त्याचं हे बोलणं ऐकताच तीर्था हसली आणि म्हणाली,
"सदा काका, खरंच, देव आपल्याला कायम थांबून भेटेल, पण मला तुझं हे विसरणं आवडतं. तू माझा काका आहेस, पण तुझं वागणं कधी कधी मित्रासारखं वाटतं!"
दोघं मंदीराकडे निघाले. मंदीराच्या परिसरात प्रवेश करताच सदा काकांचा चेहरा एकदम गंभीर झाला. बाप्पाच्या मूर्तीसमोर त्यानं नम्रपणे मस्तक झुकवलं आणि मनाशी काहीतरी बोलू लागला.
तीर्था त्याच्या मागे उभी होती, त्याला बघत होती. त्याचं प्रेम आणि जिव्हाळा तीला अजूनही जाणवत होतं. तिला हे समजत होतं की सदा काका तिच्यासाठी कधीही काहीही करायला तयार असतो. पण त्याचं मन अजूनही दादाच्या आणि वहिनीच्या जाण्यानं भेदरलेलं होतं.
सदा काकांनी नमस्कार केल्यावर ते दोघं पुन्हा घरी परतले.
घरी परतताच काकूंनी चिडचिड करायला सुरुवात केली.मात्र सदा काकांनी शांतपणे तीर्थावर नजर टाकली. आणि नारज मनाने बोलू लागले.,
"तीर्था, मी आता तुझं लग्न ठरवायला पाहिजे. पण त्यासाठी योग्य मुलगा मिळणं गरजेचं आहे."
तीर्था थोडीशी चकित झाली, पण तीने सदा काकांच्या मनातलं ओझं ओळखलं. ती म्हणाली,
"काका, मला तुमचं सगळं कळतं. पण मला अजून थोडा वेळ द्या. लग्नासाठी माझी अजून तयारी नाही. आपण दोघंही एकमेकांसाठी आहोत, मग असं काही घाईचं नको करूया."
सदा काकांनी तीर्थाच्या या विचारशील बोलण्यावर विचार केला आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकं समाधान दिसलं.
संध्याकाळचा काळ होता, आकाशात सुर्य मावळतीला निघाला होता, त्याचं केशरी-गुलाबी प्रकाश मंद मंदिराच्या गाभार्यावर पडत होता. सदा काका आणि तीर्था दोघं शांतपणे मंदिराच्या दिशेने निघाले. आज तीर्था मंदिरात गाणं म्हणणार होती. तिचा सुरेल आवाज ऐकण्यासाठी लोक आधीच जमा होऊ लागले होते, पण तिच्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं.
मंदिराच्या शिखरावरती चंदनाचा सुवास दरवळत होता. सदा काका तिच्या सोबत चालत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता होती. ते दोघं मंदिराच्या परिसरात पोहोचले, तिथल्या शांततेत जणू देवाचं अस्तित्व भासत होतं. गाभाऱ्याच्या समोर सदा काकांनी नम्रपणे मस्तक झुकवलं, आणि तीर्था देखील त्यांच्यासोबत उभी राहिली.
तीर्था गाभाऱ्यात जाऊन बसली आणि हळूहळू तिचं गाणं सुरू झालं. तिचा स्वर मंद मातीच्या सुवासासारखा नाजूक आणि गोड होता, संध्याकाळच्या वातावरणात तो घुमत राहिला. मंदिरातील लोक तल्लीन होऊन तिचं गाणं ऐकत होते. तिच्या सुरांमध्ये जणू एक वेगळाच जादू होता, ज्यामुळे लोक देवाच्या सान्निध्यात असल्यासारखे भासत होते.
त्याच वेळी, मंदिराच्या बाहेरून एक तरुण मुलगा मंदिराच्या दिशेने येत होता. त्याने बाहेरून तीर्थाचा गोड आवाज ऐकला आणि तो जणू त्या सुरांच्या मागे ओढला गेला. त्याचं मन त्या गाण्याने भारावलं होतं, तो थांबून त्या आवाजाकडे कान लावून ऐकत राहिला.
हळूहळू, त्याच्या पावलांनी त्याला मंदिराच्या मुख्य दाराशी आणलं. त्याने आत प्रवेश केला, डोळे शोधत होते त्या सुरांचा स्रोत, आणि शेवटी त्याची नजर तीर्थावर स्थिरावली. तीर्था गाभाऱ्यात बसलेली होती, गाण्यात इतकी रमलेली की तिच्या भोवतालच्या जगाचं भान जणू तुटलं होतं. तिचा स्वर अजूनही मंदीरभर घुमत होता, आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावर विस्मय आणि कौतुकाचं मिश्रण दिसत होतं.
त्या मुलाच्या नजरेतून अद्याप तीर्थाचा गोड आवाज व तिचं सौंदर्य विलक्षण दिसत होतं.
गाणं संपताच, मंदिरातील वातावरण एक क्षणासाठी शांत झालं, जणू सर्वजण त्या क्षणाला पकडून ठेवू इच्छित होते. तीर्थानं डोळे उघडले आणि हळुवारपणे सभोवतालचं वातावरण बघितलं. लोक तिचं कौतुक करत होते, पण तिची नजर एकदम थांबली, समोरच उभ्या असलेल्या त्या अनोळखी मुलावर.
तो मुलगा अजूनही तीर्थाच्या आवाजात हरवलेला होता, आणि तीर्था त्याला एक क्षणासाठी ओळखू शकली नाही. त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या, आणि तीर्थाच्या मनात एक विचित्र ओढ जाणवली. तिनं पाहिलं की तो मुलगा अजूनही तिच्या दिशेनं बघत होता, त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ भाव होतं.
सदा काकांनी तिच्या पाठीवर हलकं हात ठेवलं, आणि तीर्था भानावर आली. लोकांनी तिला तिच्या गाण्याचं कौतुक केलं, पण तिचं लक्ष अजूनही त्या मुलाकडे होतं. तीर्था त्याच्याशी बोलायला जाणार होती, तेवढ्यात सदा काकांनी तिला हातानं इशारा करून बाहेर येण्याचं सुचवलं.
दोघंही मंदिराच्या बाहेर आले. सदा काका तिच्या बाजूला चालत होते, पण तीर्थाच्या मनात विचारांचां काहूर माजला होता. तीचा मन असं काहीतरी अनुभवत होतं जे तिला आजवर कधीच झालं नव्हतं. ती त्या अनोळखी मुलाचं चेहरा आणि त्याची तिच्या कडे बघणारी नजर विसरता येत नव्हती.
"काका, तो मुलगा कोण होता?" तीर्थाने अखेर विचारलं.
तो कोण आहे, हे मला माहिती नाही, मंदिर आहे असेल आपल्या सारखाच आशिर्वाद घेण्यासाठी आला असेल.सदा काकांनी तिच्याकडे पाहिलं आणि गहिऱ्या आवाजात म्हणाले,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा