दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४३"
अभिमन्यू आणि वैदही मंदिराजवळ आलेले असतात. अभिमन्यूने वैदहिला अलगद उचलून घेतले होते. वैदहीचे हात अभिमन्यूच्या गळ्याभोवती घट्ट गुंडाळले गेले होते. तिच्या श्वासांचा उबदार स्पर्श त्याच्या मानेला जाणवत होते.
अभिमन्यू क्षणभर डोळे झाकून देवाचे स्मरण करतो आणि डोळे उघडून वैदहीच्या डोळ्यात बघतो. आणि पहिल्या पायरीवर पाय टाकतो. असे एक एक करत अभिमन्यू मंदिराच्या पायऱ्या चढू लागतो.
अभिमन्यू आणि वैदही दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले होते. अभिमन्यू त्याच्या नकळत पायऱ्या चढू लागतो. वेदनेचा किंचितसा ठसाही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. अभिमन्यू वैदहिला घेऊन पायऱ्या चढत होता पण असे वाटत जणू रस्त्यावर चालत आहे.
वैदहीचे डोके अभिमन्यूच्या छातीजवळ होते. त्याच्या हृदयाचे ठोके तिला जाणवत होते. वैदहीचे केस हवेने उडून अभिमन्यूच्या चेहऱ्यावर जात होते. वैदहीची नजर अभिमन्यूच्या नजरे पासून दूर होत नव्हती. तिची पापणी देखील खाली पडेनासी झाली होती.
दोघेही एकमेकांत गुंतले होते. अभिमन्यू एक एक पायरी वर जात होता. पण दोघांनाही माहीत नव्हते आपण कुठून सुरवात केली, कुठे आलो आहे, अजून किती बाकी आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर हलकेसे स्मितहास्य होते. जणू तेच अभिमन्यूला ऊर्जा देत होते.
आजूबाजूचे सर्व लोकांच्या नजरा अभिमन्यू आणि वैदहीवर होत्या. सर्वांना दोघांचे कौतुक वाटत होते. बघणारे त्यांच्याबद्दल चांगली कुजबुज करू लागले.
"दोघांचे एकमेकांनावर किती प्रेम आहे..."
"दोघेही एकमेकांसाठी बनले आहे...."
"दोघेही एकमेकांसाठी बनले आहे...."
अशी चर्चा लोक करू लागले होते. सोबत आपआपल्या जोडीदाराला प्रेमाचे उदाहरण देखील देत होते. सर्व लोक त्यांचे काम, ते कशासाठी आले आहे हे सोडून फक्त अभिमन्यू आणि वैदहिला बघत होते.
एक एक करत अभिमन्यू मंदिराच्या सर्व पायऱ्या चढतो. पण अभिमन्यू आणि वैदहि या दोघांनाही समजले नव्हते की आपण मंदिराच्या सर्व पायऱ्या चढलो आहे. अभिमन्यू चालतच असतो तेवढ्यात एकजण पुढे येऊन अभिमन्यूला थांबवतो.
त्या माणसाने थांबवल्या नंतर अभिमन्यू आणि वैदही दोघांच्याही लक्षात येते की आपण पायऱ्या चढून आलो आहे. अभिमन्यू हळूच वैदहिला खाली सोडतो. आजूबाजूचे सर्व लोक त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांच्या नात्याला जणू पुरस्कार देत होते.
अभिमन्यू पूर्ण घामाने भिजला होता पण थकल्याची एक छटा पण त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. वैदही पुढे येऊन तिच्या ओढणीने अभिमन्यूचा घाम पुसू लागते. दोघेही एकमेकांकडे बघून हलकेसे हसत होते.
नंतर दोघेही मंदिरात जाऊन प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचे आशीर्वाद घेतात. तिथे उपस्थित असलेल्या पुजाराने त्यांना पायऱ्या चढून येताना बघितलेले असते म्हणून तो बोलतो, "तुम्ही दोघेही सर्व पायऱ्या चढून आले आहेत म्हणून तुम्ही जे काही देवाकडे मागाल ती तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल." असे बोलून पुजारी त्यांच्या हातात प्रसाद देतो.
वैदही डोळे झाकून देवाला मनातल्या मनात प्रार्थना करते की, "अभिमन्यू माझा बायको म्हणून स्वीकार करूदे. त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होऊदे. आम्हाला कायम बरोबर ठेव आणि माझ्या अभिमान्युंच्या चेहरा कायम हसरा, आनंदी ठेव."
वैदहीने प्रार्थना केल्यावर पुजारी अभिमन्यूला प्रार्थना करायला सांगतात.
अभिमन्यू मोठ्याने बोलूनच देवाला प्रार्थना करतो की, "माझ्या या मैत्रिणीने जे काही मागितले असेल ते तिला मिळूदे."
दोघांची देवाला प्रार्थना करून झाली होती. दोघे पुन्हा देवाच्या पाया पडतात आणि मग मंदिराच्या बाहेर येतात. जरावेळ तिथेच वरती थांबतात. तिथल्या सुंदर, शांत वातावरणाचा आनंद घेत असतात.
"वैदही तू देवाला इतका वेळ प्रार्थना करत होतीस, असे काय मागितले देवाकडे?" अभिमन्यू वैदहिला बोलतो.
"मी मागितले मला जे मागायचे होते ते. पण तुम्ही असे का म्हटला की माझ्या मैत्रिणीने जे मागितले असेल ते तिला मिळूदे?" वैदही बोलते.
"कारण मला माहित आहे; तू माझ्यासाठीच मागितले असणार. मग मी परत तेच देवाकडे का मागू!" अभिमन्यू बोलतो.
"पण मी माझ्यासाठीच काही मागितले असेल तर!" वैदही बोलते.
"तू स्वतःचा विचार माझ्या अगोदर करशील हे या देवाने जरी मला येऊन सांगितले तरी त्याच्यावर माझा विश्वास बसणार नाही." अभिमन्यू बोलतो.
"एवढा विश्वास आहे माझ्यावर आणि का आहे एवढा विश्वास?" वैदही बोलते.
"माझं जगणं हरवलेले असताना एक मुलगी माझ्याबरोबर लग्न करते, फक्त माझा ताप कमी व्हावा यासाठी अर्ध्यारात्री घनदाट जंगलातून जीवाची पर्वा न करता एकटी जाते. तिच्यावर नाही मग अजून कोणावर विश्वास ठेवायचा." अभिमन्यू बोलतो.
अभिमन्यू आणि वैदही यांच्या अशाच गप्पा रंगतात...
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा