Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४५

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४५"

अभिमन्यू आणि वैदही दोघेही बाजारातून फार्महाऊसवर आलेले असतात. फ्रेश झाल्यानंतर दोघेही जेवण करून घेतात आणि नंतर खोलीत गप्पा मारत असतात.

"वैदही संपले दोन दिवस. आता उद्या परत घरी जायचे." अभिमन्यू बोलतो.

"हम...एकदम भारी गेले हे दोन दिवस. मलातर खूप मजा आली." वैदही बोलते.

"गेल्या काही वर्षांपासूनचे हे माझे सर्वात चांगले दोन दिवस होते आणि ते फक्त तुझ्यामुळे. मनापासून तुझे खरंच खूप आभार." अभिमन्यू बोलतो.

"अभिमन्यू माझी एक इच्छा आहे. तुम्ही जसे दोन दिवस आनंदात राहिलाना तसेच कायम राहा." वैदही बोलते.

"तुझी इच्छा आहे ना मग राहिलकी. फक्त तू माझ्या बरोबर रहा." अभिमन्यू बोलतो.

"मी आहेच की तुमच्याबरोबर, मी कुठे जाणार आहे." वैदही बोलते.

"मी आज खूप आनंदात आहे आणि हे सर्व तुझ्यामूळे. तुला जर माझ्याकडून काही हवे असेल तर माग; मी नक्की देईल तुला." अभिमन्यू बोलतो.

"मला फक्त तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे. पण अजून एक आहे जे मला तुम्ही देऊ शकता! द्याल मला ते?" वैदही बोलते.

"दिले, तू सांग तुला काय पाहिजे?" अभिमन्यू बोलतो.

"अभिमन्यू मला वाटते तुम्ही आबांशी बोलावे. त्यांचाही खूप जीव आहे तुमच्यावर. त्यांनी काही जाणूनबुजून तर नाही केले." वैदही बोलते.

"वैदही आपण दुसऱ्या विषयावर बोलू. माझा मूड खूप चांगला आहे तो मला खराब नाही करायचा." अभिमन्यू बोलतो.

वैदहीच्या मागणीमुळे खोलीमध्ये वातावरण जरावेळ शांत आणि तणावपूर्ण असते. दोघेही बराच वेळ काहीच बोलत नाही. नंतर वैदही वाटते वातावरण जरासे हलके करावे म्हणून वैदही तिच्या ओढणीच्या टोकाने अभिमन्यूच्या कानात गुदगुदल्या करते.

"वैदही हे काय करतेस. लहान आहे का तू!" अभिमन्यू बोलतो.

वैदही पुन्हा तेच करते. यावेळेस अभिमन्यू तिच्याकडे गंभीर नजरेने बघतो. वैदही कानाला हात लावून "सॉरी" बोलते.
अभिमन्यू पुन्हा दुसरीकडे बघतो. वैदही पुन्हा तेच करते.

आता अभिमन्यू मात्र चिडतो. तो वैदहिला पकडण्याचा प्रयत्न करतो पण वैदही सुटते. अभिमन्यू वैदहीच्या मागे धावत होता आणि वैदही त्याच्या पुढे धावत होती.

थोडावेळ अशीच मस्ती केल्यानंतर दोघेही झोपी जातात.

सकाळी उठून दोघेही घरी निघण्याची तयारी करत असतात. अभिमन्यू एकदम मरगळ्या सारखी तयारी करत होता.

"काय पाटील साहेब घरी जाण्याची इच्छा नाहीये वाटतं?" वैदही बोलते.

"खरं सांगू! नाही वाटत घरी जावेसे. तुझ्याबरोबर इथेच रहावे असे वाटते." अभिमन्यू बोलतो.

"असे असेल तर आपण परत कधीतरी फिरायला जाऊ. पण आता घरी जावेच लागणार आहे. दोन दिवसांचा आपण वेळ काढला होता. संपला तो आता." वैदही बोलते.

दोघेही सर्व आटपून घरी जायला निघतात. इकडे पाटील वाड्यात सर्वजण बसलेले असतात. त्यांच्या नेहमीच्याच गप्पा चालू असतात.

"देवकी, अभी आणि वैदही निघाले का तिकडून?" आबासाहेब देवकीला विचारतात.

"हो निघाले आहे. बराच वेळ झाला त्यांना निघून." देवकी बोलते.

"काही बोलली का वैदही, तिथे दोन दिवस कसे गेले? काय झाले?" आबासाहेब बोलतात.

"आमचं काही एवढ बोलणं झालं नाही. ते घरी आल्यावर कळेलच आपल्याला." देवकी बोलते.

सर्वजण अभिमन्यू आणि वैदहीची वाट बघत असतात. सगळ्यांचे डोळे दरवाजाकडे लागून होते.

मालतीला तर वाटत होते, "अभिमन्यू आणि वैदही मध्ये खूप गैरसमज झाले असतील. त्यांच्यात वाद झाले असतील."
दिग्विजयला देखील मालती सारखेच वाटत होते.

बराच वेळ गेल्यानंतर अभिमन्यू आणि वैदही पाटील वाड्याच्या दरवाजावर येतात. त्यांना बघितल्यावर घरातले सगळे उठून उभे राहतात.

देवकीला, अभिमन्यू आणि वैदाहीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसत होते. देवकीला लगेच जाणवते हा तो अभिमन्यू नक्कीच नाहीये जो इथून गेला होता. यात बदल झाला आहे. शेवटी ती आई आहे आणि आईला मुलांमधला एवढासा बदल सुद्धा लगेच जाणवतो.

अभिमन्यू आणि वैदही घरात येतात. वैदही सर्वांच्या पाया पडते. वैदहीचे पाया पडायचे झाल्यावर अभिमन्यू पुढे होऊन सर्वांच्या पाया पडतो आणि शेवटला तो आबासाहेबांच्या पुढे येतो.

आबासाहेबांच्या पुढे उभे राहिल्याने सर्वांच्या नजरा अभिमन्यू वर खिळल्या होत्या. वेळ जणू थांबली होती. क्षणभर काहीच सुचत नाही. आबासाहेब उठून उभे राहतात. त्यांची नजर अभिमन्यूच्या नजरेला भिडते.

"आबा...." हा शब्द अभिमन्यूच्या तोंडून निघतो पण तोच शब्द त्याच्या गळ्यातही अडकतो. अभिमन्यू पुढे होऊन आबासाहेबांना घट्ट मिठी मारतो. आबासाहेब नकळत अभिमानच्या मिठीत सामावले जातात. वर्षांनूवर्षे मनात साठलेला राग, गैरसमज, वेदना त्या मिठीत विघळून जातात.

अभिमन्यू आणि आबासाहेब दोघांचेही डोळे पाणावले होते. किती वर्षांनी दोघे एकमेकांना सोबत बोलले होते. घरातील सर्वजण हे दृश्य बघून भावूक झाले होते. आबासाहेब हळूच अभिमन्यूच्या कपाळावर गोड पापी देतात.

देवकी, वैदहीकडे बघून तिच्या कळत जणू तिचे आभार मानत होते. देवकी जर काही बोलत नव्हती तरी तिची वैदहीवर असणारी नजर बरच काही बोलत होती. देवकीच्या चेहऱ्यावर एक समाधान होते.

अभिमन्यू आणि वैदही घरातील प्रत्येकाला बाजारात घेतलेले कपडे, वस्तू दाखवत होते, देत होते. त्यांच्या खूप गप्पा रंगल्या होत्या. ज्या घरात अभिमन्यूमुळे कायम चिंतेचे, तणावाचे वातावरण राहायचे आज त्याच घरात हास्य, गप्पा, आणि समाधान होते....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all