दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४४"
देवाचे दर्शन झाल्यानंतर अभिमन्यू आणि वैदही मंदिराच्या खाली येतात. आता पुढे काय करायचे याचा विचार ते करत असतात.
"अभिमन्यू आता कुठे जायचे?" वैदही बोलते.
"मी पहिल्यांदाच इकडे आलो आहे त्यामुळे मलाही फारसे इथले काही माहित नाही." अभिमन्यू बोलतो.
"इथे कोणालातरी विचारायचे का, जवळ काही बघण्यासारखे आहे का?" वैदही बोलते.
"थांब मी त्या दुकानदाराला विचारतो." असे बोलून अभिमन्यू दुकानदाराकडे जातो.
"भाऊ, इथे जवळ काही बघण्यासारखे आहे का?" अभिमन्यू दुकानदाराला बोलतो.
"पूर्वेला तीन चार किलोमीटरवर एक गाव आहे. तिथे आज बाजार भरतो. तो बाजार मोठा आणि बघण्यासारखा असतो. एखाद्या जत्रेसारखा एकदम. तुम्ही बघू शकता." दुकानदार बोलतो." दुकानदार बोलतो.
दुकानदाराने अभिमन्यू वैदहीकडे जातो आणि तिला बाजाराबद्दल सांगतो.
"चला मग जाऊ बाजाराला. तिथे आपल्याला घरातल्यांसाठी काही घेता येईल!" वैदही बोलते.
"ठीक आहे चल मग." अभिमन्यू बोलतो.
"अभिमन्यू मी गाडी चालवू?" वैदही बोलते.
"विचारते काय! चालवायची आहेना तुला चालव मग." अभिमन्यू बोलतो.
दोघेही गाडीत बसतात. वैदही गाडी चालवत असते.
"अभिमन्यू एवढ्या पायऱ्या तुम्ही कशा चढल्या? आणि तेही मला घेऊन." वैदही बोलते.
"माहित नाही. तुझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत राहिलो आणि मला काहीच समजले नाही." अभिमन्यू बोलतो.
"एवढी सुंदर दिसते मी?" वैदही बोलते.
"हो, तू खूप सुंदर दिसते. आणि तू जितकी सुंदर दिसते तेवढेच तुझे मन देखील सुंदर आहे." अभिमन्यू बोलतो.
बोलता बोलता दोघेही बाजारात पोहचतात. बाजारात वेगळीच गजबज सुरू होती. दोन्ही बाजूंनी रांगेत उभ्या असलेल्या दुकानांमधले रंगबेरंगी कपडे, लहान मुलांची खेळणी, भाजीपाला, मसाले त्या दुकानांत होते.
प्रत्येक दुकानदार ज्याच्या त्याचा माल विकण्यासाठी जीवाच्या आकांताने बोलत होता, गिऱ्हाईकांना बोलवत होतात.
"अभिमन्यू किती छान, आणि मोठा बाजार आहेना!" वैदही बोलते.
"हो, एकदम मस्त वाटत आहे. आपण नक्कीच काहीतरी खरेदी करू." अभिमन्यू बोलतो.
"अभिमन्यू ते बघा तिकडे रिंग टाकून सामान जिंकण्याचा खेळ चालू आहे. मला ते खेळायचे आहे." वैदही बोलते.
"खेळायचे आहेना, चल मग." अभिमन्यू बोलतो.
रिंगचा खेळ खेळण्यासाठी अभिमन्यू आणि वैदही जातात. दहा रुपयात त्यांना पाच रिंग टाकण्याची संधी असते. पहिल्या तीनही रिंग वैदही टाकते पण तिला यश मिळत नाही.
अशातच वैदहीचे लक्ष आरशावर जाते. त्या आरशात अभिमन्यूचा चेहरा दिसत होता. वैदही ठरवते तो आरसा काही करून घ्यायचा आहे. मग ती रिंग फेकते आणि आरशावर बरोबर पडते. वैदहीने तो आरसा जिंकलेला असतो.
एक रिंग बाकी होती म्हणून वैदही बोलते, "अभिमन्यू ही शेवटची रिंग आहे तुम्ही टाका ही रिंग."
अभिमन्यू "ठीक आहे" बोलून ती रिंग घेतो आणि त्या दुकानदाराच्या गल्ल्यावरच फेकतो.
