दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ३२"
वैदहिला, अभिमन्यूला आश्रमात घेऊन जायचे असते. पण तो काही तयार होत नाही. वैदही देखील त्याला जास्त फोर्स करत नाही. ती विचार करते. अभिमन्यू आश्रमात येत नाही तर आपण सरस्वतीताईंनाच घरी घेऊन येऊ.
वैदही आश्रमात गेलेली असते. सरस्वतीताई काम करत असतात.
"ताई, मी आले. तुम्ही काय काम करत आहे." वैदही बोलते.
"आपल रोजच काम करत करत आहे. तू कशी आहे." सरस्वतीताई बोलतात.
"मी ठीक आहे." वैदही बोलते.
"तुझं आणि अभिमन्यूच सगळे गैरसमज दूर झाले का? तुला त्याचा भूतकाळा समजला का?" सरस्वतीताई बोलतात.
वैदही सर्व घटनाक्रम सरस्वतीताईंना सांगते.
"खूप काही घडलं मी नसताना. पण आता तू काय निर्णय घेतला आहेस?" सरस्वतीताई बोलतात.
"मी सत्य स्वीकारून पुढे जायचे ठरवले आहे." वैदही बोलते.
"वैदही, अभी कसा आहे? मला बघायचं त्याला!" सरस्वतीताई बोलतात.
"ताई खरंतर मी त्यांना इकडे आश्रमात घेऊन येणार होते, पण ते तयार झाले नाही. ताई तुम्ही चलाना घरी." वैदही बोलते.
"नाही, नको. मी आलेले आबासाहेबांना आवडणार नाही." सरस्वतीताई बोलतात.
"ताई, इथूनमागच वेगळ होत. आता मी आहेना. मी घेते जबाबदारी. कोणीही, काहीही बोलणार नाही." वैदही बोलते.
सरस्वतीताई प्रथम तयार नसतात. पण वैदही हट्ट करून त्यांना तयार करते. मग दोघीही घरी जायला निघतात.
अभिमन्यू, देवकी, नर्मदा घरातील हॉल मध्येच बसलेले असतात. देवकी आणि नर्मदा अभिमन्यूला समजावत असतात.
"अभी, तुझं नशीब खूप चांगले आहे. वैदही सारखी बायको तुला भेटली. तिला जपणे आता तुझ्या हातात आहे." देवकी बोलते.
"आई मी तिला माझ्याशी लग्न कर असे नव्हते सांगितले. उलट नको करू म्हटल्यावरही तिने केले आहे." अभिमन्यू बोलतो.
"अरे अभी तुझ्यात अडकत चालली आहे वैदही. प्रेम नाही देऊ शकला तर निदान दोन शब्द तरी गोड बोल तिच्याशी." नर्मदा बोलते.
"तुम्ही दोघीही मला तिच्याबद्दल सांगत आहात पण त्याचा काहीही उपयोग नाहीये." अभिमन्यू बोलतो.
इतक्यात दरवाजातून "अभिमन्यू" असा आवाज येतो. अभिमन्यू तिकडे बघतो. सरस्वतीताईंनीं आवाज दिलेला असतो. त्यांचा आवाज ऐकून अभिमन्यू उठून उभा राहतो.
सरस्वतीताई घरात येऊन अभिमन्यूचे हात हातात घेऊन त्याच्याकडे एकटक बघत असतात.काही क्षण असेच निघून जातात.
सरस्वतीताई घरात येऊन अभिमन्यूचे हात हातात घेऊन त्याच्याकडे एकटक बघत असतात.काही क्षण असेच निघून जातात.
"अभी किती वाट बघितली तुझी. डोळे तुला बघण्यासाठी आसुसलेले होते रे. तुला एकदाही माझी आठवण नाही आली का?" सरस्वतीताई बोलतात.
"ताई, रोज तुमची आठवण यायची पण यायची हिंमत होत नव्हती. माझी हिम्मत, उमेद त्यादिवशीच गेले ज्यादिवशी माझी सई आणि माझं बाळ गेल." अभिमन्यू रडत बोलतो.
"रडायचं नाही अभी आता." सरस्वतीताई अभिमन्यूला धीर देत बोलतात.
अभिमन्यू आणि सरस्वतीताई यांची खूप वर्षांनी भेट होते. नंतर सर्व गप्पा मारत बसतात. बराच वेळ निघून जातो.
"आता मला गेले पाहिजे. अभी येत जाना आश्रमात. काही करू नको. पण बाहेर तू चार माणसात गेला तर तुला बरं वाटेल." सरस्वतीताई बोलतात.
"ताई मी नक्कीच प्रयत्न करेल." अभिमन्यू बोलतो.
सरस्वतीताई निघतात. वैदही त्यांना दरवाजापर्यंत सोडते.
थोडावेळ जातो. दिग्विजय आणि आबासाहेब पक्षाच्या ऑफिस मधून परत आलेले असतात. दिग्विजयने आबासाहेबांना पकडलेले असते.
थोडावेळ जातो. दिग्विजय आणि आबासाहेब पक्षाच्या ऑफिस मधून परत आलेले असतात. दिग्विजयने आबासाहेबांना पकडलेले असते.
"दिग्विजय तू तुझ्या आबांना का पकडून आणले आहे? काय झाले?" देवकी काळजीने बोलते.
"आई, आबांना पक्षाच्या ऑफिस मध्ये चक्कर आली होती. डॉक्टर म्हटले आहे; काही काळजी करण्यासारखे नाहीये.
दिग्विजय बोलतो.
दिग्विजय बोलतो.
"अहो काय तुम्ही. किती दगदग करता. नसेल होत ते राजकारण तर द्या सोडून. असेही त्या राजकारणाने काय दिले आहे तुम्हाला." देवकी बोलते.
"देवकी तुलाही माहीत आहे राजकारणात फक्त प्रवेश असतो त्यातून माघार नाही घेता येत." आबासाहेब बोलतात.
आबासाहेब आराम करण्यासाठी जातात. नंतर रात्रीच्या जेवणाची वेळ होते. घरात सर्वजण जेवायला बसलेले असतात. पण वैदहीचे डोळे मात्र दरवाजाकडे लागून होते. ती अभिमन्यूची वाट बघत होती.
"वैदही तुला नाही का जेवायचे?" देवकी विचारते.
"आई मी अभिमन्यू आल्यावर त्यांच्यासोबत जेवेल." वैदही बोलते.
"त्याची वाट नको बघू. तू घे जेवून." देवकी बोलते.
"नको आई. मी त्यांच्या बरोबरच जेवण करेन." वैदही बोलते.
"वैदही अभिचा काही भरोसा नाहीये. तो कधी कधी जेवतपण नाही. तो जेवला नाही तर एकटीच राहशील जेवायला." देवकी बोलते.
"चालेल आई पण मी अभिमन्यू आल्यावरच जेवण करेल." वैदही बोलते.
घरातील सर्वजण जेवण करून घेतात. वैदही मात्र अभिमन्यूची वाट बघत बसते....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा