दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - २७"
अभिमन्यूने, वैदहिला दिलेली चिठ्ठी तिला का भेटली नाही याचे सत्य उघडकीस आले होते. अभिमन्यू निराश होऊन घराबाहेर निघून गेला होता. वैदही सोप्यावर शांतपणे बसली होती. तिच्या मनात असंख्य प्रश्नांचे काहूर चालले होते. देवकी तिला धीर देत होती.
"तुला आता काय वाटत असेल हे मी समजू शकते. आम्हां सर्वांना असेच वाटत होते की तुला सर्व माहित आहे. पण सत्य हे असे निघेल याची कल्पना कोणीच केली नव्हती." देवकी धीर देत वैदहिला बोलते.
वैदही काहीच बोलत नाही. काय बोलावे हेच तिला कळत नव्हते.
"हे बघ, मी तुझी आईच आहे. तुला माझ्या बरोबर जे काही बोलायचे आहे ते तू निःसंकोच पणे बोलू शकते." देवकी बोलते.
"आई, मला एक कळत नाही मीच का? म्हणजे माझा तुमच्या कोणाबद्दल, अभिमन्यू बद्दल राग नाहीये. जे झालंय त्याचा दोषपण मी कुणाला देत नाही. फक्त माझा एकच प्रश्न आहे मीच का?" वैदही रडत बोलते.
"तूच का! याचे उत्तर तरी मला एकच वाटते. देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे द्यायचे ते देतो. तुझ्यात हे सांभाळण्याची, सहन करण्याची शक्ती असेल म्हणून असेल कदाचित, असे मला वाटते." देवकी बोलते.
"आई, माझ्या मनात अभिमन्यूची खूप वेगळी, एक चांगली छबी तयार झाली होती. मी सरस्वतीताई, आश्रमातील लोकांकडून त्यांच्याबद्दल खूप चांगले ऐकले होते. आणि आता....."वैदही बोलते.
"तू जे ऐकले आहे ते खरेच होते. पण मी तुला म्हणेल अभिचा भूतकाळ ऐकल्याशिवाय त्याच्या बद्दल कुठलही मत तयार करू नको." देवकी बोलते.
"आई, मला जाणून घ्यायचा अभिमन्यूंचा भूतकाळ." वैदही बोलते.
"मी सांगते तुला पण त्याअगोदर तुला तुझे मन घट्ट करावे लागेल. अभिमन्यूचा भूतकाळ सांगावा आणि ऐकावा इतका साधा नाहीये. तो ऐकण्यासाठी खूप सहनशक्ती पाहिजे." देवकी बोलते.
"मी सांगते तुला पण त्याअगोदर तुला तुझे मन घट्ट करावे लागेल. अभिमन्यूचा भूतकाळ सांगावा आणि ऐकावा इतका साधा नाहीये. तो ऐकण्यासाठी खूप सहनशक्ती पाहिजे." देवकी बोलते.
"आई, माझी तयारी आहे. तुम्ही सांगा." वैदही बोलते.
"इथे नको, तुमच्या खोलीत चल." देवकी बोलते.
देवकी आणि वैदही खोलीत जातात. देवकी कपाटातून एक डायरी काढून वैदहिला देते.
"अभिमन्यूला डायरी लिहिण्याची सवय होती. मी सांगते तुला पण सांगितल्यावर ही डायरी वाच." देवकी वैदहिला बोलते.
आणि नंतर देवकी अभिमन्यूचा भूतकाळ सांगायला सुरुवात करते.
"अभिमन्यूला डायरी लिहिण्याची सवय होती. मी सांगते तुला पण सांगितल्यावर ही डायरी वाच." देवकी वैदहिला बोलते.
आणि नंतर देवकी अभिमन्यूचा भूतकाळ सांगायला सुरुवात करते.
"कॉलेजपासूनच अभिला तुझ्यासारखी समाजसेवेची आवड होती. वडिलांचा एवढा मोठा राजकीय वारसा असताना देखील त्याला राजकारणात कधीच रस नव्हता. म्हणून अभी आपल्या वडलांना सोडून सरस्वतीताई यांच्या बरोबर काम करायचा."
"ताईंचा देखील त्याच्यावर खूप जीव होता. त्या तर बोलायचा "अभी माझाही मुलगाच आहे." त्यांनी अभिला कायम आईचे प्रेम दिले. लोकांसाठी काम करायचे, आश्रमात जायचे एवढेच त्याचे आयुष्य होते."
