दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ५२"
वैदहीचे मुंबईतले काम आटोपले होते. ती पुन्हा घरी यायला निघाली होती. घरी तिचे एक छान सरप्राइज वाट बघत होते.
तिने स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल असे स्वागत तिचे होणार होते.
तिने स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल असे स्वागत तिचे होणार होते.
इकडे अभिमन्यू वैदहीच्या स्वागताची जय्यत तयारी करत होता. त्याचे वैदहीवर किती प्रेम आहे हे त्याला सांगायचे होते.
वैदही कधी मुंबईवरून येते असे त्याला झाले होते. वैदहिला सरप्राइज देण्याच्या प्लॅन मध्ये सर्वजण सहभागी होते.
वैदही कधी मुंबईवरून येते असे त्याला झाले होते. वैदहिला सरप्राइज देण्याच्या प्लॅन मध्ये सर्वजण सहभागी होते.
पाटील वाड्यात सजावटीचे काम जोरात सुरू होते. सगळ्यांची धावपळ सुरू होती. शुभांगी, वैदहिला फोन करून महत्वाचे काम आहे असे सांगून तिच्या घरी बोलवून घेते. वैदहिला शुभांगीकडे पाठवणे हा अभिमन्यूचा प्लॅन होता. वैदही देखील घरी न जाता थेट शुभांगीच्या घरी जाते.
"काय शुभांगी, असे काय महत्वाचे काम आहे म्हणून तू मला एवढे घाईघाईत बोलावले." वैदही बोलते.
"वैदही तू मला लग्न झाल्यापासून विसरली आहे. मला एकदातरी लग्नानंतर भेटली आहे का?" शुभांगी बोलते.
"तू हे विचारण्यासाठी मला एवढ्या घाईत बोलावले आहे." वैदही बोलते.
"अरे मग तू तशी आली असती का! मला तुला भेटायचे होते." शुभांगी बोलते.
"अरे मग नीट बोलली असती तर आले नसते का! आणि मी अजून अभिमन्यूंना पण नाही भेटले अजून!" वैदही बोलते.
"काय तुझं सारखं अभिमन्यू अभिमन्यू चालत असते. थोडा इतरांना तरी वेळ दे." शुभांगी बोलते.
"तुला नाही कळणार आणि परत अभिमन्यू वरून काही बोलायचे नाही." वैदही बोलते.
वैदही आणि शुभांगीच्या अशाच गप्पा चालू असतात. थोड्या वेळाने वैदही निघायला लागते. शुभांगी तिचा हात खेचून तिला खाली बसवत बोलते, "अजून वेळ आहे तुला जायला."
"अरे खेचते काय? आणि अजून वेळ आहे जायला म्हणजे काय?" वैदही बोलते.
"काही नाही. मला सांग तू काय घेणार चहा, कॉफी?" शुभांगी बोलते.
"मला काही नको. मला आता उशीर होत आहे. मला घरी जायचे आहे." वैदही बोलते.
"नाही, तुला काहीतरी घ्यावेच लागेल." शुभांगी हट्टच करते, त्यामुळे वैदही चहा पिण्यासाठी तयार होते.
शुभांगी वैदहीच्या कपड्यांवर जाणूनबुजून चहा पाडते. अभिमन्यूने वैदहीसाठी एक साडी दिलेली असते. ती साडी वैदहिला नेसण्यासाठी द्यायची असते म्हणून शुभांगी चहा पाडते.
शुभांगी साडी घेऊन येते आणि वैदहिला देते.
"चहा पडल्याने तुझा ड्रेस खराब झाला आहे म्हणून तू ही साडी नेस." शुभांगी बोलते.
"तू डोक्यावर पडली आहे का! एवढी चांगली साडी नेसू आणि तेही आस रस्त्याने फिरताना. तुझा एखादा साधा ड्रेस असेल तो दे." वैदही बोलते.
"नाही तू हिच साडी नेसायची. हा... ते आपल्याला फोटोशूट साठी जायचे मला तुझ्यासोबत फोटो काढायचे आहे." शुभांगी बोलते.
"मध्येच काय हे फोटोंचे. मला नाही काढायचे, मला घरी जायचे आहे. अभिमन्यू वाट बघत असतील." वैदही बोलते.
"तुला तर साडी नेसावीच लागणार आहे. तसे मी तुला जाऊन देणार नाही. बघ... तू जेवढा उशीर करशील तुला घरी जायला तेवढाच उशीर होईल." शुभांगी बोलते.
शेवटी वैदही शुभांगीच्या हट्टापुढे झुकते. वैदही साडी नेसते. शुभांगी तिचा छान मेकअप करते. कपाळावर चंद्रकोर, गळ्यात चैन, नाकात नाथ, कानात झुपके, हातात हिरव्या बांगड्या, आणि केसांत मोगऱ्याचा गजरा.
वैदही एकदम सुंदर दिसत होती. तिचे सौंदर्य एखाद्या फुलपाखराला पण लाजवेल असे होते. साक्षात रूपाची राणीच अवतरली होती.
"तू मला एवढे तयार केले आहेस. आपण कुठे कार्यक्रमाला चाललो आहोत का?" वैदही बोलते.
"तू फक्त गप्प राहून मी जे बोलते ते कर. तुला कळेल नंतर काय चालू आहे." शुभांगी बोलते.
"फोटोशूट करायचे आहे मग तू का तयार झाली नाही?" वैदही बोलते.
"तू फक्त माझ्या बरोबर चल. जास्त प्रश्न नको विचारू." असे बोलून शुभांगी वैदहिला घेऊन घराबाहेर पडते.
शुभांगी, वैदहिला पाटील वाड्याबाहेर आणून सोडते. पाटील वाड्याच्या दरवाजा बंद असतो. वाड्याच्या आतमध्ये अभिमन्यू एकटाच वैदहीची वाट बघत असतो आणि घरामध्ये सरप्राइज वैदहीची वाट बघत होते.....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा