Login

चकाकते ते सर्व सोने नसते...भाग -७

About Dr.Sen


"बाबा.. बाबा..मी सारंग कसे तुम्ही ? बाबा तुम्हाला माहित मी डॉ. झालो आता आणि तुमच्या आणि दादाच्या पावलावर पाऊल ठेवत मी सुद्धा आता शताब्दी मध्ये रुजू झालो आहे" .
अर्जुन डोळ्यातले अश्रू पुसत बोलला आणि अगदी पटकन त्याने क्षणाचाही विलंब न करता बाबांना मिठी मारली.
दुरून हे सर्व दृश्य बघणारी अर्जुनची आई सुद्धा मनोमनी खूप खुश होती.
शेवटी कित्येक वर्षांनंतर ती हे दृश्य बघत होती . इतक्यात सारंग तिथे आला पण अर्जुन आणि त्याच्या वडिलांचा एवढ्या वर्षांचा विरह त्याला तुटताना दिसत होता आणि म्हणून त्याने त्याला बोलवून सर्व विस्कळीत करण्याचा प्रयत्न नाही केला आणि निघून गेला.
थोड्यावेळात बाबांना झोपी लावून अर्जुन बाहेर आला आणि फोन बघतो तर डॉ.सेन आणि इन्स्पेक्टर मिरा राजपूत यांचा फोन आलेला होता .
अर्जुन आईला कळवून लगेच शताब्दीकडे निघाला.
"डॉ.अर्जुन मला काही बोलायचे आहे तुमच्यासोबत मी केबिन मध्ये बसली आहे तुमचे पेशंट झाले की या लवकर"
इन्स्पेक्टर मिरा उत्तरल्या.
बराच वेळा नंतर सर्व लवकरात लवकर संपवून अर्जुन केबिन मध्ये गेला .
डॉ.अर्जुन मला जरा तुमच्याविषयी जाणून घ्यायचे होते म्हणजे तुमच्या घरी कोण असते आई वडील..भाऊ काय करता ?कुठे असता ? काय करता? कधी पर्यंत होते इथे आणि कधी वारले.
"एक मिनिट इस्पेक्टर.".अर्जुन मध्येच त्यांना थांबवून थोडा रागातच बोलला .
"माझे वडील आहेत अजून घरी असता ."
"काय? पण मला असे कळले की तुमचे वडील एका अपघातामध्ये गेले.मला माफ करा पण मला हॉस्पिटल मधून असेच कळले आहे ." इन्स्पेक्टर उत्तरल्या.
इन्स्पेक्टर.. माझ्या घरी आई बाबा आणि माझा भाऊ राहतो . आई गृहिणी आहे आणि बाबांचा एक अपघात झाला होता तेव्हा त्यांना खूप दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर उपचार पण झाले पण दुखापत गंभीर होती आणि त्यामुळे वेळेवर योग्य उपचार मिळाले नाही आणि ते कोमात गेले त्यानंतर पण उपचार चालू होते पण मागील १० वर्षांपासून ते फक्त एका बेड वर पडलेले असता कारण त्यांचे शरीर त्या अपघातात निकामी झाले आणि त्यांच्या सेवेत माझ्या आईने तिचे आयुष्य घालवून दिले मी बिना त्यांच्या प्रेमाचा वाढलो आहे पण देवाला आमची काळजी आहे आणि शेवटी एवढ्या वर्षानंतर काल अखेरीस त्यांनी प्रतिसाद दिला.
मला एक भाऊ पण होता पण एक अपघातात त्याचा मृत्यू झाला तो सुद्धा डॉ.होता याच हॉस्पिटल मध्ये आणि बाबा सुद्धा इथेच डॉ. होते पण डॉ.सेन माझ्या वडिलांना खूप मानायचे म्हणून त्यांनी सांगितल्यावरच मी इथे रुजू झालो आहे आणि हो बाबा विषयी इथे कुणाला जास्त माहीत नाही कारण आईने माझ्याकडून वचन घेतले होते की तू तुझ्या कर्तुत्वावर तिथे जायचे बाबांची किंवा भावाची शिफारस म्हणून नाही कारण तिला हा पेशा नाही आवडत त्यामुळे ती माझ्या डॉ.होण्याच्या सुद्धा विरोधात होती .
अर्जुनचे संभाषण ऐकून मिराच्या डोळ्यात पाणी आले पण त्याला न कळू देता तिने पटकन डॉ. अर्जुनची रजा घेतली.
इन्स्पेक्टर मिरा गेल्यानंतर अर्जुन सुद्धा डॉ.सेनला भेटायला त्यांच्या खोलीत गेला पण आज डॉ.सेन आलेलेच नव्हते.
हॉस्पिटल मध्ये विचारपूस केल्यानंतर त्याला कळले की आज डॉ.रजेवर आहे .
सर्व कामकाज आवरून अर्जुन डॉ.सेनला भेटायला त्यांच्या घरी निघाला.
घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीना बघून अर्जुनला अजूनच वाईट वाटले..त्यांच्या पत्नी सर्वात हसतमुख व्यक्ती होत्या पण आज त्या त्यांच्या खोलीत दडून बसलेल्या होत्या आणि फक्त डॉ.राहुलचे फोटो छातीला लावून बसल्या होत्या .
अर्जुन घाईतच डॉ.सेनच्या खोलीत गेला पण तिथले दृश्य बघून त्याच्या डोळ्यात पाणी आले.
डॉ.सेन अगदी लहान मुलासारखे डॉ.राहुलचे लहानपणी पासूनचे सर्व सामान काढून बसले होते आणि एकटेच बडबडत होते.
अर्जुन त्यांना सावरण्यासाठी त्यांच्या जवळ गेला आणि डॉ.सेन एकदम बोलायला लागले..
"अरे, राहुल आलास तू हे बघ तुझ्या आवडीच सर्व सामान आणले आहे बघ बर तुला काय हवे, आणि हे बघ तुला ते मॅजिक शूज हवे होते ना त्यात जोरात धावता येत ते पण आहे आणि हे बघ तुला डॉ. सेट पण आणला आहे तुला डॉ. व्ह्याच ना हे बघ अजून तुझ्या साठी सायकल पण आणली बर का खाली आहे आणि राहुल अजून काय हवं सांग बघू मी लगेच आणतो . "
डॉ. सेन थांबायचं नावच घेत नव्हते.जणू मुलाच्या अपंगत्वाचा त्यांना खूपच मोठा धक्का बसला होता.
कसातरी त्यांना सावरत त्यांना झोपवून अर्जुन तिथून चालता झाला.
बाहेर आल्यावर अर्जुन खूप विचारात पडला की ज्या व्यक्तीला तो एक आदर्श मानायचा तो व्यक्ती आज त्याच्या समोर आल्यावर त्याच्यामध्ये आणि त्यांच्यामुलामध्ये फरक नाही करू शकत.आज त्या व्यक्तीची हालत बघून अर्जुनचे अश्रूच लपत नव्हते.
पण स्वतः ला सावरत अर्जुन तिथून थेट हॉस्पिटल कडे निघाला आणि तिथे जाऊन त्याने तिथल्या इतर डॉ.सोबत बोलणी करून हे कळवून दिले की डॉ. सेनची तब्येत खूपच खालावली आहे त्यामुळे ते हॉस्पिटल मध्ये नाही येऊ शकत.
पण आता सर्व कारभार कोण सांभाळणार हा प्रश्न पुढे आला कारण अर्जुन बंगलोरकडे बघायचे,पण आता तिकडे पण जाऊ शकत नव्हते.
एवढ्यात दुरून हे सर्व बघणाऱ्या इन्स्पेक्टर मिरा राजपूत बोलल्या..
"डॉ.अर्जुन तुम्हाला हरकत नसेल तर शताब्दीची जबाबदारी तुम्ही घेणार का?"
त्यांचा प्रश्न ऐकून अर्जुन थोडा थबकलाच कारण शताब्दीची जबाबदारी थोडा अवघड काम होतं.
"मला विचार करायला वेळ हवा आहे मी उद्या कळवतो आता मला घरी जायचे आहे " एवढे बोलून अर्जुन निघून गेला.
क्रमशः
0

🎭 Series Post

View all