Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ५३

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ५३"

ठरल्याप्रमाणे शुभांगी, वैदहिला तयार करून पाटील वाड्याबाहेर घेऊन येते. पाटील वाड्याच्या दरवाजा बंद असतो. आजुबाजूला कोणीही नव्हते.

"जा तुला खूप घाई होतीना घरी यायची." असे बोलून शुभांगीही तिथून निघून जाते. वैदही तिला आवाज देत असते पण ती काही मागे वळून बघत नाही. वैदहिला कळतच नव्हते नेमके हे काय चालू आहे. वैदही आजुबाजूला बघते पण तिला कोणीही दिसत नाही. वैदहिला थोडी भीती देखील वाटत होती.

वैदेही तिचे पाऊल सावकाश टाकत टाकत दरवाजाजवळ येऊन दरवाजा ढकलते. वाड्यात काळोख पसरलेला असतो. "आई...आई....असा आवाज देत वैदही दबकत दबकत पुढे येते आणि वैदहीवर एक मनमोहक प्रकाश पडतो. वैदही थोडीशी दचकते.

प्रकाश पडल्यावर वैदही एकाच जागेवर उभी राहते. तिला आजुबाजूला फुगे पसरलेले दिसतात. वाड्यात एक छान सुगंध दरवळत होता. संपूर्ण वाडा फुलांनी सजवला होता. तिथे अवतीभोवती वैदही आणि अभिमन्यूच्या लग्नाचे फोटो लावलेले होते. वैदही हे सर्व बघत असते तोच तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो.

वैदहिला हे सर्व खूप भारी वाटत होते. पण हे काय चालू हे मात्र तिला कळत नव्हते. त्यामुळे ती गोंधळून गेली होती. तितक्यात तिची नजर वरच्या खोलीत जाणाऱ्या जिन्याच्या पायऱ्यांवर पडते. त्या पायऱ्यांवर अभिमन्यू उभा होता. त्याला बघितल्यावर वैदहीच्या जीवात जीव येतो. आणि हे सर्व अभिमन्यूंनी केले की काय असा संशय पण येतो.

"या अंधारलेल्या जीवनात तू पहाट बनून आलीस;
या गोठलेल्या हृदयावर तूच प्रेमाची फुंकर घातलीस;

"या बेरंगी जीवनात तू इंद्रधनुचे सप्तरंग फुंकले;
तुझ्याच मुलायम स्पर्शाने या हृदयाचे तार छेडले;"

"तुझ्यामुळेच या कुजलेल्या मनाला पालवी फुटली;
तुझ्यामुळेच या बंदिस्त हृदयाची दारे उघडली;"

" सप्तसुरांचे सूर तू या हृदयात भरले;
तुझेच गीत या मणी कायम वसले;"

"तू असशील जिथे तेच असेल माझे तीर्थ;
तुझ्याविना हे संपूर्ण जीवन आहे व्यर्थ;"

"तुझ्या येण्याने जीवन झाले मधुर;
अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर;"

या पंक्ती अभिमन्यू वैदहीसाठी पायऱ्या उतरत उतरत बोलत असतो. अभिमन्यूला बघून, आणि त्याच्या तोंडून हे ऐकून वैदहीचे डोळे पाणावतात. वैदहिला आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

अभिमन्यू वैदही समोर येतो. एका गुघग्यावर बसतो. गुलाबी फुलांचा गुच्छ वैदहीच्या समोर करून बोलतो, "वैदही माझं तुझ्यावर खूप....खूप....प्रेम आहे. मला असच कायम तुझ्याबरोबर रहायचं आहे. वैदही तूच माझा श्वास, तूच माझा ध्यास, डोळे माझे असतील पण स्वप्न मात्र तुझी असतील.
वैदही मी तुला कधीच अंतर देणार नाही."

अभिमन्यूच्या तोंडून हे ऐकून वैदही पूर्ण गोठून गेली होती. जगातले सर्व सुख तिला तिच्या पायाजवळ वाटत होते.
वैदहीची नजर एकटक अभिमन्यूवर खिळली होती. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.

अभिमन्यू उठून उभा राहतो. वैदही त्याला घट्ट मिठी मारते. दोघांनाही एकमेकांचा श्वास जाणवत होता. त्यांचे हृदयाचे ठोके एक झाले होते. त्या मिठीत दोन आत्मे एकत्र विरघळून एक झाले होते. जणू काही हृदय अभिमन्यूचे आणि श्वास वैदहीचा; हृदय वैदहीचे आणि श्वास अभिमन्यूचा. वेळ जणू दोघांसाठी थांबली होती.

"अभिमन्यू मी खूप वाट बघितली या क्षणाची. एक दिवस तरी हा क्षण येईल याची मला खात्री होती. अभिमन्यू माझेही तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच नाही करू शकत. तुम्हीच माझे आयुष्य, माझा प्राण आहात." वैदही तिच्या भावना व्यक्त करते.

अभिमन्यू वैदहिला बोलतो, "वैदही आज या क्षणापासून "माझे सर्व सुख तुझे, तुझे सर्व दुःख माझे."

प्रेम आणि विश्वासावर सुरू झालेले वैदही आणि अभिमन्यूच्या नात्याची एका नवीन प्रवासाला सुरूवात होते....