दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026
"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ३९"
जोरदार पाऊस चालू असतो. अभिमन्यू आणि वैदही त्या पावसात चालत असतात. अभिमन्यूने वैदहीच्या खांद्यावर हात ठेवून तिला पकडलेले असते. दोघंही एकाच जॅकेट खाली असतात.
रस्त्याने चालत असतानाच पाऊस थांबतो. वैदही जराशी पावसावर नाराज होते. त्या पावसाने तिला आणि अभिमन्यूला थोडेसे जवळ आणलेले असते. वैदहीचा हा शतपावलीचा प्रवास आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास होता.
पाऊस थांबलेला असतो पण दोघेही खूप भिजलेले असतात. तितक्यात पाठीमागून टवाळखोर पोरांची गाडी येते. ती गाडी अभिमन्यू आणि वैदहीच्या जवळ येऊन थांबते. ती पोरं वैदहिला बघून तिची छेड काढायला लागतात.
"अरे किती भिजला आहे तुम्ही दोघे. चला आमच्या बरोबर गाडीत. पण गाडीत एकालाच जागा आहे. त्यामुळे ही ( वाईट इशारा वैदहिकडे करतो ) येऊ शकते. तू नाही." त्या पोरांमधला एकजण बोलतो.
"किती भिजली बघाना. कपडे तर बघे हिचे." दुसरा बोलतो.
"हे बघा... वैदही बोलायला लागते पण अभिमन्यू तिला थांबवतो आणि तिच्यावर जॅकेट टाकतो. पुढे येऊन त्या दोघांच्याही कानाखाली एक चपराक देतो. मग गाडीतले दोघेजण पण खाली उतरतात. त्या टवाळ पोरांमध्ये आणि अभिमन्यूमध्ये चांगलीच झटापट होते. थोडासा तणाव निर्माण होतो.
अभिमन्यू एकटा आणि ती चार पाच जण. वैदहिला थोडी भीती वाटत होती. पण अभिमन्यू त्यांच्यावर भारी पडत आहे हे बघितल्यावर तिच्या जीवात जीव आला.
अभिमन्यू त्यांना चांगलीच अद्दल घडवतो. ती पोरं पळ काढतात आणि जाता जाता अभिमन्यूला धमकी पण देतात, "तुला सोडणार नाही."
"अरे वा अभिमन्यू! तुम्ही तर खूप स्ट्राँग आहात. एकटेच चार पाच जणांना भारी पडला." वैदही बोलते.
"मग... मी कॉलेज मध्ये ब्लॅकबेल्ट होतो. जिल्हा पातळीवर खेळलो आहे मी." अभिमन्यू बोलतो.
"मला तर माझ्या मित्राचे हे गुणच माहीतचा नव्हते. आता मला काही टेन्शन नाही. मला काही कुठे अशी मारामारी करावी लागली तर मी लगेच तुम्हांला बोलवेल. तुम्ही यालना?" वैदही बोलते.
"तू फक्त आवाज देऊन बघ. तुझ्या एका हाकेवर कुठेपण येईल." अभिमन्यू बोलतो.
अभिमन्यू असे बोलताच वैदहीसाठी जग थांबल्यासारखे झाले होते. वैदही चालता चालता थांबून घेते आणि एकटक अभिमन्यूकडे बघू लागते.
"काय झाले? अशी का थांबली?" अभिमन्यू वैदहिला विचारतो.
"नाही, काही नाही." असे बोलून वैदही पुन्हा चालू लागते.
"अभिमन्यू तुम्ही या अगोदर कधी अशी शतपावली केली आहे का? त्यात पाऊस येणे, असे कुठेतरी झाडाखाली थांबणे, भिजणे असे घडले आहे का कधी?" वैदही विचारते.
"असे एकदम आजच्या सारखेच नाही पण अशी शतपावली बऱ्याचदा केली आहे. सई आणि मी नेहमी जायचो." अभिमन्यू बोलतो.
"असं आपल्या माणसांबरोबर शतपावली करायला खरच खूप भारी वाटतं होना अभिमन्यू." वैदही बोलते.
"हो! वैदही मी सईबद्दल बोलल्याने तुला वाईट तर नाही वाटत नाहीना?" अभिमन्यू बोलतो.
"नाही. मला का वाईट वाटेल. उलट मला आवडेल तुमचं आणि सईच नातं जाणून घ्यायला." वैदही बोलते.
अभिमन्यू आणि वैदहीच्या गप्पा खूपच रंगतात. बोलता बोलता कधी ते फार्महाऊस येऊन पोहचतात त्यांनाच कळत नाही. दोघेही खोलीत येतात.
"वैदही तू जा पहिले कपडे बदलून घे. आजारी पडशील नाही तर." अभिमन्यू बोलतो.
"तुम्ही गेला असता पहिले." वैदही बोलते.
"तुला सांगितले ना जा." असे बोलून अभिमन्यू वैदहीचा हात पकडून तिला बाथरूम मध्ये पाठवतो.
थोड्यावेळातच दोघेही फ्रेश झालेले असतात. कपडे बदलेले असतात. पावसात भिजलेल्याने दोघंही कुडकुडत होते.
"खाली गार्डनमध्ये जाऊन शेकोटी करायची का? चांगलाच गार लागतंय." अभिमन्यू बोलतो.
"चला" असे वैदहीने बोलल्यानंतर दोघेही गार्डनमध्ये येतात. गार्डनमध्ये शांतता होती. पावसाने भिजलेल्या मातीचा गंध दरवळत होता. अभिमन्यू शेकोटी पेटवली. आगीच्या ज्वाला हळूहळू वाढत होत्या. मग दोघेही शेक घेऊ लागतात.
"वैदही मी वहिनीला फोन करून त्यांचे आभार मानले पाहिजे." अभिमन्यू बोलतो.
"तुम्हांला वहिनींचे आभार मानायचे आहे, का?" वैदही बोलते.
"आपण वहिनीच्या वडलांच्या फार्महाऊसवर आहोत. जरी आईने आपल्याला इथे पाठवले असले तरी हा प्लॅन वहिनीचा आहे याची मला खात्री आहे. हा आता त्यांचा यामागचा उद्देश काहीही असो." अभिमन्यू बोलतो.
"कदाचित असेल वहिनींचा प्लॅन पण तुम्हाला त्यांचे आभार का मानायचे?" वैदही बोलते.
"वैदही मला खूप भारी वाटत आहे. मला नेहमी दडपण असल्यासारखे वाटायचे. एकटे असल्यासारखे वाटायचे, हरवल्यासारखे वाटायचे. त्यामुळे मी ड्रिंक करायचो. पण आज एकदम मोकळे, शांत वाटत आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदा मला ड्रिंक करूशी नाही वाटत." अभिमन्यू बोलतो.
"तुम्हांला छान वाटत आहे ना झालं तर मग." वैदही बोलते.
"हे फक्त तुझ्यामुळे वाटत आहे. पहिले तुझे आभार मानले पाहिजे." अभिमन्यू वैदहीचे हात हातात घेऊन बोलतो.
"मी तुम्हांला किती आधीपासूनच बोलत होते घराबाहेर पडा, चार माणसांत जा म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल. मी म्हणत नाही की तुम्ही पहिले सर्व विसरून जा. सई बरोबरचे तुमचे सर्व चांगले क्षण कायम स्मरणात ठेवा. पण मला सांगा तुम्ही जे आता वागताय हे सईला तरी आवडले का? ती कुठूनतरी तुम्हांला बघतच असेल ना! अभिमन्यू तुम्ही स्वतःसाठी जगा" वैदही अभिमन्यूला समजून सांगते.
"तुझं बरोबर आहे मी नक्कीच प्रयत्न करेल. स्वतःला बदलण्याचा." अभिमन्यू बोलतो.
अभिमन्यू असे बोलल्यावर दोघांच्याही चेहऱ्यावर हलकेसे हसू येते. आणि दोघेही शेक घेत गप्पा मारू लागतात...
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा