दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - २८"
देवकी, वैदहिला अभिमन्यूचा भूतकाळ सांगत असते. अभिमन्यूच्या पूर्वीच्या आयुष्यात असलेल्या मुलीबद्दल देवकीने वैदहिला सांगितले होते.
"आई, एक सांगा. आता सई कुठे आहे? ती काय करते? अभिमन्यूंचे तर तिच्यावर खूप प्रेम आहे ना मग ती त्यांच्या बरोबर का नाहीये?" वैदही देवकीला विचारते.
"सई, अभिमन्यू बरोबर नाहीये कारण... ती या जगातच नाहीये." देवकी बोलते.
सई बद्दल ऐकल्यावर वैदहिला जरा धक्काच बसतोय. काही क्षण खोलीत शांतता पसरलेली असते.
"आई, सईच्या बाबतीत काय झाले?" वैदही देवकीला विचारते.
"दिनकर जाधवने सईच्या पूर्ण कुटुंबाला कैद केले. सई स्वतः, लहान भाऊ, आई, बाबा हे सर्व दिनकर जाधवच्या कैद मध्ये होते. मग त्याने अभिलाही तिथे बोलवले. अभी एकटा आणि त्याची हत्यार बंद माणसे. त्यांच्या समोर नाही टिकू शकला. त्या नीच माणसाने अभिला देखील कैद केले."
"त्या राक्षसाने अभी आणि सईच्या डोळ्यांसमोर सईच्या आईला, बाबांना, भावाला हाल हाल करून मारून टाकले.
तो नीच तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने अभी आणि सईला मारले नाही, उलट त्यांच्यावर अमानवीय, अनैसर्गिक अत्याचार केले."
तो नीच तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने अभी आणि सईला मारले नाही, उलट त्यांच्यावर अमानवीय, अनैसर्गिक अत्याचार केले."
"त्यांना विजेचा शॉक देणे..."
"त्यांना चटके देणे..."
"त्यांच्या अंगावर दुर्गंधी पदार्थ टाकायचे मग उंदीर उंदीर सोडायचे. उंदीर कुठे आणि किती चावायचे हे त्यांनाच माहीत..."
"जेवणात काचेचा भुगा टाकून देणे आणि ते जेवण जबरदस्ती खाऊ घालणं...."
"त्याने आणि त्याच्या माणसांनी अभिच्या डोळ्या समोरच सईवर...."
"त्यांना चटके देणे..."
"त्यांच्या अंगावर दुर्गंधी पदार्थ टाकायचे मग उंदीर उंदीर सोडायचे. उंदीर कुठे आणि किती चावायचे हे त्यांनाच माहीत..."
"जेवणात काचेचा भुगा टाकून देणे आणि ते जेवण जबरदस्ती खाऊ घालणं...."
"त्याने आणि त्याच्या माणसांनी अभिच्या डोळ्या समोरच सईवर...."
"असे कितीतरी अत्याचार तो हारमखोर माझ्या अभिवर आणि सईवर करत होता. ( देवकी आणि वैदहीच्या डोळ्यात पाणी येते ) त्याला असे वाटले की यांचा आता मृत्यू होऊ शकतो तर तो नीच डॉक्टरला आणून त्यांचे औषध पाणी करायचा."
"त्याने अभिला आणि सईला जगूही दिले नाही आणि मरूनही दिले नाही. अभी आणि सई त्याच्या त्याब्यात जवळजवळ चार महिने होते. चार महिने त्यांनी हे सर्व सहन केले. नंतर... नंतर... तर अभी आणि सईने सगळी आशा सोडून दिली. त्यांचा आत्मविश्वास, स्वाभिमान सर्व संपले होते. दोघांनीही स्वतःला त्याच्या स्वाधीन केले."
"मग एक दिवस त्यांच्यातला एका माणसाला हे सहन झाले नाही. सगळे बेसावध असताना त्याने अभी आणि सईला तिथून सोडवून तुझ्या आबांच्या स्वाधीन केले. आम्ही दोघांनाही हॉस्पीटल मध्ये नेले. सई कोमात गेली होती तर अभिची स्मृती गेली होती. तो बऱ्याच गोष्टी विसरला होता."
"आई, किती भयानक आहे. पण एक बरं झालं अभिमन्यू आणि सई सुटले." वैदही देवकीला बोलते.
देवकी जरावेळ थांबून बोलते, "कसले सुटले! अजून पुढे बरच काही घडले होते."
"असेच काही महिने निघून जातात. सई कोमातून बाहेर येते. अभिचीही स्मृती परत येते. सईचे आम्ही सोडून या जगात कोणीही नव्हते. म्हणून तिला आपल्या घरीच थांबवले. पण एक परकी मुलगी आपल्या घरी कशी राहणार म्हणून अभी आणि सईचे लग्न लावायचे ठरवले."
"सई लग्नाला तयार नव्हती ती अभिला म्हटली, "माझे खूप लांडग्यांनी लचके तोडले आहे; मी तुझ्या योग्य नाहीये." त्यावर अभिच तीला उत्तर असे होते, "मी आजही तुझ्यावर तेवढेच प्रेम करतो जेवढे अगोदर करायचो, आणि तसच प्रेम कायम राहील. मी तुझ्या शरीरावर नाही तर मनावर प्रेम करतो. तू माझं आयुष्य आहे, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये."
"अभी आणि सईचे लग्न होते. दोघेही हळूहळू नीट पण होतात. याच काळात दिनकर जाधवने स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती. सगळे त्याला विसरले होते. पण तो पुन्हा अभी आणि सईच्या आयुष्यात आला आणि तेही नाव आणि रूप बदलून येते."
"यावेळेस तो थेट आपल्या घरात राहू लागला, तेही तुझ्या आबांचा विश्वासू म्हणून. त्याने यांचा इतका विश्वास मिळवला होता का तो बोलेल ते यांना खरे वाटत होते. आणि याच काळात सईला दिवस पण गेले. सई आई आणि अभी बाबा होणार होते.
"तुम्ही काय सांगता आई! आबांनी त्याला घरात ठेवून घेतले. आता ऐकायलाच त्रास होत आहे." वैदही बोलते.
" मी तुला म्हटलं होतं वैदही, मन घट्ट करावे लागेल." देवकी बोलते.
देवकी पाणी पिते. थोडं थांबून पुन्हा अभिमन्यूचा भूतकाळ सांगते.
"एक दिवस दिनकर जाधवने एका मुलीला पैसे देऊन अभिवर बलात्काराची तक्रारा करायली सांगितली. दुसऱ्या काही माणसांना सांगून त्याने अभिच्या तोंडाला काळे फासून अभिची गाढवारुन धिंड काढली. अर्थात अभी निर्दोष असल्याने त्याला कोर्टाने निर्दोष सोडले."
"दिनकर जाधव याने नंतर एका प्रकरणी यांनाही अडकवले. नंतर तेही सुटले. अभिच्या लक्षात आले ती व्यक्ती दिनकर जाधवच आहे. अभिने यांना सांगितले देखील. पण यांना ते पटले नाही. शेवटी अभिने यांना सांगितले" एकतर तो या घरात राहील, नाहीतर मी राहीन." त्यावर हे म्हटले, "तो कुठेही जाणार नाही. एवढा विश्वास यांचा त्याच्यावर होता."
"अभी आणि सई आपल्या घरातून वेगळे राहू लागले. पण एक दिवस त्या नराधमाने अभी आणि सईला मारण्यासाठी माणसे पाठवले. अभी घरी नव्हता. त्या नराधमांनी सई आणि आणि अभिच्या होणाऱ्या बाळाचा जीव घेतला." ( देवकी आणि वैदहीच्या डोळ्यात पाणी येते. )
"नंतर तुझ्या आबांना दिनकर जाधवचे सत्य समजले. त्याला शिक्षाही झाली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर अभी पूर्णपणे खचला. तू रात्री अभिचा जो त्रास बघितला तो पूर्वीच्या त्रासाच्या तुलनेत काहीच नव्हता. हे सर्व अभिच्या आयुष्यात घडले आहे."
वैदहिला अभिमन्यूचा भूतकाळ कळला होता....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा