Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४९

राजकीय फायद्यासाठी झालेले लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४९"

अभिमन्यू आश्रमात फिरत होता. वैदही आणि सरस्वतीताई बोलत बसलेलेले असतात.

"वैदही एक काम होते तुझ्याकडे करशील का?" सरस्वतीताई बोलतात.

"ताई असे का विचारताय! सांगा काय काम आहे." वैदही बोलते.

"वैदही आपल्या आश्रमाच्या अनुदानासाठी मुंबईला जावे लागणार आहे. आणि मला काही शासकीय कामासाठी इथेच थांबावे लागणार आहे. जर तू स्वतः मुंबईला गेली तर बरे झाले असते." सरस्वतीताई बोलतात.

वैदही क्षणभर विचार करून बोलते, "ताई मला अभिमान्यूंना विचारावे लागेल." वैदही बोलते.

"नक्कीच विचार आणि वाटले तर तुम्ही दोघेही जा. काहीच अडचण नाहीये." सरस्वतीताई बोलतात.

वैदही आणि सरस्वतीताई बोलत असतात तेवढ्यात अभिमन्यू तिथे येतो.

"अभिमन्यू ताई मला काहीतरी सांगत होत्या?" वैदही बोलते.

"काय?" अभिमन्यू बोलतो.

"आश्रमाला अनुदान मिळणार आहे त्यासाठी मुंबईला जावे लागणार आहे. ताई मला बोलत होत्या जाती का. जाऊ का मी?" वैदही बोलते.

वैदही असे बोलताच अभिमन्यूचा चेहरा पडतो. त्याचे डोळे बारीक होतात.

"तुम्ही दोघे गेला तरी चालेल." सरस्वतीताई बोलतात.

"ठीक आहे. वैदही जा तू." अभिमन्यू बोलतो पण त्याचा आवाज बारीक झालेला असतो.

"अरे अभी तू पण जाकी वैदही बरोबर."सरस्वतीताई बोलतात.

"मला अजून थोडा वेळ पाहिजे. वैदही तिथे तिच्या कामात असेल माझ्यामुळे कामात गडबड नको व्हायला." अभिमन्यू बोलतो.

अजून थोडा वेळ अभिमन्यू आणि वैदही आश्रमात थांबतात. अनुदानासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्र वैदही सरस्वतीताईंकडून घेते आणि मग अभिमन्यू आणि वैदही घरी यायला निघतात.

अभिमन्यू आणि वैदही घरी आलेले असतात. आश्रमापासून घरी येण्यापर्यंत अभिमन्यू काहीच बोललेला नसतो. अभिमन्यू अचानक शांत झाला होता. त्याच्यातला हा बदल वैदहीने हेरला होता.

"अभिमन्यू काय झाले?" वैदही बोलते.

"कुठे काय. काही नाही झाले." अभिमन्यू दबक्या आवाजात बोलतो.

"अभिमन्यू मला कळत नाही का! जेव्हापासून ताईंनी मला मुंबईला जायला सांगितलं तेव्हापासून तुमचा चेहरा पडला आहे." वैदही बोलते.

अभिमन्यू काहीच बोलत नाही.

"मी नको जाऊका मुंबईला. तुम्हांला नसेल आवडत तर मी ताईंना सांगते. त्या दुसर कोणाला तरी पाठवतील. अजून बरेच जणं आहेत आश्रमात, जे हे काम करू शकतात." वैदही बोलते.

"जा तू. मी कुठे काय बोलतोय!" अभिमन्यू बोलतो.

"तुम्ही बोलत नसला तरी तुमचा चेहरा बरच काही बोलतोय. तुमचा चेहरा असा पडलेला असेल तर मी कशी मोकळ्या मनाने जाऊ तुम्हीच सांगा मला." वैदही बोलते.

अभिमन्यू वैदहीच्या मांडीवर डोके ठेवून झोपतो. त्याचे दोन्ही हातांनी वैदहीची कंबर घट्ट गुंडाळतो.

"अभिमन्यू काय होतंय?" वैदही अभिमन्यूच्या डोक्यावरून हात फिरवत फिरवत बोलते.

"माहीत नाही काय होतंय पण तू कायमच माझ्याजवळ रहावं असं वाटतंय." अभिमन्यू बोलतो.

"अभिमन्यू मी तुमच्याजवळच आहे. तुम्ही चला माझ्या बरोबर मुंबईला. नाहीतर मी ताईंना सांगते मी नाही जात मुंबईला. सांगू का ताईंना?" वैदही बोलते.

अभिमन्यू वैदहीच्या मांडीवरून उठून बोलतो, "ते आश्रमाचे काम महत्त्वाचे आहे त्यामुळे तूच जा. आणि माझी काळजी नको करू मी ठीक आहे." अभिमन्यू बोलतो.

"मी सांगून येऊ का आईंना, मी मुंबईला जात आहे." वैदही बोलते.

अभिमन्यू "हो" म्हटल्यावर वैदही देवकीकडे जाते.

"आई काय करताय? तुमच्याशी जरा बोलायचे होते." वैदही बोलते.

"अगं मग बोल काय बोलायचे आहे." देवकी बोलते.

"आई मी आश्रमाच्या कामासाठी मुंबईला जात आहे." वैदही बोलते.

"अभिच काय? तोपण येणार आहे का थांबणार आहे इथच?" देवकी बोलते.

"अभिमन्यू नाही येणार पण जेव्हापासून मी मुंबईला जाणार आहे हे ऐकले आहे तेव्हापासून त्यांचा चेहरा पूर्ण उतरला आहे." वैदही बोलते.

"अगं मग तुझं जाणं गरजेचं नसेल तर नको जाऊ आणि जायचच असेल तर अभिला पण बरोबर घेऊन जा." देवकी बोलते.

"आई काम तसं महत्वाचं आहेच पण मी बोलले अभिमन्यूंशी, त्यांना म्हटलं तुम्ही पण चला नाहीतर मी थांबते. पण ते बरोबर यायला पण नाही बोलताय आणि मला पण जायला हो बोलताय." वैदही बोलते.

"वैदही एक सांगू, मला वाटतंय अभी आता तुझ्यात गुंतत चालला आहे." देवकी बोलते.

वैदही क्षणभर शांत राहते.

"आई फक्त मी मुंबईत असताना अभिमन्यूंची नीट काळजी घ्या. त्यांना काय हवं, काय नको ते बघा." वैदही बोलते.

"मान्यय मला तुझा तुझ्या नवऱ्यावर खूप जीव आहे पण तो माझाही मुलगा आहे. घेईल काळजी तुझ्या नवऱ्याची नको काळजी करू." देवकी गमतीने बोलते.

वैदही मुंबईला निघण्याची तयारी करत होती. अभिमन्यू तिला मदत करत होता.

"अभिमन्यू मी जात आहे मुंबईला पण स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा. तुम्ही आत्ता आत्ता सावरायला लागला आहात. परत त्या अवस्थेत आपल्याला नाही जायचे." वैदही बोलते.

अभिमन्यू मान डोलावून हो बोलतो.

"काहीही वाटल तरी दारू प्यायची नाही. तुम्हांला जेव्हा माझ्याशी बोलू वाटेल तेव्हा मला लगेच कॉल करायचा." वैदही बोलते.

"तू जा बिनधास्त मुंबईला. मी दारू पिणार नाही आणि नाही स्वतःला त्रास करून घेईल." यावेळेस अभिमन्यू थोडं आत्मविश्वासाने आणि हसून बोलतो.

अभिमन्यूच्या चेहऱ्यावर हसू बघून वैदही त्याला मिठी मारते.
नंतर थोड्या वेळाने वैदहीची मुंबईला निघण्याची वेळ होते. वैदही गाडीत बसते आणि गाडी मुंबईच्या दिशेने निघते.

वैदही मुंबईला निघाली होती पण तिला एकच काळजी होती, "मी जवळ नसताना अभिमन्यू पुन्हा पहिल्यासारखे वागणार तर नाही. दारू तर परत पिणार नाही...."

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all