विराज आला आणि घर भरून गेलं. शुक्रवारच्या रात्रीची जेवणं हसत -खेळत पार पडली. आईसाहेब विराजशी भरभरून बोलत होत्या आणि युगा त्यांची अशक्त झालेली देहयष्टी निरखत त्यांचं बोलणं ऐकत होती. गेल्या आठ दिवसांत आईसाहेबांची तब्येत बरीच खराब झाली होती. डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसत होती. अंगकाठी बारीक झाली होती. गाल आत गेले होते. नाकाचा शेंडा उठून दिसत होता.
"आईसाहेब इतकी काळजी करू नका." विराज म्हणाला. "शहरापेक्षा इथलं वातावरण चांगलं मोकळं आहे. आजूबाजूला फारशी लोकं नाहीत की घाई, गडबड नाही. सगळं कसं निवांत..नाहीतर तिकडे घड्याळाच्या काट्यावर पळावं लागतं. सकाळी लवकर उठून कामाला जा, तिथं मनाविरुध्द राबा. रात्री उशीरा घरी या. स्वतः साठी म्हणून काहीही करायला मिळत नाही."
"विराज, असा निवांतपणा आयुष्याच्या शेवटी मिळत असतो. जेव्हा गरज असते तेव्हा असा वेळ कधी मिळत नाही. तरुणपण फक्त कष्ट करण्याकरिता, सोसण्याकरिता असतं आणि आईची काळजी वेगळीच असते रे. ती तुम्हा मुलांना कशी कळणार? आता युगाचं लग्न चांगल्या घरात व्हावं ही एकच इच्छा आहे."
"आई, सुरू झालं का परत?" युगा वैतागून म्हणाली.
"मी आहे ना, तुम्ही का काळजी करता?" विराज मध्येच म्हणाला. या वाक्यासरशी आईसाहेब त्याच्याकडे निरखून बघत राहिल्या. युगा उठून स्वयंपाक घरात निघून गेली.
"थोडं बोलायचं होतं. तो हळूच म्हणाला."
"थोडं बोलायचं होतं. तो हळूच म्हणाला."
"मला अंदाज होताच. पण युगा झोपायला गेली की बोलू." आईसाहेब दारात खुर्ची टाकून बसल्या. विराज तिथेच मोबाईल घेऊन फेऱ्या मारू लागला.
"झोपायचं नाहीय का तुम्हाला?" युगा हाक मारत म्हणाली.
"माझी वेळ झाली की मी झोपेन. तू दमली असशील. झोप जा." आईसाहेब.
"आणि मी थोड्या वेळाने झोपतो." विराज आईशी फोनवर बोलत होता.
युगा आत गेल्याची खात्री झाल्यावर विराज आईसाहेबांपाशी आला. विषय कसा काढायचा हेच त्याला कळत नव्हतं. शब्दांची जुळवाजुळव करत तो बराच वेळ तसाच बसून राहिला.
युगा आत गेल्याची खात्री झाल्यावर विराज आईसाहेबांपाशी आला. विषय कसा काढायचा हेच त्याला कळत नव्हतं. शब्दांची जुळवाजुळव करत तो बराच वेळ तसाच बसून राहिला.
"युगाला तू लग्नासाठी विचारलंस म्हणे?" आईसाहेब थेट मुद्द्यावर येत म्हणाल्या.
"हो. तुम्हाला कसं कळालं? हम्म..तुमचे जासूस आसपास असतात ना! विराज हसत म्हणाला. "मला याबद्दलच बोलायचं होतं. पण कसं बोलू हेच कळत नव्हतं. आई, मी गेली चार वर्षे युगाची वाट पाहतो आहे. मला तिच्याशीच लग्न करायचं असलं तरी तिचा मनापासून होकार हवा आहे. ती भूतकाळातल्या घटनांच्या आठवणीत, असुरक्षितेत अडकून पडली आहे. यातून बाहेर पडून तिने मोकळ्या मनाने मला होकार दिला तरच हे शक्य आहे."
"मलाही हेच वाटतं, माणसाच्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात. ज्यावर आपलं नियंत्रण नसतं. पण त्या घटनातून काहीतरी शिकून बाहेर यायला हवं. त्यातच घुटमळत बसलं तर भविष्याचा विचार करणं फार अवघड जातं. स्वतःभोवती विचारांचं विशिष्ट जाळं निर्माण केलं की माणूस त्यातच अडकून बसतो. खरं तर आम्ही दोघींनीही खूप सोसलं.
पण मी काळानुसार आणि वयानुसार येणाऱ्या अनुभवातून, प्रयत्नांनी त्यातून बाहेर पडले. पण युगा अजून तिथेच अडकून पडली आहे. तिथून स्वतःला बाहेर काढून तिने नवं आयुष्य सुरु करायला हवं आणि आपण तिला मार्गदर्शन करण्याचं काम करू शकतो. हे तिने स्वतः मनावर घ्यायला हवं."
पण मी काळानुसार आणि वयानुसार येणाऱ्या अनुभवातून, प्रयत्नांनी त्यातून बाहेर पडले. पण युगा अजून तिथेच अडकून पडली आहे. तिथून स्वतःला बाहेर काढून तिने नवं आयुष्य सुरु करायला हवं आणि आपण तिला मार्गदर्शन करण्याचं काम करू शकतो. हे तिने स्वतः मनावर घ्यायला हवं."
"अगदी बरोबर. सर्वांचाच भूतकाळ कुठे ना कुठे दुखावलेला असतो. माझ्या आणि आईच्या बाबतीतही हेच झालं. पण म्हणून मी त्यात गुरफटून न जाता स्वत:ला जमेल तशी प्रेरणा देत राहिलो. आईनेही यात माझी मदत केली.
असो..मी मनापासून सांगतो, युगाने मला होकार दिला तर मी तुम्हाला आणि तिला सुखात ठेवेन. काहीही कमी पडू देणार नाही. मी तिची जशी काळजी घेईन, तशीच आई म्हणून तुमचीही काळजी घेईन." विराज मनापासून बोलत होता.
असो..मी मनापासून सांगतो, युगाने मला होकार दिला तर मी तुम्हाला आणि तिला सुखात ठेवेन. काहीही कमी पडू देणार नाही. मी तिची जशी काळजी घेईन, तशीच आई म्हणून तुमचीही काळजी घेईन." विराज मनापासून बोलत होता.
"चला, माझी चिंता मिटली म्हणायची. तुझ्यासारखा जावई मिळाला तर मला युगाची काळजी राहणार नाही आणि तसं झालं तर तुम्ही दोघांनी माझी काळजी करायचं काहीच कारण नाही. माझ्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा इतकंच मला वाटतं आणि मी एकटी थोडीच राहणार आहे रघू आणि राणी माझ्यासोबत कायम राहतीलच की."
आईसाहेब जागेवरून उठत म्हणाल्या.
"चला, खूप रात्र झाली. बाकी उद्या बोलू."
त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आईच्या उठण्याची चाहूल लागताच जिन्यावर बसून दोघांचं बोलणं ऐकणारी युगा पटकन उठून आपल्या खोलीत गेली.
आईसाहेब जागेवरून उठत म्हणाल्या.
"चला, खूप रात्र झाली. बाकी उद्या बोलू."
त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आईच्या उठण्याची चाहूल लागताच जिन्यावर बसून दोघांचं बोलणं ऐकणारी युगा पटकन उठून आपल्या खोलीत गेली.
'विराज आणि आईचं किती छान जमतं आणि खरचं त्याचं माझ्यावर इतकं प्रेम आहे! प्रपोज करताना मी दिलेला नकार त्याने किती सहज पचवला आहे. हा नकार चेष्टेवारी घेऊन त्याने स्वतःला त्रास करून घेतला नाही अन् मलाही कधी त्रास दिला नाही. चार वर्षे झाली, तो फक्त आपल्यासाठी थांबला आहे आणि आपण मात्र त्याला काय दिलं? राग, चिडचिड, चेष्टा, मस्करी..' विचार करता करता युगाला झोप लागली.
सकाळी उठायला उशीर झाला म्हणून ती पट्कन आवरून खाली आली.
"हे काय? कुठं जायची तयारी? आणि मला उठवलं का नाही?"
टेबलावर नाश्ता तयार होता. युगाने आपली प्लेट वाढून घेतली.
"हे काय? कुठं जायची तयारी? आणि मला उठवलं का नाही?"
टेबलावर नाश्ता तयार होता. युगाने आपली प्लेट वाढून घेतली.
"आवर लवकर. बाहेर जातोय आपण. किती वेळा हाका मारल्या. पण तुला काही जाग आली नाही. आईसाहेब तुला बोलवायला येत होत्या. पण मीच नको म्हणालो. तू उठली नसतीस तर आमचं आम्ही फिरायला गेलो असतो." विराज.
"मला सोडून बरं गेला असता? बाहेर जायचा प्लॅन असा अचानक बनवतात का? निदान रात्री तरी सांगायचं. मी लवकर उठले असते आणि तुम्ही दोघं आवरा ना. निघायला उशीर होईल." युगा रघू आणि राणीला म्हणाली.
"मला सोडून बरं गेला असता? बाहेर जायचा प्लॅन असा अचानक बनवतात का? निदान रात्री तरी सांगायचं. मी लवकर उठले असते आणि तुम्ही दोघं आवरा ना. निघायला उशीर होईल." युगा रघू आणि राणीला म्हणाली.
"भरपूर आग्रह केला. पण ते दोघं यायला नाही म्हणतात. आपण जाऊन येऊ. तेही खरंच आहे म्हणा, नवरा -बायकोला थोडा तरी एकांत हवाच ना." आईसाहेब हसत म्हणाल्या. युगा त्यांच्याकडे पाहतच राहिली. 'आई हे असं कधीपासून बोलायला लागली?' तिचं लक्ष विराजकडे गेलं. तोही गालातल्या गालात हसत होता. हे पाहून युगाला आश्चर्य वाटलं. ही सगळी याची कमाल आहे तर!
"बरं, कुठे जायचा प्लॅन आहे?"
"आता बाहेर पडू. दुपारचं जेवण माझ्या मित्राच्या हॉटेलमध्ये करू. जवळच एक जुनं मंदिर आहे. तिथं जाऊन दर्शन घेऊ. संध्याकाळ समुद्रकिनारी घालवून, रात्री जेवून परत घरी येऊ." विराजने मॅपवर पाहून सगळं ठरवलं होतं.
"विराज, तू आईला घेऊन यायला हवं होतंस. तेवढाच त्यांनाही बदल झाला असता आणि मलाही सोबत झाली असती. बोलायला समवयस्क कोणीतरी मिळालं असतं."
"ती कुठली येते? चल म्हंटलं की तब्येतीची हजार कारणं देईल. हल्ली तिला एकटं बरं वाटतं. प्रत्येकाचा एकांत निरनिराळा. पण एक दिवस तिला नक्की घेऊन येईन. बरं, चला आवरा." विराज गाडी काढायला गेला. युगा त्याच्या एकएक हालचाली निरखत होती. आईसाहेबांचं सामान त्याने गाडीत नेऊन ठेवलं. त्यांना हाताला धरून नेऊन बसवलं.
'हा आत्ताच अशी काळजी करतोय की याआधीही असं वागत होता?' युगा आठवण्याचा प्रयत्न करू लागली. ऑफिसमध्ये कार्पोरेट जगात वावरणारा विराज आणि इथं घरगुती वातावरणात वावरताना त्याच्यात किती फरक जाणवतो!'
निघताना आईसाहेबांनी रघू आणि राणीला सूचना दिल्या.
"आई, किती सूचना देशील? लहान आहेत का ते? आणि आपण रात्री परत येणारच आहोत ना, मग कशाला काळजी करतेस?" युगा वैतागून म्हणाली.
"आई, किती सूचना देशील? लहान आहेत का ते? आणि आपण रात्री परत येणारच आहोत ना, मग कशाला काळजी करतेस?" युगा वैतागून म्हणाली.
एकदाची गाडी गेली. राणी आणि रघू तिथेच पायरीवर बसले. "सर आईसाहेबांची किती काळजी घेतात, ताईंपेक्षाही जरा जास्तच. त्याचा ताईंवर खूप जीव आहे. तरीही त्या नाही का म्हणतात? देवच जाणे." रघू.
"बरोबर आहे. एखादी गोष्ट एकदा का मनात पक्की बसली की खोलवर रुजली जाते आणि जोवर आपण ती मनातून काढून टाकत नाही तोवर आपल्याला त्रास देत राहते. तसंच झालंय ताईंचं. आघात झालेल्या मनाला कितीही समजावलं तरी ते आपलंच खरं म्हणतं." राणी म्हणाली.
"रघू, आज काय करायचं? पूर्ण दिवस मोकळा आहे. मस्तपैकी हातात हात घालून समुद्रकिनारी भटकू. बाहेर काहीतरी खाऊ आणि संध्याकाळी घरी येऊ."
"आधी नाही का सांगायचं? सर्वांसोबत गेलो असतो ना?"
"अरे, असं कसं? तुला जराही समजत नाही. मगाशी सर म्हणाले, ते ऐकलं नाहीस का? प्रत्येकाचा एकांत वेगवेगळा असतो." राणी गाल फुगवून म्हणाली आणि रघू मोठ्याने हसला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा