Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ५०

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणार प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ५०"

वैदही मुंबईला चालली होती पण तिच्या डोक्यात मात्र अभिमन्युचीच चिंता होती. अभिमन्यू आता कुठे सावरायला लागला होता. भूतकाळातील आठवणींच्या गर्दीत पुन्हा त्याने अटकू नये एवढेच तिला वाटत होते.

वैदही गेल्यावर अभिमन्यू घरात पुस्तक वाचत बसला होता. देवकीने अभिमन्यूला पुस्तक वाचताना बघितल्यावर तिच्या जीवात जीव आला. देवकी त्याच्या वाचनात व्यत्यय आणत नाही. देवकी अभिमन्यूला बघून तशीच तिथून निघून जाते.

अभिमन्यू वाचनात व्यस्त होता. मध्येच त्याला तहान लागते म्हणून तो बाजूला बघतो तर काय! बाजूला "वैदही" उभी होती. त्याला मोठा धक्काच बसतो. वैदही मुंबईला गेली होती मग ती मला पाणी घेऊन कशी आली असे त्याला वाटते. म्हणून तो डोळे मिटून डोळे चोळतो आणि परत उघडतो. तेव्हा वैदही तिथे नसते.

अभिमन्यूच्या लक्षात येते की त्याला "भास" झाला होता आणि मग तो एकटाच हसायला लागतो. थोडावेळ गेल्यानंतर अभिमयूला दरवाजातून "जेवायला चला" आवाज येतो. तो दरवाजात बघतो तर वैदही तिथे उभी होती.

अभिमन्यू सावकाश पुढे चालत जाऊन वैदहिला पकडण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याच्या मनातील वैदहीचे प्रतिबिंब होते. अभिमन्यूच्या हे लक्षात येते. तो त्याचे डोके खाजवायला लागतो. त्याच्या एक चेहऱ्यावर एक प्रेमाची छटा होती.

रात्रीची वेळ झाली होती. वैदही मुंबईला पोहोचली होती. मुंबईच्या त्या मोठ्या मोठ्या ईमारती, चौफेर प्रकाशाचे दिवे, रस्त्यावरील माणसांची, गाड्यांची ये-जा, आणि तिथली गर्दी प्रेमळ पण नवीन माणसासाठी थक्क करणारी.

वैदही हॉटेल मध्ये पोहोचली होती. सर्वात पहिले अभिमन्यूला फोन करावा म्हणून वैदही फोन काढते. ती अभिमन्यूला व्हिडीओ कॉल करते. व्हिडिओ कॉल अभिमन्यू उचलतो.

व्हिडिओ कॉलवर अभिमन्यूची स्थिती बघून वैदहिला खूप मोठा धक्का बसतो. अभिमन्यूच्या हातात दारूची बाटली होती. केस विस्कटलेले होते. शर्टाची बटणे उघडी होती.
दारू पिल्यावर त्याची जी अवस्था नेहमी असायची तीच अवस्था आता होती.

हे सगळे बघून वैदहीला खुप वाईट वाटते. वैदही काहीच बोलत नाही. ती शांतपणे अभिमन्यूकडे बघत होती. आणि स्वतःलाच दोष द्यायला लागते की ती का मुंबईला आली!

"व...व...वैदही तू गेली मुंबईला?" अभिमन्यू अडखळत बोलतो.

वैदही मात्र शांतच होती. डोक्याला हात लावून बसली होती. इतक्या दिवसांची मेहनत व्यर्थ गेल्यासारखे तिला वाटत होते.

"अभिमन्यू तुम्ही का दारू पिला? मी सांगितले होते तुम्हांला प्यायचे नाही." वैदहीच्या बोलण्यात एक वेदना होती.

अभिमन्यू काहीच बोलत नाही. वैदहीच्या डोळे पाणावतात.
वैदहीचे पाणावलेले डोळे बघून अभिमन्यू लगेच स्वतःला सावरतो. केस नीट करतो, शर्टाची बटणे लावतो.

"वैदही मी नाही प्यायलो. मी गंमत करत होतो." अभिमन्यू बोलतो.

वैदही क्षणभर शांत राहून बोलते, "तुम्ही खरं बोलताय?"

"एकदम खरं बोलतोय आणि मी एकदम व्यवस्थित पण आहे. मला कसला त्रास पण होत नाही आणि या बाटलीत दारू नाही कोल्ड्रिंक्स आहे." अभिमन्यू बोलतो.

"अशी कोणी मस्करी करत का! मला इकडे काय वाटले माहिती आहे का?" असे बोलून वैदही कॉल कट करते.

अभिमन्यू पुन्हा वैदहिला कॉल करतो पण ती त्याचा कॉल उचलतच नाही. अभिमन्यू दोन-तीन वेळेस प्रयत्न करतो पण त्याला काहीच उत्तर येत नाही.

शेवटी अभिमन्यू देवकीकडे जातो आणि तिच्या फोनवरून वैदहिला कॉल करतो.

"आरे वैदही सॉरी, मी परत असे नाही करणार." अभिमन्यू बोलतो.

"मला तुमच्या बरोबर नाही बोलायचे. तुम्ही फोन ठेवा." वैदही चिडून बोलते.

"मी उठ्याबश्या काढू का? काय करू म्हणजे तुझा राग जाईल?" अभिमन्यू बोलतो.

"आईंना फोन द्या." वैदही बोलल्यावर अभिमन्यू देवकीला फोन देतो.

"आई मी अभिमन्यूंना कॉल केला होता तर ते मुद्दाम माझ्या पुढे दारू पिल्याचे नाटक करत होते. मला किती वाईट वाटले." वैदही बोलते.

"असं आहे का! मी बघतेच त्याच्याकडे! परत अशी मस्करीच करणार नाही." देवकी बोलते.

थोडावेळ वैदही आणि देवकीचे फोनवर बोलणे चालू असते.

देवकी बेडवर बसलेली असते. अभिमन्यू जमिनीवर खाली बसून देवकीच्या मांडीवर डोके ठेवतो. देवकी मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते.

"आई एक सांगू मला वैदहीचे भास होत आहेत. असे वाटते का मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही." अभिमन्यू बोलतो.

"अभी तू वैदहीमध्ये गुंतत चालला आहे. तू वैदहीवर प्रेम करू लागला आहे." देवकी बोलते.

देवकीचे बोलणे ऐकून अभिमन्यू स्तब्ध होतो. त्याच्या मनात येते मी तर सईवर प्रेम करतो मग माझे वैदहिवर प्रेम कसे असू शकते. अभिमन्यू पेचात पडलेला असतो, सई की वैदही....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all