Login

अलक९(विचारांचे तरंग)

अलक
नंदादीपत्या तेजाने तिचा चेहरा उजळून निघाला होता. विठ्ठलाच्या सेवेत तिने तिचे जीवन समर्पित केले होते.
"तू कधीच लग्न करणार नाही का?" अचानक विचारलेल्या प्रश्नाने ती थोडीशी बावचळली.
"पण, मीच का? तुमच्या आयुष्यात अजून कोणीतरी चांगली मुलगी येईल."
"मुली भरपूर येतील. पण या दगडातल्या देवाला सुध्दा तू जितक्या निस्वार्थीपणे आपले मानले आहेस. तर मला ..."
तिने लगेच होकार दिला.
©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all