दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४८"
सकाळचे रम्य वातावरण घरात पसरलेले असते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक तेज असते. वैदहीने नेहमीप्रमाणे घरातील सर्व पूजा, रांगोळी आटपून घेतले होते.
"नर्मदा, वैदहीने परत पूजा, रांगोळी सर्व करून घेतलेना." देवकी नर्मदाला बोलते.
"ताई मी पाठीमागेच तुम्हांला सांगितले; आता आपली सुट्टी झाली आहे." नर्मदा बोलते.
"ही पोरगी पण कशाला दगदग करते काय माहित!" देवकी बोलते.
"दादा, आता अभिचे पण टेन्शन नाहीये. घरात सर्व नीट चालू आहे. त्यामुळे मला वाटते तू, वहिनी, नर्मदा आणि मी आपण तीर्थक्षेत्रांना भेट द्यायला काही अडचण नाहीये." यशवंतराव बोलतात.
या गप्पा चालूच असतात तेवढ्यात वैदही सर्वांसाठी चहा घेऊन येते. वैदही सर्वांना चहा देत असते तितक्यात मालती आणि दिग्विजय पण येतात.
"वैदही आमच्यासाठी पण चहा आण." मालती वैदहिला सांगते.
"का? तुम्हाला हात नाहीये की पाय नाहीये!" आबासाहेब मालतीला बोलतात.
"आबा एवढ्यावरून कशाला बोलतात! वहिनी माझ्यापेक्षा मोठ्या आहे त्यांनी मला काम सांगितले काय चुकीचे आहे." असे बोलून वैदही मालती आणि दिग्विजय साठी चहा घेऊन येते.
"वैदही तुला किती वेळेस सांगितले जास्त दगदग नको करू म्हणून. तरी तू ऐकत नाहीस." देवकी बोलते.
"आई कुठे दगदग झालिये. मला सवय आहे या कामांची. उलट मी नाही केले तर मला कंटाळा येतो." वैदही बोलते.
"यशवंता कमालीच्या सुना भेटल्या आहे आपल्याला. एक एवढे काम करते की तिला काम नको करू म्हणून सांगायला लागते तरीपण ती करतेच. आणि एकीला कितीपण काम कर म्हणून सांगा तरी ती काम काही करत नाही." आबासाहेब बोलतात.
आबासाहेब असे बोलताच मालती दिग्विजयकडे रागाने बघते. तिला अपेक्षा असते की दिग्विजयने काहीतरी बोलावे पण दिग्विजयला देखील हे माहित होते की तो मध्ये बोलला तर आबासाहेबांचा पट्टा त्याच्यावर फिरेल. म्हणून मग तो गप मान खाली घालून चहा पितो.
"वैदही अभी उठला का?" देवकी विचारते.
"आई अभिमन्यू केव्हाच उठले. आम्ही दोघेही सोबत शतपावलीला गेलो होतो. नंतर आम्ही धावलो, व्यायाम केला, योगा पण केला. अभिमन्यूंनी मलातर नवनवीन व्यायामाचे, योगाचे प्रकार पण सांगितले. नंतर सोबत देवाची आरती पण केली. आता मी गेले होते त्यांच्याकडे ते पुस्तक वाचत होते. ते वाचून झाल्यावर येतील खाली." वैदही बोलते.
"देवा, पांडुरंगा तुझीच कृपा झालीरे." देवकी हात जोडून बोलते.
"बर वैदही अभिच्या नाष्ट्याचे काय?" नर्मदा बोलते.
"काकू अभिमन्यूंचा आणि माझा नाष्टापन झाला आहे." वैदही बोलते.
"आता कुठे माझ्या घराला घरपण आले आहे." आबासाहेब बोलतात.
अभिमन्यूचे पुस्तक वाचून झालेले होते. तो खाली येतो. हॉल मध्ये अजूनही सर्व बसलेलेच असतात.
"मग अभी झोप कशी झाली?" देवकी अभिमन्यूला विचारते.
"एकदम छान झाली." अभिमन्यू बोलतो.
"अभी तू धावायला, व्यायामाला सुरुवात केली हे एकदम चांगले केले." यशवंतराव बोलतात.
"चांगले तर आहे. काका तुम्हाला सांगतो, धावण्यासाठी आपला जोडीदार चांगला धावणारा असेल तर आपल्याला अजून मजा येतो पण आपला जोडीदार चांगला नसेल तर मजाच येत नाही. माझा जोडीदार तर एकदम फुसका निघाला." अभिमन्यू गमतीने बोलतो.
अभिमन्यू बोलल्यावर सगळे हसतात.
"होका, मग मी उद्या येतच नाही. एकटेच जा तुम्ही." वैदही बोलते.
सगळ्यांचा असाच हसीमजाक चालू असतो.
"आई मी आश्रमात जाऊन येते. बरेच दिवस झाले गेले नाही." थोडावेळ गेल्यावर वैदही बोलते.
"वैदही मीपण येतो आश्रमात." अभिमन्यू बोलतो.
वैदहिला लगेच तो दिवस आठवतो जेव्हा ती स्वतःहून अभिमन्यूला आश्रमात घेऊन जात होती पण अभिमन्यू तयार नव्हता. आणि आज तो स्वतःहून तयार झाला होता.
नंतर तयारी करून अभिमन्यू आणि वैदही आश्रमात जायला निघतात.
इकडे आश्रमात सरस्वतीताईंचे काम चालू होते. काम चालू असताना बाहेर त्यांना गोंगाट ऐकू येतो म्हणून त्या बाहेर जातात. बाहेर अभिमन्यू आश्रमात आलेला असतो. आश्रमातील लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली होती.
त्यांच्या डोळ्यात अभिमन्यू बद्दलचे प्रेम स्पष्ट दिसत होते. वैदही बाजूला उभे राहून हे सर्व बघत होती. तिला त्या क्षणाचे
कुतूहल वाटत होते. मग सरस्वतीताई जवळ येतात.
कुतूहल वाटत होते. मग सरस्वतीताई जवळ येतात.
सरस्वतीताईंना बघितल्यावर अभिमन्यू "ताई...." म्हणून आवाज देतो. दोघांचीही भेट होते. अभिमन्यू आश्रमातील सगळ्या लोकांना भेटतो.
सगळे अभिमयूला प्रश्न करत होते,
"तुम्ही कुठे होता....?"
"इतक्या दिवस का नाही आला...?
"तुम्ही कुठे होता....?"
"इतक्या दिवस का नाही आला...?
पण अभिमन्यूकडे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. मग वैदही पुढे येऊन बोलते, "अभिमन्यू कुठे होते? इतक्या दिवस का नाही आले? यापेक्षा ते आता आले हे महत्त्वाचे आहे की नाही त्यामुळे पाठीमागचे सर्व जाऊद्या."
थोड्यावेळाने अभिमन्यू, वैदही, सरस्वतीताई गप्पा मारत बसतात. नंतर अभिमन्यू पूर्ण आश्रम डोळ्याखालून घालतो.
आश्रमात काही भिंती बदलल्या होत्या तर काही त्याच जुन्या. हे सर्व बघून अभिमन्यूच्या जुन्या आठवणी ताज्या होतात पण यावेळेस त्याचे त्याच्या भावनांवर नियंत्रण होते. तो गोठून जात नाही.
आश्रमात काही भिंती बदलल्या होत्या तर काही त्याच जुन्या. हे सर्व बघून अभिमन्यूच्या जुन्या आठवणी ताज्या होतात पण यावेळेस त्याचे त्याच्या भावनांवर नियंत्रण होते. तो गोठून जात नाही.
हे सर्व दूरवर उभे राहून वैदही बघत होती. तिची नजर काही अभिमन्यू वरून हलत नव्हती....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा