Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ३८

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणार प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ३८"

अभिमन्यू आणि वैदहीची शतपावली चाललेली असते. वैदहीने अभिमन्यूपुढे मैत्रीचा हात पुढे केलेला असतो पण अभिमन्यूने मैत्रीचा हात वैदहिला दिला नाही.

दोघेही शांतपणे शतपावली करत असतात. अभिमन्यूने मैत्रीचा हात दिला नाही म्हणून काहीक्षण वैदहिला वाईट वाटते. पण तिचे वाईट वाटणे वैदही तसेच मनात ठेवते.

काही पावले पुढे चालत आल्यावर अभिमन्यू विचार करत असतो. वैदही थोडीशी पुढे चालत होती. अभिमन्यू हळूच वैदहिला आवाज देतो, "वैदही!"

वैदही पाठीमागे वळून बघते. अभिमन्यूने हात पुढे केलेला असतो. वैदहीने पाठीमागे बघितल्यावर अभिमन्यू तिला बोलतो, "माझी मैत्रीण होशील?"

अभिमन्यू असे बोलताच वैदही आनंदाने अभिमन्यूच्या हाताला हात मिळवते. आणि त्यांच्यात मैत्रीचे नाते तयार होते.

"अभिमन्यू मी आयुष्यभर आपली मैत्री जपेल. मी आपल्या मैत्रीला कधीच कमजोर होऊ देणार नाही." वैदही बोलते.

"मीही माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल मैत्री टिकवण्याचा." अभिमन्यू बोलतो.

वैदही आणि अभिमन्यू अजून थोडे पुढे चालत जातात. जरावेळ दोघेही शांत राहतात.

"वैदही तुला एक विचारू?" अभिमन्यू बोलतो.

"अभिमन्यू आता आपल्या मध्ये मैत्री झाली आहेना मग मित्रांमध्ये कसली आली फॉर्मलिटी. विचारा तुम्हाला काय विचारायचे." वैदही बोलते.

"तुला आपल्या लग्नाच्या अगोदर काही गोष्टी नव्हत्या माहित. पण लग्नानंतर कळल्यानंतरही तू तुला हवा तो निर्णय घेऊ शकली असती मग तू माझ्या बरोबर राहण्याचा निर्णय का घेतला?" अभिमन्यू बोलतो.

"मी खरे उत्तर देईल पण मला आशा आहे की याचा आपल्या मैत्रीवर काही परिणाम होणार नाही." वैदही बोलते.

"नाही होणार, सांग तू तुझ्या मनात जे काही असेल ते." अभिमन्यू बोलतो.

"अभिमन्यू मी लग्नाच्या अगोदरच आश्रमात तुमच्या बद्दल खूप चांगले ऐकले होते अर्थात तुम्ही तसेच आहात. त्यामुळे मी तुमच्यात हळूहळू गुंतत गेले; तुमच्यावर प्रेम करू लागले. त्यामुळेच तुम्हांला सोडून जाण्याचा विचार देखील माझ्या मनात नाही आला." वैदहिने तिच्या मनातल्या अभिमन्यूबद्दलच्या भावना अभिमन्यूला सांगितलेल्या असतात.

जरावेळ दोघेही शांतच राहतात. पुढे गेल्यावर वैदही बोलते, "अभिमन्यू मी जे आहे ते प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितले. प्लीज याचा आपल्या मैत्रीवर काही परिणाम नका होऊन देऊ."

"वैदही आपली मैत्री आहे ही अशीच कायम राहील. नको काळजी करू." अभिमन्यू बोलतो.

"मग तुम्ही शांत का होता?" वैदही बोलते.

"तू किती खरी आहे याचा. एखादी मुलगी मन जपण्यासाठी कदाचित खोटी बोलली असती पण तू तसे नाही केले." अभिमन्यू बोलतो.

"खोटं बोललं की ते खोटे लपविण्यासाठी परत दुसर...तिसरं....असे खोटे बोलावे लागते आणि मग खोट्याची शिडीच तयार होते. यामुळे मला खोटे बोलायला आवडतच नाही. खऱ्याने कधी कधी तात्पुरता त्रास होतो पण तोच चांगला असतो." वैदही बोलते.

"वैदही कायम अशीच खरी, प्रामाणिक, आणि साधी रहा." अभिमन्यू बोलतो.

"अभिमन्यू तुमच्या लक्षात आले का, आपण बोलत बोलत खूपच लांब आलो आहोत." वैदही बोलते.

"अरे हो खूपच लांब आलो आहोत. चल आता परत माघारी फिरू." अभिमन्यू बोलतो.

अभिमन्यू आणि वैदही दोघेही परत माघारी फिरतात. माघारी फिरल्यानंतर देखील त्यांच्या गप्पा चालू असतात. पुढे चालत आल्यावर अचानक पावसाचे वातावरण तयार होते आणि जोरदार पाऊस पडायला लागतो.

"अरे यार हा पाऊस अचानक कसा आला!" अभिमन्यू बोलतो.

"अभिमन्यू आपण त्या झाडाखाली उभा राहायचं का जरावेळ?" वैदही बोलते.

"हो चल...चल..." अभिमन्यू बोलतो.

दोघेही झाडाखाली येऊन उभे राहतात. पण पावसाची तीव्रता वाढत चालली होती. अभिमन्यू त्याने घातलेले जॅकेट काढून वैदहीवर टाकतो.

"अभिमन्यू तुम्ही घाला हे जॅकेट तुम्ही भिजशाल." वैदही अभिमन्यूकडे जॅकेट देत बोलते.

"तू घाल. मला एवढे काही वाटत नाही. आणि खबरदार परत काढले तर." असे बोलून अभिमन्यूच्या वैदहीवर पुन्हा जॅकेट घालतो.

"अभिमन्यू एक काम करू. दोघेही जॅकेट घेऊ. तुम्ही पण या जॅकेट मध्ये." वैदही बोलते.

अभिमन्यू आणि वैदही दोघेही जॅकेट मध्ये असतात. दोघांच्याही डोक्यावर जॅकेट असते. दोघांचीही नजरेला नजर भिडते. काहीक्षण दोघेही असेच एकमेकांच्या नजरेत बघत असतात.

पाऊस वाढलेला असतो. वैदही आणि अभिमन्यू दोघेही खूप भिजलेले असतात.

"अभिमन्यू आपण असेही खूप भिजलेले आहोत त्यामुळे मला नाही वाटत इथे थांबण्यास काही अर्थ आहे." वैदही बोलते.

"मलाही तसेच वाटत आहे. निघायचे का?" अभिमन्यू बोलतो.

वैदही "हो" बोलल्यावर दोघेही झाडाखालून निघतात आणि चालायला लागतात. दोघांच्याही डोक्यावर जॅकेट तसेच असते. अभिमन्यूने वैदहीच्या खांद्यावर हात ठेवून तिला पकडलेले असते. एकाच जॅकेट खाली असल्याने दोघांचेही डोके एकमेकांना स्पर्श करत होते. वरतून पाऊस जोरदार पाऊस पडत होता.

वैदहिला हा पाऊस आणि रस्ता कधीच संपू नये असे वाटत होते. तिला जणू असेच वाटत होते की हा पाऊस तिचे आणि अभिमन्यूचे नात्यातले अंतर कमी करायला आला आहे. अभिमन्यू बरोबरचे तिचे हे क्षण कायम तिला स्मरणात ठेवायचे होते....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all