"काय दादा, असे तर तुम्ही आमचं दुकानच बंद कराल. हा माझा गल्ला आहे आणि खेळातल्या वस्तू तिकडे आहे. तिकडे फेका." असे बोलून दुकानदार अभिमन्यूला परत रिंग देतो.
"राहूद्या भाऊ. मी मुद्दाम फेकली होती. आमचं रिंग टाकून झाले आहे." अभिमन्यू बोलतो.
मग नंतर अभिमन्यू आणि वैदही बाजारात फिरायला लागतात. अभिमन्यूने वैदहीचा हात पकडलेला असतो. त्या दोघांच्या छान बाजारातल्या गप्पा चालू होत्या. बोलता बोलता अभिमन्यू वैदहीचा हात सोडतो.
अभिमन्यूने हात सोडल्यावर वैदहिला गंमत सुचते. वैदही लपून बसते पण तिचे लक्ष अभिमन्यूवर होते. थोडे पुढे गेल्यावर अभिमन्यूच्या लक्षात वैदही त्याच्याबरोबर नाहीये.
अभिमन्यू इकडे तिकडे बघू लागतो. अभिमन्यू वैदहिला फोन करतो पण वैदही फोन उचलत नाही. थोडावेळ झाल्यावर अभिमन्यू कासावीस व्हायला लागतो. तो वैदहिला आवाज द्यायला लागतो. वैदहिला थोडी मजा येत होती.
अभिमन्यूच्या डोळ्यातून अश्रु येऊ लागतात. आईवडिलांचा गर्दीत हात सुटल्यावर जशी अवस्था लहान मुलांची होते तशीच अवस्था अभिमन्यूची झाली होती.
अभिमन्यूची ही अवस्था बघून आता मात्र वैदहिला अपराधीपणाची जाणीव झाली. वैदही लगेच बाहेर येऊन अभिमन्यूकडे जाते.
वैदहिला बघताच अभिमन्यू तिला घट्ट मिठी मारतो. अभिमन्यूच्या डोळ्यातून अश्रु येत होते आणि ओठातून शब्द फुटत नव्हते. अभिमन्यू खूप घाबरला होता.
"अभिमन्यू मी कुठेच गेले नव्हते. इथेच होते, फक्त एक छोटीशी गंमत करत होते." वैदही बोलते.
अभिमन्यू काहीच बोलत नाही. वैदही अजूनही अभिमन्यूच्या मिठीत होती. आजूबाजूचे सर्व लोक त्यांना बघत होते. थोडावेळ गेल्यावर अभिमन्यू स्वतःला सावरतो. त्याच्या लक्षात येते की आपण बाजारात आहोत आणि मग तो वैदहिला सोडतो.
"काय झाले अभिमन्यू! मी इथेच आहे. मी फक्त गंमत करत होते." वैदही अभिमन्यूच्या गालावर हात ठेवून बोलते.
"वैदही एकदा माझ्या जवळच्या व्यक्तीला मी गमावले आहे. आता परत ते दुःख पचविण्याची ताकद माझ्यात नाहीये. तू जर माझ्या पासून लांब गेली तर मी मरून जाईल." अभिमन्यू असे बोलताच वैदही त्याच्या तोंडावर हात ठेवते.
अभिमन्यूच्या आवाजात एक भिती आणि डोळ्यात अश्रू होते.
अभिमन्यूच्या आवाजात एक भिती आणि डोळ्यात अश्रू होते.
"अभिमन्यू परत असे नाही बोलायचे. माझेच चुकले मी हलकीशी गंमत करायला गेले पण मला खरच वाटले नव्हते की त्याचा तुम्हांला एवढा त्रास होईल." वैदही बोलते. बोलताना तिच्याही डोळ्यात हलके अश्रू येतात.
"मला शब्द दे तू मला परत कधीच सोडून जाणार नाही." अभिमन्यू बोलतो.
"मी शब्द देते मी तुम्हाला परत कधीच सोडून जाणार नाही. आयुष्यभर तुमच्या सोबत राहील." वैदही बोलते.
नंतर दोघेही बाजारात फिरतात. दोघांनीही यावेळेस एकमेकांचा हात घट्ट पडलेला असतो. थोड बाजारात फिरल्यानंतर घरातल्यांसाठी थोडी खरेदीपण करतात. खरेदी झाल्यावर संध्याकाळ होत होती म्हणून दोघेही फार्महाऊसवर जाण्यासाठी निघतात....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा