Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४०

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४०"

पावसात भिजल्याने वैदही आणि अभिमन्यूला थंडी लागत होती. त्यामुळे दोघेही शेकोटी करून शेकत असतात. त्यांच्या गप्पाही खूप रंगलेल्या असतात.

"बर जायचे का आता. भरपूर वेळ झाला आहे." अभिमन्यू बोलतो.

"अजून थोडावेळ बसुयाना." वैदही बोलते.

"थोडावेळ थोडावेळ असे करत तू किती वेळ घेतला आहे का माहित आहे का तुला. चल मला झोप येते आता." अभिमन्यू बोलतो.

अभिमन्यू असे बोलून वैदहीच्या हाताला धरून तिला उठवतो आणि घेऊन जातो. वैदहिला तर ही रात्र संपू नये असेच वाटत होते. तिच्या आणि अभिमन्यूच्या चाललेल्या गप्पा अशाच चालू राहाव्यात असे तिला वाटत होते. पण अभिमन्यूला झोप आलेली असते आणि तो वैदहिला घेऊन जातो. दोघेही खोलीत येऊन निवांत झोपतात.

मध्यरात्री वैदहिला तहान लागते म्हणून ती पाणी प्यायला उठते. वैदही पाणी पित असताना तिची नजर अभिमन्यूवर पडते. अभिमन्यू थंडीने कुडकुडत असतो. वैदही अभिमन्यूच्या जवळ जाऊन त्याला हात लावते तर तिला जाणवते अभिमन्यू तापाने फनफनलेला असतो.

वैदही लगेच अभिमन्यूच्या अंगावर जास्तीचे पांघरून टाकते. वैदही लगेच केअरटेकरकडे जाते.

"काका, डॉक्टरांना बोलावणा! अभिमन्यूंना खूप ताप आला आहे." वैदही बोलते.

"ताई, इथे जवळ कुठेच आसपास डॉक्टर नाहीये आणि आता डॉक्टर पण भेटणार नाही." केअरटेकर बोलतो.

"काका, असे नका बोलू. काहीतरी करा." वैदही बोलते.

"ताई, तुम्हीच सांगा मी काय करू." केअरटेकर बोलतो.

"मला मीठ द्याना. मिठाच्या पट्ट्या ठेवते त्यांच्या डोक्यावर." वैदही बोलते.

केअरटेकर वैदहिला मीठ देतो. वैदही लगेच मिठाचे पाणी करून त्याच्या पट्ट्या अभिमन्यूच्या डोक्यावर ठेवू लागते. वैदही आतून खूप घाबरलेली असते. तिला वाटायला लागते उगाच पावसात फिरायला गेलो. वैदही स्वतःला अपराधी समजायला लागते.

बराच वेळ वैदही अभिमन्यूच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत असते पण त्याचा ताप काही कमी होत नाही. वैदही आता खूप घाबरते. ती पुन्हा केअरटेकरकडे जाते.

"काका, आपल्याला काही करून डॉक्टरकडे गेले पाहिजे. अभिमन्यूंचा ताप काहीही केल्याने कमी होत नाही." वैदही बोलते.

"ताई ते आता सकाळपर्यंत शक्य नाहीये. आताच बातमी आली की पावसामुळे रस्त्यात दरड कोसळली आहे त्यामुळे रस्ता बंद झाला आहे." केअरटेकर बोलतो.

"दुसरा कुठलाच रस्ता नाहीये का?" वैदही टेन्शन मध्ये बोलते.

"जंगलातून एक रस्ता आहे पण तिथून गाडी जाणार नाही. पायी जावे लागेल. पण त्या रस्त्यावरून जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे." केअरटेकर बोलतो.

"म्हणजे?" वैदही बोलते.

"जंगलातला रस्ता असल्याने जगलांतले हिंसक पशु, प्राणी फिरत असतात. त्यामुळे तिथून डॉक्टर पण येणार नाही." केअरटेकर बोलतो.

"ठीक आहे मी जाते, डॉक्टर नाही आले तर त्यांच्याकडून औषध तरी आणते. तुम्ही फक्त अभिमन्यूची काळजी घ्या." वैदही बोलते.

"ताई असा वेडेपणा करू नका. कशाला जीवाशी खेळताय." केअरटेकर बोलतो.

"माझा जीव तिथे तापाने फनफनतोय. मी थांबू शकत नाही." असे बोलून वैदही चालू पडते. सोबत एक बॅटरी आणि काठी घेतलेली असते.

त्या काटेरी जंगलातून जीवाची पर्वा न करता वैदही चालत होती. डोक्यात फक्त एकच होते डॉक्टर नाहीतर अभिमन्यूसाठी किमान औषध तरी आणायचे. रात्रीचा जंगलातला भयाण आवाज, कोणालाही धडकी पोहचेल अशी शांतता. एवढ्या भयाण रस्त्यातून जाताना ना तिचे पाय डगमगतात ना थरथरतात.

त्या जंगलातील रस्त्याने जात असताना वैदहीच्या समोर वाघ येतो. वैदही शांत उभी राहून हात जोडून डोळे बंद करून देवाचे स्मरण करते. वाघ तिथून निघून जातो, जणू देवाने तिची हाकच ऐकलेली असते.

वैदही डॉक्टरकडे पोहचते. वैदही डॉक्टरांना सर्व सांगते. डॉक्टर वैदहिला गोळ्या, आणि औषध देतात. आणि जर रात्रीतून बरे नाही वाटले तर सकाळी पुन्हा बोलवता. वैदही औषध घेऊन पुन्हा निघते.

वैदहीला जंगलातून फार्महाऊसवर जाताना यावेळेस तिला सोबत देखील भेटते. वैदही रस्त्यातून येताना त्या व्यक्तीला सर्व घटनाक्रम सांगते. ती अज्ञात व्यक्ती वैदहिला बोलते, "तुम्ही नवरा-बायको कमाल आहात. तुमच्या सारखे निस्वार्थी, स्वच्छ प्रेम आजकाल कोणीही करू शकत नाही."

बोलता बोलता जंगलाचा रस्ता संपतो. वैदही चालत पुढे येते आणि पाठीमागे वळून बघते तर ती व्यक्ती दिसेनाशी होते.. वैदहिला सुरवातीला आश्चर्य वाटते पण लगेच फार्महाऊस मध्ये जाते. तिला अभिमन्यूला औषध द्यायचे असते.

फार्महाऊसमध्ये आल्यावर वैदही अभिमन्यूला उठवून त्याला गोळ्या आणि औषध देते. नंतर झोपी लावते आणि पुन्हा त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवू लागते.

अभिमन्यूला बरे वाटेल की याची चिंता वैदहिला लागली होती. तिच्या मिठाच्या पट्ट्या ठेवण्याचे काम चालूच होते....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमश:
0

🎭 Series Post

View all