Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४२

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४२"

पोलीस त्या टवाळखोर पोरांना घेऊन गेलेली असतात. अभिमन्यू तोंडून "माझी बायको" असे ऐकल्यावर वैदहीचे भान हरपले होते.

अभिमन्यू वैदहिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवतो. वैदहीने आवाजाने लगेच भानावर येते.

"काय कुठे हरवल्या होत्या मॅडम?" अभिमन्यू बोलतो.

"नाही काही नाही असेच." वैदही बोलते.

"दादा इथे फिरण्यासाठी, बघण्यासाठी एखादे चांगले स्थळ आहे का?" अभिमन्यू केअरटेकरला विचारतो.

"हो दादा, इथे जवळच प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचे मंदिर आहे. तिथे जर गेलातर तुम्हाला खूप भारी वाटेल." केअरटेकर बोलतो.

"मग निघायचे का वैदही?" अभिमन्यू वैदहिला बोलतो.

वैदही हो बोलल्यावर दोघेही जेवण करून मंदिरात जायला निघतात. रस्त्यात एक नारळ पाणीवाला वैदहिला दिसतो.

"अभिमन्यू नारळपाणी वाला उभा आहे. मला नारळ पाणी प्यायचे आहे." वैदही बोलते.

अभिमन्यू मुद्दाम ऐकले नाही असे करतो.

"अभिमन्यू नारळपाणी ऐ नारळपाणी." वैदही परत बोलते पण अभिमन्यू परत तसेच न ऐकल्यासारखे करतो.

"अच्छा म्हणजे तुम्ही मुद्दाम करता तर तुम्ही गाडी घ्या तिकडे नाहीतर बघा मी करेल." वैदही बोलते.

"धमकी देतेय. मग मला बघायचंच आहे तू काय करशील." अभिमन्यू बोलतो.

"बघायचे का तुम्हांला मग बघाच." असे बोलून वैदही गाडीची स्टेरिंग फिरवायला लागते.

"वेडी का तू!" अभिमन्यू वैदहीचे हात स्टेरिंग पासून दूर करत बोलतो.

"मग घ्या गप गाडी नारळपाणी वाल्याकडे." वैदही तोऱ्यात बोलते.

"घेतो बाई घेतो, यूटर्न येऊदे. मलापण नारळपाणी प्यायचे आहे. मी मस्ती करत होतो." अभिमन्यू बोलतो.

"मला माहित आहे. आणि मीपण मस्तीच करत होते." वैदही बोलते.

वैदही बोलल्यावर दोघेही हसू लागतात. आणि अशीच मस्तीमध्ये नारळपाणी वाल्याजवळ गाडी येऊन थांबते.

"दादा, दोन नारळपाणी द्याना." अभिमन्यू नारळपाणी वाल्याला बोलतो.

"तुम्ही लेट झाला शेठ. सगळे नारळपाणी संपले आहे. फक्त एकच शिल्लक आहे." नारळपाणी वाला बोलतो.

"ठीक तू पी ते नारळपाणी." अभिमन्यू वैदहिला बोलतो.

"नाही तुम्ही प्या. तुम्हाला पण प्यायचे होते." वैदही बोलते.

वैदही आणि अभिमन्यूचे तू-मी, मी-तू चालू होते. मग नारळपाणी वाला बोलतो, "दादा, तुम्ही नवरा-बायको आहेतना. मग एक नारळपाणी दोघांनी पिले तर प्रेम अजून वाढेल." असे बोलून नारळपाणी वाला अभिमन्यूच्या हातात नारळपाणी देतो.

"काय करायचे?" अभिमन्यू वैदहिला विचारतो.

"मला चालेल माझ्या या मित्राबरोबर नारळपाणी शेअर करायला." वैदही बोलते.

वैदही बोलल्यावर अभिमन्यू हलकासा हसतो आणि नारळपाणी वैदहीच्या समोर करतो. अभिमन्यूचे हात नारळपाण्यावर असतात. वैदही तिचे हात अभिमन्यूच्या हातावर ठेवते. एका स्ट्रॉने वैदही तर एका स्ट्रॉने अभिमन्यू नारळपाणी पित असतात.

