इथून पुढे आईची नीट काळजी घ्यायची आणि आपली चिडचिड कमी करायची. नाहीतरी दोघींना एकमेकांशिवाय आहे तरी कोण? आज अर्ध्या वेळाची सुट्टी मिळाली तर बंगल्यावर जाऊन यायचं. त्यासाठी थोडी दगदग झाली तरी चालेल. असं ठरवून युगा ऑफिसमध्ये शिरली. पण आज बॉसचा नूर काही वेगळाच दिसत होता. विराजच्या चेहऱ्यावरून त्याने बोलणी खाल्ली असावीत असं दिसत होतं. तो शांत होता. नेहमीप्रमाणे त्याने युगाला गुड मॉर्निंग म्हटलं नाही की तिच्याकडे नजर वर करूनही पाहिलं नाही.
"काय झालंय?" युगा आपल्या मैत्रिणीला म्हणाली.
"आजच्या सगळ्या मीटिंग्ज बॉस स्वतः करणार आहेत. विराजने काहीतरी घोळ घालून ठेवला आहे म्हणे."
इतक्यात युगाला बॉसचं बोलावणं आलं आणि मैत्रीण गालातल्या गालात हसत आपल्या कलिगच्या शेजारी जाऊन बसली. "आता विराज सरांनी घोळ घातला म्हणजे युगा मॅमलाही शिव्या बसणारच." दोघी एकमेकींना टाळ्या देत हसल्या.
पण काही वेळातच युगा हसत बॉसच्या केबिनमधून बाहेर पडली आणि सगळे अवाक् झाले.
पण काही वेळातच युगा हसत बॉसच्या केबिनमधून बाहेर पडली आणि सगळे अवाक् झाले.
"विराज, आजच्या सगळ्या मीटिंग्ज तू करतोयस."
"काय? तू बॉसना काय सांगितलंस? एकतर लवकर आलो, कामाला सुरुवात केली आणि वर खूप बोलणी खाल्ली मी. थॅन्क्स..तुला माहिती आहे ना, कामाच्या बाबतीत आपण किती तत्पर आहोत ते." विराजने युगाला हलकेच मिठी मारली. "आईसाहेबांची तब्येत काय म्हणते आता? बरी आहे ना? त्यांना आणायची सोय करायची आहे का?" विराज एकसारखा बोलत होता.
"मी बॉसना म्हणाले, माझ्या आईची तब्येत बिघडली आहे. मला हाफ डे हवा आहे."
"बस् इतकंच?"
"हो. मग त्यांनी सांगितलं आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट तू आणि विराज दोघे हॅण्डल करणार आहात. सुट्टी वगैरे अजिबात मिळणार नाही. जा दोघे कामाला लागा." युगा हसत म्हणाली.
"सर भयानक चिडले होते आणि मला हसू येत होतं. पण मला खरंच सुट्टी हवी होती रे. आज पहिल्यांदाच आईची इतकी काळजी वाटली मला." बोलताना तिचा चेहरा पडला.
"सर भयानक चिडले होते आणि मला हसू येत होतं. पण मला खरंच सुट्टी हवी होती रे. आज पहिल्यांदाच आईची इतकी काळजी वाटली मला." बोलताना तिचा चेहरा पडला.
"अगं, या वयात काहीतरी व्हायचंच. डोक्यात अनेक विचार असतात, टेन्शन्स असतात. शरीर थकत चाललेलं असतं. तू नको टेन्शन घेऊ. संध्याकाळी मी स्वतः आईसाहेबांना फोन करेन. मग झालं तर!" विराज नेहमीच्या मूडमध्ये आला.
"जसं काय तुझा आवाज ऐकून ती बरी होणार आहे." विराजच्या बोलण्याने कुठेतरी युगाची काळजी कमी झाली होती. राणीला फोन करून ती वेगळ्याच उत्साहाने कामाला लागली.
श्रीधर घरातून निघून गेले आणि युगाच्या मनावरचं दडपण कमी झालं. सतत भीतीच्या छायेखाली वावरताना तिला एक बाप म्हणून त्यांची कधीही ओढ वाटली नाही. आपल्या मित्र - मैत्रिणींचे वडीलही घरी असेच वागत असतील अशी तिची समजूत झाली होती.
जशी ती इतरांच्या घरात डोकावायला लागली तशी तिची समजूत मागे पडली. सगळ्यांचे आई -वडील प्रेमाने, मायेने आपल्या मुलांशी बोलतात, जपतात. एकमेकांशी आदराने वागतात. हे पाहून आपलं कुटुंबही असंच असायला हवं असं युगाला वाटायला लागलं. श्रीधरचं वागणं पाहून तिच्या मनात पक्कं बसलं, सगळे पुरुष असेच असतात.

पण विराज आयुष्यात आला आणि युगाचं आयुष्य काहीसं बदललं. नकळत ती मोकळेपणाने वागू लागली. भूतकाळाला चिकटून राहण्याऐवजी वर्तमानकाळात रमायला लागली. तोवर भूतकाळाची सावली फिकट झाली असली तरी अधून - मधून त्याचे पडसाद उमटत होते.
रात्री उशीरा रघूचा फोन आला. आईसाहेबांची तब्येत बरी होती. तरीही कधी एकदा आईला पाहते, असं युगाला झालं होतं. विराजने म्हंटल्याप्रमाणे आईसाहेबांना फोन केला. त्यांना बरं वाटेल अशा काहीतरी गमती -जमती सांगून हसवलं आणि शुक्रवारी रात्री भेटण्याचं वचनही दिलं.
