Login

हनन ब्रह्मचर्याचे

Want To Stay Alone

हानन ब्रह्मचर्याचे


इंद्रधनुचे रंग उतरे
क्षितिजा वरती तूच तू दिसे
हे सुखाचे रंग नाचरे
प्रतिबिंबातही तूच तू दिसे


रूप अल्लड किती हासरे
कुज काळ्यांचे कमल फुलांचे
रोज नव्याने भेट होतसे
मनाच्या दरवळी तूच तू दिसे


नयन बोलके कैक इशारे
सावज अलगद पकडती
सांगू कसे तुला मनातले
नको हनन करू माझ्या ब्रह्मचर्याचे


...... योगिता मिलिंद आखरे