"शताब्दी.."
"अर्जुनच्या आदर्शातले एक हॉस्पिटल.."
"एक वेळ होती जेव्हा अर्जुन दुरून त्या हॉस्पिटलला बघून म्हणत असे की बस या हॉस्पिटल मध्ये दाखल व्हायचे.."
आणि आज त्याची पूर्ण जबाबदारी निभवण्याची संधी त्याच्या समोर होती..
मन खूप कासावीस झाले होते कितीही नाही म्हंटले तरी हॉस्पिटल आहे आणि पूर्ण जबाबदारी घेणं म्हणजे थोडा जोखमीचे काम .
पण तरी पूर्ण विचार करून ..
घरच्यांसोबत विचारविनिमय करून त्याने होकार कळवला..
सर्व काही छान चालू होते...
आता सर्व काही सुरळीत चालू होते ...
मध्ये मध्ये डॉ.सेन आणि राहुलला सुद्धा ते भेट देत..
आणि एक दिवस अर्जुन " प्रतिबंधित" क्षेत्रासमोर येऊन उभा राहिला जणू त्याला ते क्षेत्र काही सांगत होते...
"हे काय आहे ? हॉस्पिटलचा हा भाग तरी कधी पहिलाच नाही? "
आणि" इथे येण्यासाठी एवढी सुरक्षितता का आहे?
काय आहे या खोलीत?"
आणि एवढ्यात तिथे वस्तू चाचपडत असताना त्याला एक वस्तू सापडली...
"पेनड्राइव्ह"..
उत्कसुक्तेपोटी अर्जुनने पटकन तो "पेनड्राइव्ह" तिथे असलेल्या कॉम्प्युटरला जोडला ..
आणि त्यातले दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली...तो थोडा शॉक झाला..
कारण त्या पेनड्राईव मध्ये एक व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ त्याच्या वडिलांचा होता..
" हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकच या हॉस्पिटलची काळी कर्तूते.."
"या हॉस्पिटल ने माझा मोठा मुलगा हिरावून घेतला ..
आणि लवकरच मला सुद्धा हे मारून टाकतील तरी एक पुरावा म्हणून मी हे सर्व रेकॉर्ड करत आहे ..आणि आमची ही स्थिती करण्यास फक्त या हॉस्पिटलचे नामवंत डॉ.जबाबदार आहे.."
"डॉ. राहुल, डॉ अग्निहोत्री, डॉ. सेन.."
"माझ्या मुलाने या हॉस्पिटलला सर्व काही दिले पण या हॉस्पिटलने त्याच व्यक्तीचे सर्व काही हिरावून घेतले...."वरतून त्याच्या अवयवांची तस्करी सुद्धा केली... आजही माझ्या मुलाची बॉडी त्यांनी याच खोलीत दडवून ठेवली पण आम्हला असे कळवून की तो अपघातात निघून गेला..
"मला नाही माहित पण या हॉस्पिटल मध्ये बेकायदेशीर काम सुद्धा होतात.."
"मी अजून किती वेळ बोलू शकेल माहित नाही पण हा पुरावा सोडून जात आहे.."
आणि एवढे बोलून व्हिडिओ संपला..
अर्जुनची तळपायाची आग मस्तकला लागली त्याचा संताप अनावर झाला होता त्याने पूर्ण खोली शोधली अखेरीस
त्याला त्याच्या भावाची बॉडी सापडली..
त्याला बघून तो क्षणात नाबोलता झाला आणि डोळ्यात अश्रू घेऊन तो त्याला बघू लागला... मनी निश्चय केला या सर्वांना शिक्षा द्याची..
एवढ्यात ...
"डॉ.अर्जुन डॉ.सेनला भेटायला कोणी आले आहे" .
वॉर्ड बॉय उत्तरला.
हो आलोच ..म्हणत.
अर्जुन या जुन्या सर्व विचारांमधुन बाहेर पडला त्या क्षेत्रापासून थेट निघाला.. आणि मुख्य खोलीत दाखल झाला.
डॉ. सेनचे खूप जवळचे नातेवाईक मुळात त्यांचे डॉ. ..
डॉ. राघव देशमुख त्यांना भेटायला आले होते..
"हॅलो, डॉ. देशमुख..कसे आहात ?"
अर्जुन उत्तरला.
"मी अगदी ठणठणीत तुम्ही कसे आहात ? आणि डॉ.सेन कुठे आहेत त्यांना भेटाव म्हणून आलो."
"डॉ. देशमुख तुम्हाला सांगताना खूप दुःख होतं आहे पण पूर्ण घरण्यवर जणू कर्माची फळे भोगण्याची वेळ आली आहे."
"डॉ.राहुल यांना अपंगत्व आले आहे.."
"डॉ .अग्निहोत्री यांचा एक अपघात झाला आहे..".
आणि सेन थोडे मुलाच्या या स्थिती मुळे खालावले आहे..
काय? एवढं सगळं घडून गेल...खूपच वाईट झाले.
"मी आताच जातो त्यांना भेटून येतो .."
एवढ्यात टेलिफोन वाजला..त्यावर डॉ.सेनच्या पत्नीचा आवाज होता...
"डॉ.अर्जुन डॉ. सेनची तबियेत खूप खालावते आहे तुम्हाला जमत असेल तर लवकर इथे या ..
त्या अतिशय घाबरल्या होत्या ..
दोघेही घाईने तिकडे निघाले..
काही वेळानंतर डॉ. सेनला दाखल करून त्याच्या टेस्ट करून लक्षात आले की .."
त्यांना डायबेटिक आहे आणि काही दिवसांपासून या सर्व घटनांमुळे त्यांचे डोसेस काही वेळेवर झाले नाही आणि त्याचा परिणाम ते कोमात गेले...
"सर्व काही हातातून निसटून गेले होते..काहीच नव्हते उरले.."
डॉ. सेनच्या पत्नी स्वतः शीच बडबडत होत्या..
"तरी मी बोली होती एवढे वाईट काम करू नका सर्व काही एक दिवस सुत समेत परत करावा लागेल पण नाही माझा कुणीच नाही ऐकल..."
आणि त्यांचे हे बोल काही प्रमाणात इन्स्पेक्टर मिराने ऐकले.
त्यांना काही कळेना म्हणून त्या पूर्ण नीट विचारू लागल्या पण डॉ. सेनच्या पत्नी अगदी शांत झाल्या..
आता मात्र मीराला काही कळेना गोष्टी खूप नैसर्गिक होत्या पण तितक्याच जटिल सुद्धा...
आणि अशातच तिने डॉ. देशमुखची भेट घेतली आणि या हॉस्पिटलविषयी विचारपूस करू लागली..
त्यातून तिला एवढे कळले की ..
अर्जुनचे वडील आणि त्याचा भाऊ या हॉस्पिटल मध्ये खूप कमी वेळात खूप रुजले होते परंतु ते अगदी गायबच झाले होते..जे परत कधीच नाही सापडले...
अर्जुनचे वडील जिवंत आहे पण ही बातमी मात्र इथे कोणालाही माहीत नाही...
काही तरी गुपित आहे !
स्वतः शी पुटपुटत मिरा चालत्या झाल्या..
यानंतर सर्व लोक त्यांच्या घरी गेल्यानंतर अर्जुन डॉ. सेनच्या खोलीत आला ..त्यांच्याकडे बघून तो त्यांच्या परिस्थितीवर हसत होता आणि " कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात"
असे बोलून तो सुद्धा निघून गेला .
क्रमशः
( अजून किती गोष्टी पुढे येणार बघू पुढच्या भागात)
आणि भाग जरा उशिरा पोस्ट करत आहे माफी असावी पण वाचक वाचणार हीच अपेक्षा .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा