Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४७

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४७"

पाटील घरात सर्वजण आनंदात होते. अभिमन्यू मध्ये झालेल्या बदलामुळे घरातील उत्साहाचे वातावरण होते. हा आनंद अजून चांगला साजरा करण्यासाठी घरात पंचपक्वान्न बनवले होते तेही सर्व अभिमन्यूच्या आवडीचे.

रात्रीचे सर्व जेवायला बसलेले असतात. जेवायला सुरुवात होणार होती तोच आबासाहेब बोलतात, "आज कितीतरी वर्षांनी माझा अभी माझ्याबरोबर जेवायला बसला आहे त्यामुळे त्याला पहिला घास आज मी भरवणार."

असे बोलून आबासाहेब अभिमन्यूला घास भरवतात. आबासाहेब यांचे बघितल्यानंतर हळूहळू सर्वजण अभिमन्यूला घास भरवतात. सगळ्यांनी अभिमन्यूला भरवल्यामुळे इच्छा नसतानाही दिग्विजयला देखील अभिमन्यूला भरवावे लागते.

"वा! आई आज जेवण सर्व माझ्या आवडीचे बनवले आहे." अभिमन्यू देवकीला बोलतो.

"मग बनवणारच. तुला तरी आठवते का? असे तू कधी सर्वांसोबत जेवला आहे." देवकी बोलते.

"आई मला वाटते जुनी कोणतीच आठवण न काढलेली बरी." वैदही बोलते.

"वैदही तुला नेमके काय बोलायचे आहे? तुला असे वाटते का, भाऊजींनी सईला विसरून जावे." मालती मुद्दाम बोलते जेणेकरून अभिमन्यूचा गैरसमज होईल.

"वहिनी मी असे काहीच बोलले नाही. तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय." वैदही बोलते.

"आता सर्व विसरायचे असे म्हटल्यावर त्याचा अर्थ तोच होणार मागचे सर्व विसरून जा. हो की नाही भाऊजी." मालती बोलते.

"वहिनी मला वैदहीच्या बोलण्याचा अर्थ तूच काय ईतर कोणीही सांगण्याची गरज नाहीये. मला कळतो वैदहीच्या प्रत्येक वाक्याचा, शब्दाचा अर्थ." अभिमन्यू वैदहीकडे बघून हलकासा हसून बोलतो.

थोडावेळ कोणीही काही बोलत नाही. सर्वजण जेवणाकडे लक्ष देत असतात.

"अभी, मला वाटते तू आता थोडे थोडे कामाकडे पण लक्ष द्यायला हवे. म्हणजे लगेच नाही. तू तुझा वेळ घे आणि एकदम काम सुरू करण्यापेक्षा हळूहळू काम करावे असे मला वाटते." यशवंतराव बोलतात.

"तुमचं बरोबर आहे काका आणि मी त्याचा विचार पण केला आहे." अभिमन्यू बोलतो.

"अभी तू जर कामाचा विचार करत असशील तर आपल्या पक्ष कार्यालयाचे दरवाजे तुझ्यासाठी कायम मोकळे आहे." आबासाहेब बोलतात.

"आबा, तुम्हांलाही माहिती आहे मला राजकारण आवडत नाही आणि मी आत्ताच सांगतो मी काही राजकारणात येणार नाही." अभिमन्यू बोलतो.

"आरे मग कोण सांभाळेल माझा राजकीय वारसा. मी जे कमावलं आहे ते असच परक्याच्या हातात देऊ का?" आबासाहेब बोलतात.

"परक्याच्या हातात कशाला! दादा आहे की आणि त्याला राजकारण आवडतेपण, त्याची इच्छा देखील आहे." अभिमन्यू बोलतो.

"त्याच्या हातात दिले म्हणजे झालेच सगळे." आबासाहेब बोलतात.

"मग अभी तुझी काय इच्छा आहे? तुला काय करायचे आहे?" देवकी बोलते.

"आई माझी तीच इच्छा आहे जी अगोदर होती, शाळा सुरू करायची." अभिमन्यू बोलतो.

"अरे राजकरणात आल्यावर तुला शाळा सुरू करता येणार नाही असे कोणी म्हटले आहे का! तू तरीही शाळा सुरू करू शकतो." आबासाहेब बोलतात.

"बर नंतर काढा हा विषय. आता त्याला जेवण करूद्या." देवकी बोलते.

अभिमन्यू जेवण करून खोलीत येतो. खिडकी उघडून निळ्या आकाशातील चंद्राकडे एकटक बघत असतो. एकदम शांत, स्थिर मनाने त्याच्याकडे बघत असतो.

तेवढ्यात वैदही हळुवार पावलाने थबकत थबकत येऊन अभिमन्यूला घाबरवते आणि अभिमन्यू जोरात दचकतो. अभिमन्यूला घाबरलेले बघून वैदही जोराजोरात हसू लागते.

"वैदही काय हे लहान मुलांसारखे करते. मी किती दचकलो माहितीये." अभिमन्यू बोलतो.

"दचकावयाचे होते म्हणून तर मी घाबरवले तुम्हाला. कसला एवढा विचार करत होते?" वैदही बोलते.

"काही नाही जुन्या आठवणीत रमलो होतो. जुन्या आठवणी म्हणजे चांगल्या आठवणी. शाळा बांधण्याचे माझे आणि सईचे असे दोघांचे स्वप्न होते. विषय निघाला म्हणून त्या आठवणी ताज्या झाल्या." असे बोलताच अभिमन्यूचे डोळे पाणावतात.

अभिमन्यूच्या डोळ्यात पाणी बघुन वैदही बोलते, "अभिमन्यू परत डोळ्यात पाणी. आपल ठरलं आहेना त्यातून बाहेर पडायचे आहे." वैदही बोलते.

"हो मग ठरले आहे. पण तू काही काळजी करू नकोस मला काही त्रास होत नाही." अभिमन्यू वैदहीच्या डोक्यावर हात ठेवून बोलतो.

"नक्की काही त्रास होत नाहीना." वैदही बोलते.

"आरे खरंच. काहीच त्रास होत नाही." अभिमन्यू बोलतो.

"अभिमन्यू माझे पण एक स्वप्न आहे." वैदही बोलते.

"कोणते?" अभिमन्यू विचारतो.

"मी कॉलेजला असताना मलापण वाटायचे आपण गरीब मुलांसाठी शाळा काढली पाहिजे. आणि हो तुम्ही बोलताय म्हणून मी बोलत नाहीये. खरेच हे माझे स्वप्न आहे. तुम्ही हवंतर सरस्वतीताईंना विचारू शकतात. त्या मला मदत पण करणार होत्या." वैदही बोलते.

"ताईंना विचारण्याची काय गरज आहे. माझा विश्वास आहे तुझ्यावर. आता आपण दोघे मिळून शाळा काढू!" अभिमन्यू बोलतो.

"शाळा सुरू करण्याचे ठरलं तर मग! आणि हो त्या शाळेला नाव असेल "सई शिक्षण संस्था." वैदही बोलते.

वैदही असे बोलताच अभिमन्यू तिला मिठी मारतो. आज सईचे स्वप्न वैदहीचे झाले होते. अभिमन्यूला खूप गहिवरून येते. सईचे स्वप्न नव्या नावाने, नव्या रूपात, नव्या जोमात पुन्हा जन्म घेत होते....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all