दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ३१"
वैदहीने सत्य स्वीकारून पुढे जायचे ठरवले होते. ती आरोप-प्रत्यरोपाची रात्र संपलेली असते. त्या रात्रीतच सर्व गैरसमज दूर झालेले असतात.
देवकी सकाळीच उठून सर्व आटपून देवपूजा करण्यासाठी देव घरात जाते. पण देवपूजा आटोपलेली असते. देवकी देवाच्या पाया पडून खाली येते. खाली हॉल मध्ये सर्वजण बसलेले असतात.
"नर्मदा, आज नाष्ट्याला काहीतरी गोडधोड करायला सांग. अभिच्या आयुष्याची एक नवी सुरवात होत आहे तर ती गोडाने झाली पाहिजे." देवकी बोलते.
"ताई, नाष्टा बनवून झाला आहे." नर्मदा बोलते.
"हो का. बर ठीक आहे. मी तुळशीचे पूजन करून येते." देवकी बोलते.
"ताई तुळशी पूजन, देवाची पूजा, नाष्टा, दरवाजा बाहेर रांगोळी ही सगळे झाले आहे." नर्मदा बोलते.
"आपण दोघी मिळून ही काम करत करतो. तू आज एकटीनेच केले का? मला उठायला पण उशीर नाही झाला." देवकी बोलते.
"ताई, ही कामे मी पण नाही केले. हे सर्व वैदहीने केले आहे. आपली सुट्टी झाली आता." नर्मदा हसत बोलते.
घरात सर्वजण बोलत असतानाच वैदही तिथे येते.
"वैदही तू घरातील सर्व काम केलीस ठीक आहे. पण मग केलीसच पाहिजे असे काही नाहीये. थोडं आरामात उठली तरी चालेल." देवकी बोलते.
"आई मला उठून ही सर्व काम करायची सवय आहे. मला नाही झोपूशी वाटत उशिरापर्यंत. मी बाबांच्या घरी पण हे सर्व लवकर उठून करायचे." वैदही बोलते.
तितक्यात दिग्विजय आणि मालती खाली येतात.
"मला वाटायचे की आपल्या पुढच्या पिढीच्या लक्ष्मीचे तोंड तुळशीला कधी दिसते का नाही पण आज वैदहीमुळे ते दिसले." आबासाहेब मालतीला टोमणा मारतात.
"आबा, मला कळतय तुम्ही मला बोलतय. पण माझ्या या सगळ्यावर विश्वासच नाहीतर मी का करू!" मालती बोलते.
"सुनबाई प्रश्न विश्वासाचा नाहीये, संस्कारांचा आहे." आबासाहेब बोलतात.
"बरोबर आहे आबा तुमचे. माझ्यावर कधीच अशा टिपिकल गोष्टी नाही शिकवल्या. मला राजकारण शिकवले आणि मला तेच येते." मालती बोलते.
"सुनबाई पाठीमागे तुम्ही टीव्हीवर बघितले असेलच, वैदहीने एकटीनेच किती मोठा मोर्चा यशस्वी केला होता. तुम्ही केला का कधी?" आबासाहेब बोलतात.
आबासाहेबांचे बोलणे मालतीच्या जिव्हारी लागते. ती उठून तिथून निघून जाते.
"तुम्ही कशाला बोलला ओ. आपल्याला माहित आहेना तिचा स्वभाव." देवकी बोलते.
"तिलाही तिच्या जबाबदाऱ्या समजल्या पाहिजे. वैदहिला दोन दिवस नाही झाले घरात येऊन आणि सर्व शिकली. तिला एवढ्या वर्षात एकदाही सूचले नाही." आबासाहेब बोलतात.
देवकी तो विषय सोडून देते.
"वैदही, अभी उठला का?" देवकी बोलते.
"हो आई, मी उठवले होते त्यांना. ते फ्रेश होत असतील. आई, आबा मी अभिमन्यूंना घेऊन आश्रमात जाऊ?" वैदही बोलते.
"वैदही, अभिच्या अशा परिस्थितीमुळे आम्ही त्याला कधीच अशा ठिकाणी जाऊ दिले नाही तिथे खूप लोक असतील. तो एकतर समीर किंवा मग एक छोटासा बार आहे तिथेच आम्ही त्याला पाठवतो." देवकी बोलते.
"आई मला तुमचं म्हणणं कळतंय पण ते जेवढे फिरतील, कामात गुंतील तेवढे ते त्यांच्यासाठी चांगले असेल." वैदही बोलते.
"आम्ही अभिला अनेकदा कामाचे सांगितले पण त्याला कशातच रस नाहीये." देवकी बोलते.
"आई त्यांना असे काम करून द्यायला हवे जे त्यांना आवडते. अशा परिस्थितीत नावडते काम केल्यास अभिमन्यूंना अजून कंटाळा येईल." वैदही बोलते.
"तुला वाटतेना ते अभिसाठी चांगले असेल तर मग जा. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे." देवकी बोलते.
"सुनबाई दिनकर जाधव जरी तुरुंगात असला तरी आपले शत्रू काही कमी नाही. त्यामुळे अभिला कोणीही ईजा पोहचवू शकतो. हा आता अभी नीट असता तर त्याच्या आसपास पण फिरकायची कोणाची हिंमत झाली नसती. पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे आतापर्यंत त्याच्या बरोबर बाहेर नेहमी कोणीतरी राहत होतं." आबासाहेब बोलतात.
"आबा, विश्वास ठेवा; जोपर्यंत ही वैदही जिवंत आहे तोपर्यंत अभिमान्युंच्या केसाला पण धक्का लागणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना काही होऊ देणार नाही." वैदही बोलते.
"वैदही जा तू अभिला घेऊन." देवकी बोलते.
वैदही तिथून जाते.
"दादा अभिच लग्न करताना वाटले की दुसरी मुलगी आल्याने अभी मागच सर्व विसरेल. पण असं कधीच वाटल नाही का त्याला एवढ जिवापाड प्रेम करणारी बायको मिळेल." यशवंतराव बोलतात.
इकडे वैदही, अभिमन्यू बरोबर बोलत असते.
"अभिमन्यू आपल्याला आश्रमात जायचे आहे." वैदही बोलते.
"कोणत्या आश्रमात? मी नाही येणार." अभिमन्यू बोलतो.
"आपल्या, ताईंच्या आश्रमात. तुम्हांला तिथे गेल्यावर बरं वाटेल." वैदही बोलते.
"मी नाही येणार. मला तिथे गेल्यावर जून सगळे आठवेल मग मला त्रास होईल." अभिमन्यू बोलतो.
"तुम्ही हा त्रास मनात साठवून ठेवला आहे. तो बाहेर आला तरच तुम्हांला मोकळे वाटेल." वैदही बोलते.
"मी नाही येणार." असे बोलून अभिमन्यू खोलीच्या बाहेर जातो.
वैदहिला, अभिमन्यू आणि सरस्वतीताई यांची भेट घालण्याची होती. पण अभिमन्यू मात्र या भेटीला तयार नव्हता...
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा