Login

चकाकाते ते सर्व सोने नसते ...भाग -६

About Dr.Rahul
सारंग, अरे ऐक तू हो पुढे आलोच मी मला जरा एका ठिकाणी जायचं रे . चालेल का?
अर्जुन बोलला.
"हो..हो चालेल , चल मी पण जातो.. सायंकाळी भेटू."
सारंग उत्तरला.
अर्जुनने सर्व काही आवरून लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये दाखल झाला. डॉ.सेन अजूनही थोडे विचलितच होते आणि डॉ. राहुलची तर काय खबरच नव्हती.
शेवटी न राहून अर्जुनने ठरवले की आता डॉ. राहुलला भेटून जाब विचारायचा की काय चालवले आहे डॉ. सेनवर एवढी बिकट परिस्थिती उद्भवली आणि तुमची काय मजा चालू आहे.
अर्जुन अखेरीस फार्महाऊस वर दाखल झाला.
पण तिथले दृश्य बघून तो थोडा विचलित झाला.जागोजागी तिथे वार्डबॉय होते. जागोजागी कॅमेरा बसवलेले होते.आणि कदाचित अर्धा हॉस्पिटल स्टाफ तिथे उपस्थित होता.
अर्जुन थोडा कोड्यात पडला की नक्की चालू काय आहे इथे?
अखेरीस तो डॉ.राहुलच्या कक्षाजवळ तो पोहोचला.
डॉ. राहुल बेड वर पडलेले होते. त्यांच्याभोवती एक नर्स बराच वेळापासून फटकत होती पण त्यांना सर्व काही पुरवत होती.
पाण्याचा ग्लास सुद्धा तीच देत होती.अर्जुनला काही कळेना कारण त्याच्या महितीमधला डॉ. राहुल खूप स्वतंत्र होता अगदी अर्जुनाच्या वडीलांसारखा.सर्व कामे स्वतः करने..कामात चपळता. अगदी स्वतंत्र.. कधीच कोणावर अवलंबून पण राहणे त्यांना आवडत नसे.पण हे दृष्य त्याच्या समजे पलीकडचे होते.अखेरीस सर्व बाजूला सारून अर्जुन एकदम कक्षात घुसला आणि अगदी वेळेचा विलंब न करता बोलला..
" डॉ. राहुल, काय चालवले आहे तुम्ही? तुमचे वडील कसे तरी स्वतः ला सांभाळत आहे आणि तुम्ही इथे राजासारखे थाटात बसले आहे.उठा आता खूप झाले. डॉ. राहुल.. उठा डॉ.सेन आणि शताब्दीला तुमची गरज आहे..आणि तुम्हाला ठाऊक आहे का डॉ. अग्निहोत्री अपघातामध्ये गेले..सर्व काही डॉ.सेनला एकट बघावा लागत आहे..उठा बघू!
अर्जुन चिडून बोलला.
पण डॉ. राहुल हू नाही का चू नाही एकदम शांत फक्त बघत होते..जणू त्याना ऐकूच गेले नाही..
एवढ्यात मागून डॉ.आले आणि अर्जूनवर ओरडू लागले.
"एक मिनिट.. कोण आहात तुम्ही आणि असे कसे बोलू शकता एका अपंग व्यक्तीला काही कसे कळत नाही लोकांना ? पण तुम्हाला आत कोणी येऊ दिले जा बरे इथून आराम करायचा माझ्या पेशंटला .
अपंग! काय बोलता तुम्ही डॉ.
डॉ. मी डॉ.अर्जुन आहे मी शताब्दी मध्ये डॉ.सेन सोबत आणि डॉ. राहुल सोबत असतो आणि मी जसा वागलो त्यांबदल मी माफी मागतो पण डॉ.राहुल अपंग नाही.!
अर्जुन. थोडा विचलित होऊन बोलला.
"अच्छा,मला माफ करा मला माहित नव्हते".या बाहेर या आपण बोलू. डॉ. उत्तरले.
डॉ.अर्जुन मला तुम्हाला जे सांगायचे आहे ते ऐकल्यावर कदाचित तुम्हाला विश्वास नाही बसणार आणि तुम्हाला खूप धक्का सुद्धा बसेल पण तरीही हे जाणून घेणे तुमचे कर्तव्य आहे. डॉ.अर्जुन तुम्ही बंगलोर कडे गेले आणि त्यानंतर जवळजवळ दोन आठवड्यांत डॉ. राहुलचे पाय गुडघ्यापासून खाली खूप दुखायला लागले.सुरवातीला त्यांनी खूप दुर्लक्ष केले पण नंतर त्रास अधिकच वाढला आणि नंतर त्यांना डॉ. सेनने काही औषधे दिली ज्यामुळे हा त्रास अधिकच विचित्र झाला म्हणजे कळले नाही अजुन पण सुरवातीला पाय दुखत होते नंतर एकदम त्याची दुखापत बंद झाली पण त्याबरोबर एक खूप गंभीर परिस्थिती समोर आली आणि ती म्हणजे
त्यांचे पाय निकामी झाले आहेत.ते पुन्हा कधीच चालू
नाही शकत!
काय? काय? डॉ.काय बोलता तुम्ही? असे कसे होऊ शकते ? अर्जुन खूपच विचलित होऊन उत्तरला.
"हो..ते पूर्णतः आता कायमचे स्तब्ध झाले आहे .. अर्धांगवायूचा झटका त्यांना उद्भवला आहे.ते परत कधीच नेहमीसारखे नाही चालू शकत. "चल मला निघावे लागेल काळजी घे.
एवढे बोलून डॉ.निघून गेले.
इकडे अर्जुन मात्र विचांमध्ये गुंग झाला त्याला काहीही समझेना त्याची मनस्थिती पूर्णतः कुणीतरी हालवून टाकली होती.
एवढ्यात सारंगच फोन आला आणि अर्जुन तिथून लवकरात लवकर घरी पोहचला.
अर्जुन पूर्ण वेळ डॉ.राहुलचा विचार करत होता त्याला समजत नव्हते की नक्की असे झाले तरी काय की एवढं समजण्यापलीकडे आहे सर्व, अशातच तो घरी पोहचला.पण आज घरचे दृश्य बघून तो अजूनच चकित झाला.
आई आज अत्यंत खुश होती ती आई जी कधी हसत नसे ती आज इतकी खुश होती की तिने सर्व घरातल्यांचे आवडीचे जेवण बनवले होते...
आई,काय झाल आहे आज तू एवढी आनंदी कशी आणि हे काय सर्वांच्या आवडीचे बाबांच्या सुद्धा आवडीचे!
अर्जुन चकित होऊन बोलला.
"अर्जुन ,अरे तू विश्वास नाही ठेवणार
तुझे बाबा त्यांनी पहिल्यांदा १० वर्षात मला हाक मारली रे! अरे तुझे बाबा बरे होता आहेत अर्जुन .तुला सांगते माझा विश्वास आहे आता सर्व नीट होईल."
काय??? आई खरंच . आई थांब बघू मला बाबांना बघू दे आई थांब मी पटकन देवाला प्रसाद दाखवून येतो बर का आई ...असे बोलत अर्जुन घराबाहेर पडणार तेवढ्यात त्याला आठवले की किती हा विरोधाभास आहे एका बाजूला आमच्या घरावरची संकटे दूर आहेत तर दुसरीकडे जणू संकटांचा वर्षाव होत आहे.. मनोमनी थोडा दुःखी होऊन अर्जुन परत घरात आला पण त्याला एवढ्या वर्षांनी बोलकी झालेली त्याची आई आणि बरे होणारे बाबा बघून त्याला त्यांचा आनंद हिरावून घ्याचा नव्हता.
म्हणून अर्जुन चेहऱ्यावर एक मोठे हसू पसरवून बाबांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेला.
क्रमशः
0

🎭 Series Post

View all