"राणी, विराज तुला कसा वाटतो?" आईसाहेब बाल्कनीत खुर्ची टाकून बसल्या होत्या.
"स्वभावाने फार चांगले आहेत ते. शिवाय स्थळ म्हणूनही उत्तम आहेत. दिसायला देखणे आहेत. आपल्या ताईंना एकदम शोभतील असेच आहेत." राणी स्वभावाप्रमाणे बोलून गेली. तशी रघूने तिला गप्प राहायची खूण केली.
"बोलू दे रे तिला. तुम्ही दोघे काय मला परके आहात का? जशी युगा, तसेच तुम्ही. मला युगासाठी विराज योग्य वाटतो आणि कदाचित त्याचाही जीव तिच्यावर जडला असावा अशी शंका येते मला."
"आईसाहेब, एक बोलू? पण मी हे तुम्हाला सांगितलंय याची खबर ताईंना अजिबात लागता कामा नये." राणी त्यांच्या अंगावर शाल पांघरत म्हणाली. रघू अजूनही तिला शांत राहण्याची खूण करत होता. पण तिकडे दुर्लक्ष करत राणी आईसाहेबांच्या पुढ्यात येऊन बसली.
"आधी वचन द्या. मगच सांगेन मी. नाहीतर ताई माझा जीव खाऊन टाकतील." तिने हात पुढे केला.
"आधी वचन द्या. मगच सांगेन मी. नाहीतर ताई माझा जीव खाऊन टाकतील." तिने हात पुढे केला.
"अग, मी युगाला काही सांगणार नाही. माझ्यावर विश्वास नाहीय का तुझा?" आईसाहेब जरा रागावून म्हणाल्या. तशी राणी वरमली.
"ते..विराज साहेबांनी आपल्या ताईंना लग्नासाठी बऱ्याचदा विचारलंय. पण ताई दरवेळी नकार देतात. तुम्हा दोघींत वाद नकोत म्हणून मी काही बोलले नाही आणि आम्ही पडलो नोकर माणसं! मग मालकांच्या गोष्टींत आम्ही कसे पडणार?"
हे ऐकून आईसाहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काही क्षण त्या शांत बसल्या पण पट्कन म्हणाल्या, "राणी, हे आधी का सांगितलं नाहीस?"
हे ऐकून आईसाहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काही क्षण त्या शांत बसल्या पण पट्कन म्हणाल्या, "राणी, हे आधी का सांगितलं नाहीस?"
"अहो, ताईंच्या मनात तसलं काही नाही म्हणून मी बोलले नाही. नाहीतर त्यांनी साहेबांना नकार का दिला असता?"
"युगाला काय कळतंय? फक्त लग्न करायचं नाही या एकाच मुद्द्यावर ती ठाम आहे. का? तर म्हणे, तिचे वडील आणि माझे संबंध चांगले नव्हते म्हणून. पण सगळेच पुरुष तसे नसतात हे तिला समजून सांगायला मीच कमी पडते.
आजवर आम्ही दोघी एकमेकींच्या सोबतीने राहिलो, उद्या कदाचित मी एकटी पडेन म्हणून युगा लग्नाचा विचार टाळत असावी. पण तुम्ही दोघे आहात ना आणि यापेक्षा तुम्हाला चांगली नोकरी मिळाली तर बिनधास्त जा. मी काही म्हणणार नाही.
शेवटी आपण जन्माला येताना एकटेच असतो अन् जाताना एकटेच जातो."
आईसाहेबांच्या डोळ्यांत पाणी आलेलं पाहून राणी त्यांचा हात धरत म्हणाली, "जशा ताई तसे आम्ही असं आत्ताच म्हणालात ना? मग आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही."
हे ऐकून आईसाहेबांनी आपले डोळे पुसले आणि राणीचा हात घट्ट पकडला.

"ते नव्हे, 'मधुरिमा ' तुमचं नाव इतकं छान असताना आईसाहेब का म्हणतात तुम्हाला?" राणी कुतूहलाने म्हणाली.
"ते तुझ्या नवऱ्यालाच विचार." असं म्हणत हसून आईसाहेबांनी तिच्या हातावर प्रेमाने चापट मारली.
"आधी आईसाहेब खूप सुंदर दिसायच्या. मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला आमच्या नसलेल्या आईची आठवण झाली. मी इथं आलो तेव्हा बराच लहान होतो. मग यांना आई कसं म्हणायचं? तेव्हा आईसाहेब असं सहज तोंडून निघून गेलं. मग सगळेच त्या नावाने हाक मारायला लागले." रघू म्हणाला.
"श्रीधर निघून गेले आणि त्यांच्या आई - वडिलांनी याचा दोष माझ्या माथी मारला. संसार टिकवायला तूच कमी पडलीस म्हणून त्यांनी माझ्याशी सगळे संबंध तोडून टाकले. पण आपला मुलगा चुकला हे शेवटपर्यंत त्यांनी मान्य केलं नाही. तेव्हा लहान असूनही या रघूने मला साथ दिली. सतत तो सावलीसारखा आम्हा दोघींच्या सोबत राहिला."
रघू आणि आईसाहेब जुन्या आठवणींत रमून गेले आणि राणी त्यांचं बोलणं ऐकत राहिली.
रघू आणि आईसाहेब जुन्या आठवणींत रमून गेले आणि राणी त्यांचं बोलणं ऐकत राहिली.
क्रमशः