Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ३३

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ३३"

घरातील सर्वजण जेवण करून झोपायला गेले होते. वैदही मात्र अभिमन्यूची वाट बघत बसली होती. बऱ्याच वेळाने अभिमन्यू घरी येतो. त्याची अवस्था नेहमी सारखीच असते.
वैदही त्याला बघिल्यावर त्याच्याकडे जाऊन त्याला आधार देते.

"अभिमन्यू चला जेवायला; मी तुम्हाला वाढून देते." वैदही बोलते.

"मला नाही जेवायचं." अभिमन्यू बोलतो.

"अभिमन्यू मी थांबले आहे तुमच्यासाठी, मला खूप भूक लागली आहे." वैदही बोलते.

"तुला कोणी सांगितले होते थांबायला! मी नाही जेवणार." अभिमन्यू बोलतो.

अभिमन्यू नाही बोलत असतो तरी वैदही त्याला जेवायला घेऊन जाते. वैदही त्याला खुर्चीवर बसवते. ताट वाढून घेते आणि स्वतःच्या हाताने अभिमन्यूला जेवण भरवते. फक्त एक घास नाही तर संपूर्ण जेवण वैदही अभिमन्यूला हाताने भरवते आणि नंतर स्वतः जेवते.

जेवण झाल्यावर वैदही अभिमन्यूला खोलीत घेऊन जाते. त्याचे कपडे बदलते. त्याला झोपवून त्याच्यावर पांघरुन टाकते. अभिमन्यू झोपल्यावरच वैदही स्वतः झोपते.

दुसरा दिवस उजाडतो. सकाळचे रम्य वातावरण घरात पसरलेले असते. हॉल मध्ये बसून सर्वजण बसून गप्पा मारत होते. तेवढ्यात दिग्विजय धावत येतो.

"आबा...आबा पटकन टीव्ही लावा." दिग्विजय बोलतो.

"काय झाले आहे?" असे बोलून आबासाहेब टीव्ही लावतात.

जिल्ह्यातील दोन समाजात वाद चालू आहे. दंगलीचे वातावरण सगळीकडे पसरले. दुकाने फोडण्यात आली आहे, गाड्या फोडण्यात आल्या आहे, सरकारी मालमत्तांचे नुकसान करण्यात आले आहे. सगळीकडे भीतीदायक वातावरण पसरलेले आहे. पोलिसांनी CrPC कलम १४४ नुसार जमावबंदी लागू केली आहे. अशा बातम्या टीव्हीवर चालू होत्या.

ही बातमी टीव्हीवर सुरू असतानाच आबासाहेब बाहेर पडण्यासाठी निघतात.

"अहो तुमची तब्येत खराब आहे, अशात कुठ चालला तुम्ही." देवकी बोलते.

"लोकप्रतिनिधी म्हणून मला माझ्या जिल्ह्यात काय चालले आहे याची माहिती ठेवणे गरजेचे आहे." आबासाहेब बोलतात.

"तुमचं बरोबर आहे पण मग तुम्ही एकटे नका जाऊ. दिग्विजय तू जा आबांन बरोबर." देवकी बोलते.

देवकी बोलल्यानंतर दिग्विजय आणि आबासाहेब बाहेर पडतात. यशवंतराव नेमके बाहेर गावी गेलेले असतात.
संध्याकाळची वेळ होते. अभिमन्यू घरातील कोणाच्याही नकळत घराबाहेर पडतो.

बराच वेळ गेल्यानंतर वैदहीच्या लक्षात येते की अभिमन्यू घरात नाहीये. ती लगेच धावत देवकीकडे जाते.

"आई अभिमन्यू घरात नाहीये." वैदही बोलते.

"मग कुठे गेला? घरात बघितले का?" देवकी बोलते.

"हो आई, घरात सगळीकडे बघितले पण अभिमन्यू कुठेच नाहीये. मला बोलले हॉल मध्ये बसतो आणि निघून गेले." वैदही बोलते.

वैदही बोलत असताना तिच्या डोळ्यात अश्रू येतात. तिला अभिमन्यूची काळजी वाटत होती.

"काही काळजी नको आपण बघू काय करायचं?" देवकी वैदहिला धीर देत बोलते.

बराच वेळ जातो. रात्र झालेली असते तरी अभिमन्यू घरी परत आलेला नसतो. घरात सर्वजण काळजी करत होते.

"भाऊजी पण इथे नाहीये आणि दिग्विजय पण यांच्या बरोबर गेला आहे. आता कोण जाणार अभिला बघायला." देवकी बोलते.

"आई मी जाते. अभिमन्यूनांना शोधून आणते." वैदही बोलते.

"तुला वेड लागले आहे का? बाहेर परिस्थिती काय आहे, हे घरात नाहीये आणि अशात तू बाहेर जाणार. आजिबात कुठेही जायचं नाही." देवकी बोलते.

"आई, माफ करा पण अभिमन्यूंना शोधायला जायला मला कोणीच अडवू शकत नाही." वैदही बोलते.

असे बोलून वैदही चालू पडते. देवकी तिला थांबवण्याच्या प्रयत्न करते पण वैदही मात्र थांबत नाही...

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all