दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ५१"
देवकी आणि अभिमन्यू बोलत असतात तेव्हा देवकी अभिमन्यूला सांगते की, तो वैदहीवर प्रेम करू लागला आहे.
हे ऐकताच अभिमन्यू स्तब्ध होतो. त्याला वाटते त्याचे सईवर प्रेम आहे मग वैदहीवर त्याचे प्रेम कसे होईल.
हे ऐकताच अभिमन्यू स्तब्ध होतो. त्याला वाटते त्याचे सईवर प्रेम आहे मग वैदहीवर त्याचे प्रेम कसे होईल.
"आई हे कस शक्य आहे. माझं तर सईवर प्रेम आहे." अभिमन्यू बोलतो.
"अभी सई तुझा भूतकाळ होती आणि वैदही तुझा वर्तमानकाळ आहे. ती आता तुझ्याबरोबर आहे." देवकी बोलते.
"ते ठीक आहे आई पण मग सईवर प्रेम असताना वैदहीवर प्रेम कसे होईल?" अभिमन्यू बोलतो.
"तू चुकीच समजतोय अभी. सईवर तुझं प्रेम होतं. वैदहीवर तुझं प्रेम आहे." देवकी बोलते.
"आई पुन्हा प्रेम कसं होईल. प्रेम तर एकदाच होतं ना!" अभिमन्यू बोलतो.
"प्रेम एकदाच होतं, दोनदाच होतं अस काही नाहीये. मुळात प्रेम ही एक सुंदर भावना आहे आणि ती निर्माण होत नाही तर ती एक अनुभूती आहे. प्रेम अनुभवण्याचा भाग आहे."
"नवरा-बायकोचेच प्रेम असते असे थोडीच. आई आणि लेकरू, वडील आणि लेकरू, भाऊ आणि बहीण, मित्रमैत्रिण यांचेही प्रेम असतेचना. या सगळ्याविषयी आपल्याला प्रेमच वाटतेच मग आपण असे बोलतो का यापैकी माझे एकावरच प्रेम आहे." देवकी अभिमन्यूला समजावत असते.
"पण आई नवरा-बायकोचे नाते यापेक्षा वेगळे असते." अभिमन्यू बोलतो.
"अजिबात नाही. सर्व नाती सारखीच असतात. नवरा-बायकोचे शरीर संबंध सोडले तर त्यांच्या नात्यातली आपुलकी, जिव्हाळा, करुणा, माया आणि प्रेम हे तर सर्वच नात्यात असते." देवकी बोलते.
"आई तुला असे म्हणायचे आहे की प्रेम पुन्हा होऊ शकते." अभिमन्यू बोलतो.
"नक्कीच होऊ शकते. नवरा-बायकोच्या नात्याच्या विचार केला तर असे कितीतरी लोकं या जगात आहे, त्यांच्या जोडीदाराने त्यांची साथ खूप लवकर सोडली. मग त्याला कारण काहीही असेल, म्हणजे घटस्फोट होणे, निधन होणे. पण त्या लोकांनी दुसरे लग्न करून आपल्या नवीन जोडीदारा सोबत छान संसार केला. अशी कितीतरी लोकं आपण आपल्या आजुबाजूला बघतोच. मग त्यांचे त्यांच्या नवीन जोडीदारा सोबत असलेले प्रेम खोटे का?"
"एकदाच प्रेम होते म्हटल्यावर ज्यांचा जोडीदार त्यांची साथ सोडून गेला, त्यांना पुन्हा प्रेम करण्याचा अधिकार नसतो का? हा आता तुमचा जोडीदार तुमच्या सोबत आहे तरी तुम्ही दुसऱ्याकडे आकर्षित होत असाल तर ते प्रेमच नाही. ते फक्त आकर्षण आहे. पण तुम्ही आयुष्यात एकटे आहात एखादी व्यक्ती तुम्हांला भेटली आणि तिच्या बद्दल तुमच्या मनात भावना आहे तर ते प्रेम असू शकते." देवकी बोलते.
"आई मग सई बद्दलच्या भावना खऱ्या का वैदही बद्दलच्या?" अभिमन्यू बोलतो.
"दोघींबद्दलच्या भावना एकदम खऱ्या आहे. सई बद्दल वाटणारे प्रेमपण खरे आणि वैदही बद्दल वाटणारे प्रेमपण खरे. फक्त सई बद्दलच्या भावना या भूतकाळातल्या आहे. जे होऊन गेले. आणि वैदही बद्दलच्या भावना जिवंत आहे ज्या आता जाणवत आहे." देवकी बोलते.
"आई तू जे बोलली आहे त्यावर मी नक्कीच विचार करील." असे बोलून अभिमन्यू झोपायला जातो.
सकाळी झालेली असते. एक नवीन सुरुवात अभिमन्यूची वाट बघत होती. अभिमन्यू झोपेतून उठून नुकताच बसलेला असतो. देवकी तो उठला का नाही हे बघण्यासाठी आली होती.
"कायरे अभी; उठायला उशीर झाला आज?" देवकी बोलते.
"तू बोलली त्याचा रात्री खूप उशिरापर्यंत विचार करत होतो. मग जाणवलं तू जे बोलत होती ते बरोबर आहे." अभिमन्यू बोलतो.
"म्हणजे तुझ्या लक्षात आले तर तुझे वैदहीवर प्रेम आहे." देवकी बोलते.
अभिमन्यू अलगद लाजतो.
"काय मुलींसारखा लागतोय. वैदहिला फोन करून सांग मग." देवकी बोलते.
"नाही आई मी तिला सरप्राइज देणार आहे." अभिमन्यू बोलतो.
"बर ठीक आहे. आवरून लवकर नाष्टा करायला खाली ये." असे बोलून देवकी निघून जाते.
अभिमन्यू वैदहीचा फोटो हातात घेऊन एकटक त्या फोटोकडे बघत असतो. अभिमन्यूच्या हृदयात आज वेगळीच धडधड होत होती. तो फोन काढून वैदहिला कॉल करून तिच्याशी गप्पा मारू लागतो. पहिल्यादांच अभिमन्यू वैदहिशी बायको समजून तिच्या सोबत बोलत होता....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा