही दृश्य तिने तिच्या डोळ्यांनी बघीतले होते त्यावर तिचा विश्वास बसत नाही.
हातातली चिठ्ठी बघत "ही चिठ्ठी कोणाची असेल" असा विचार करते.
"अभिमन्यूच्या भूतकाळ काय असेल?"
"त्यांना कसला त्रास होत असेल"
"अभिमन्यू मृत्यू का मागत असतील"
"अभिमन्यूच्या भूतकाळ काय असेल?"
"त्यांना कसला त्रास होत असेल"
"अभिमन्यू मृत्यू का मागत असतील"
असे कित्येक विचारांचे चक्र वैदहीच्या मनात चालू असते. संपूर्ण रात्र याच विचारात जाते. दुसऱ्या दिवशीचा सूर्य उजळतो. आजचा दिवस वैदहीसाठी एक भयाण सत्य घेऊन आला होता.
सकाळीच वेळ होती. वैदही रात्री ज्या जागेवर बसलेली होती त्याच जाग्यावर आत्ताही बसलेली असते. तेवढ्यात अभिमन्यूही थोडासा कण्हत "आई... गsss" उठतो. वैदही त्याच्याकडं बघत असते. अभिमन्यू उठतो आंघोळ करण्यासाठी जातो. अभिमन्यू आंघोळ करून बाहेर देखील येतो पण वैदही त्याच जागेवर बसलेली असते. अभिमन्यू, वैदही सोबत बोलण्याचा प्रयत्न करतो.
"मी तुला लग्न करू नको; असे सांगितले होते तरी तू लग्न का केले?" अभिमन्यू बोलतो.
वैदही काहीच बोलत नाही.
"अशी शांत का आहे? मला माझ्या इच्छेविरुद्ध तयार केले तसेच तुलाही जबरदस्ती हे लग्न करावे लागले का?" अभिमन्यू बोलते.
"नाही, मी माझ्या मनाने तयार झाली. माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केली नव्हती." वैदही बोलते.
"मग का? मी तर तुला चिठ्ठीत सर्व सत्य लिहून पाठवले होते. तरीही तू का तयार झाली?" अभिमन्यू बोलतो.
वैदही ती चिठ्ठी अभिमन्यूकडे देत बोलते, "मला ही चिठ्ठी भेटली."
अभिमन्यू चिठ्ठी बघितल्यावर बोलतो, "ही मी लिहिलेली चिठ्ठी नाही. म्हणजे माझी चिठ्ठी कोणीतरी बदलली आहे. जर कोणीही ही चिठ्ठी बदलेली असेल तर त्याला मी सोडणार नाही. मग ती व्यक्ती कोणीही असेल."
अभिमन्यूचा पारा चढलेला असतो. त्याला वाटते घरातल्याच कोणीतरी हे केले असणार. त्यामुळे जाब विचारण्यासाठी तो रागात निघतो....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