अभिमन्यूची नजर नारळावरती होती तर वैदहीची नजर अभिमन्यूवर अडून होती. दोघांचेही श्वास एकमेकांना जाणवत होते. ते नारळ त्यांच्या फुलणाऱ्या नात्याचे साक्षीदार बनले होते.

वैदहीच्या चेहऱ्यावर एक हलकिसी लाजरेपणाची छटा होती. या नारळालाचे पाणी कधी संपूच नाही असे वैदहिला वाटत होते. मनात खूप काही चालले होते. हे क्षण इथेच थांबावे असे तिला वाटत होते.

दोघांचे नारळपाणी पिऊन झाले होते. नारळातले पाणी संपले होते हे मात्र वैदहिला समजले नव्हते ती एकटक अभिमन्यूकडे बघत होती. अभिमन्यू वैदहिला धक्का देतो तेव्हा वैदही भानावर येते.

अभिमन्यू नारळ वाळ्याचे पैसे देऊन टाकतो. अभिमन्यू आणि वैदही दोघेही गाडीत बसतात. गाडी खूप पुढे आली होती पण वैदही अजूनही तिथेच हरवली होती.

नंतर दोघेही मंदिराजवळ येतात. मंदिराला खूप पायऱ्या होतात. तिथे येणारे काही माणसे त्यांच्या बरोबर असलेल्या स्त्रीला उचलून घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढत होते. अभिमन्यूला याचे कारण जाणून घ्यावेसे वाटते म्हणून तो एक दुकानदाराला विचारायला जातो.

"भाऊ, हे असे उचलून घेऊन का जात आहे?" अभिमन्यू दुकानदाराला विचारतो.

"पाहुणे हे मंदिर एक जागृत देवस्थान आहे. अस म्हणतात, जो पण नवरा त्याच्या बायकोला जेवढ्या वर उचलून घेऊन जाईल तेवढे त्याचे नाते मजबूत होईल." दुकानदार बोलतो.

"जर समजा आपली मैत्रीण आपल्या सोबत असेल आणि तिला उचलून घेऊन गेले तर मैत्री अजून घट्ट होईल की नाही." अभिमन्यू बोलतो.

"का नाही होणार घट्ट; नक्कीच होईल" दुकानदार बोलतो.

दुकानदाराशी बोलल्यानंतर अभिमन्यू वैदहीकडे जातो.

"तुला माहित आहे का ही उचलून घेण्याची पद्धत का आहे?" अभिमन्यू वैदहिला बोलते.

"नाही माहिती, का आहे ही पद्धत?" वैदही बोलते.

"असे उचलून घेतल्याने नवरा बायकोचे नातं अजून घट्ट होते. मी पण तुला उचलून घेतो." अभिमन्यू बोलतो.

अभिमन्यू असे बोलल्याने वैदहिला सुखद धक्का बसतो. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. अभिमन्यू वैदहिला बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येते का वैदही याचा चुकीचा अर्थ घेत आहे.

"मी तुला मैत्रीण म्हणून उचलून घेतो म्हणजे आपली मैत्री अजून घट्ट होईल." अभिमन्यू बोलतो.

अभिमन्यू जरी मैत्रीण म्हटले तरी वैदहिला आनंदच वाटत होता. तिला त्यांच्या नात्यासाठी कोणतीही घाई नको होती.
नंतर वैदही अभिमन्यूला बोलते, "नको अभिमन्यू तुमचे हातपाय दुखतील." वैदही बोलते.

"वैदही तीच तर मजा आहे. मला त्रास होईल पण तू सोबत असताना मला तो त्रास जाणवतो का नाही हे बघायचं आहे. मला तुझा सहवास जास्त जाणवतो का, वेदना तुझ्या सहवासापेक्षा जास्त जाणवते हे कळेल."
अभिमन्यू बोलतो.

"अभिमन्यू पण...वैदही असे बोलत असते तोच अभिमन्यू तिला उचलून घेतो आणि मंदिराच्या पायऱ्या चढायला लागतो. वैदहीचे हात अभिमन्यूच्या गळ्यात होते. अभिमन्यू एक एक पायरी चढत होता....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"