"अभ्यासात हुशार, प्रामाणिक, सत्यवादी अभिचे स्वप्न होते की मुलांसाठी शाळा काढायची. अभी नेहमी बोलत "चांगले शिक्षणच एक चांगला व्यक्ती घडवू शकते. त्यामुळे मी अशी शाळा सुरू करेल, की जिथून विद्यार्थी बाहेर पडताना एक चांगला माणूस म्हणून निघेल. शिक्षण हाच समाज सुधारण्याचा मार्ग आहे."
"कालांतराने अभिच्या आयुष्यात एक मुलगी आली, सई नाव तिचं. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. सई एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी होते. आई गृहिणी तर वडील सरकारी शाळेत क्लार्क होते. तो दोघांच्या नात्याला, दोघांच्याही घरात आपल्या आणि त्यांच्या मान्य होते.
"खूप छान चालले होते सर्व. दोघेही एकमेका सोबत आनंदी होते. अभी आणि सईचे प्रेम असे होते की,
"त्रास एकाला व्हायचा आणि अश्रू एकाचे यायचे."
"स्वप्ने एकाची होती तर डोळे दुसऱ्याचे."
"दुःख एकाला तर वेदना दुसऱ्याला."
"त्रास एकाला व्हायचा आणि अश्रू एकाचे यायचे."
"स्वप्ने एकाची होती तर डोळे दुसऱ्याचे."
"दुःख एकाला तर वेदना दुसऱ्याला."
"कोणाचीही नजर लागेल असे होते त्याचे प्रेम. आणि झालेही तेच. त्यांच्या प्रेमाला नजर लागली.
"दिनकर जाधव नावाचे एक राजकारणी होते. त्यांच्या मुलाने सरस्वतीताईंच्या आश्रमातील एका मुलीवर अत्याचार केले. दिनकर जाधव म्हणजे एक मोठे राजकारणी. त्यांच्या विरोधात जायला कोणीही तयार नव्हते."
"मग अशात त्या मुलीसाठी उभा राहायला अभिमन्यू. दिनकर जाधव तुझे आबा एकाच पक्षातले. त्यामुळे यांनी अभिला सांगितले होते की, तू दिनकर जाधव यांच्या मुलाच्या प्रकरणापासून लांब रहायचे."
"अभिने मात्र यांचे ऐकले नाही. उलट त्या मुलाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून अभिने त्याने केलेले सर्व गुन्हे शोधून काढले. त्याच्या विरोधात एक स्ट्राँग केस उभी केली. इतकी स्ट्राँग की त्या मुलाला फाशीची शिक्षा झाली."
"दिनकर जाधव याला मात्र हे सहन झाले. त्याने तुझ्या आबांच्या विरोधात खूप कारस्थाने केली. पण त्याच्या आणि यांच्या मध्ये उभा होता अभी. अभी समोर त्या दिनकर जाधवचे काहीच चालत नव्हते."
"दिनकर जाधवची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्याची पदे गेली. अभिने त्याचे सर्व जुने-पुराने काळे कारनामे शोधून काढले. आणि याचाच बदला दिनकर जाधवने घ्यायचा ठरवला."
"अभिच्या विरोधात त्याला काही करता येत नव्हते. काही केले तरी अभी त्याला मात देत होता. म्हणून त्या दिनकर जाधवने सईला निशाण्यावर धरले. नंतर सई आणि अभी एकमेकांपासून लांब झाले."
अभिमन्यूचा भूतकाळ सांगता सांगता देवकी जरा थांबते.
मग वैदही बोलते, "आई, दिनकर जाधव हे प्रकरण मी आश्रमात ऐकले होते. पण तेव्हा मी सई बद्दल ऐकले नव्हते. पण आलं माझ्या लक्षात त्या जाधवने बदला घेण्यासाठी अभिमन्यू आणि सईला वेगळे केले."
"हे एवढेच नाहीये वैदही." देवकी बोलते.
"म्हणजे अजून आहे? वैदही बोलते.
"हे तर काहीच नाहीये वैदही, अजून खूप काही आहे आणि पुढे आहे त्या समोर हे काहीच नाही." देवकी बोलते.
देवकी, वैदही जरावेळ थांबतात. आणि देवकी अभिमन्यूचा भूतकाळ सांगतायला लागते....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा