१९) अलवार अशा वळणावरती

....
जीवंत होती पण जगणं तर मेल्यांची जाणीव करून देणारं होतं ना"ओ बाबा म्हणून म्हणालो जे, झालं ते चांगलंच झालं राहिली दादाची अवस्था तर मी "त्याला जास्त दिवस तसचं नाही ठेवणारं उद्यांच डाॅक्टरकडे घेऊन जाईन म्हणतोयं आणि राहिली तीर्था तर तीला तेवढी अक्कल अजून आलेली नाही.त्यामूळे तीला आई नसणं ही गोष्ट आता तरी ती मनाला लावून घेणार नाही.त्यामूळे तीला सावराची गरज नाही.तसंही यापुढे तीच्या सहवासात आपणच राहाणार आहोत त्यामूळे तीच्या डोक्यात तसा विचार येणार सुद्धा नाही.

अरे पण पुढे, जाऊन तू म्हणतोस ती अक्कल तीला येईल तेव्हा तीला खूप प्रश्न पडतील त्याची उत्तर कशी देणार आहेस तू की, तीच्या आईचं सत्त्य तीच्या पासून लपवून ठेवणार आहेस ,

नाही बाबा मी"तीच्या पासून काहीही लपवणार नाही.ते सुद्धा वहिनीच्या बाबतीत लपवणं नाही जमणार.पण ते सर्व तीला इतक्या लवकर नाही सांगणार सर्व सांगेन पण योग्य वेळेवर पण सध्या तरी हे सर्व तीला आता कळून न देण हाच माझा प्रयत्न असेल.

बराच वेळ बाबांशी मी" बोलत होतो तेवढ्यात मला दादाची आठवण झाली. पण मी "तुझ्यावर एक नजर टाकली तर तू, छान खेळत होतीस,

बाबा मी"आलोच दादाला बघून येतो.बराच वेळ झाला मी" बघायला गेलो नाही तसंही पुजेसाठी तो लागेल बघतो उठलायं का? ते आणि घेऊनच येतो एवढंच बोलून मी" तुझ्यांवर लक्ष ठेवायला सांगून दादा कडे गेलो,

दरवाजात जाताच मी"सरळ आत न जाता हळूच बाहेरून डोकावण्यांचा प्रयत्न केला.दादा बेडवर मागे टेकून अगदी शांत बसला होता हसतमुख चेहर्याने तो एकटक त्याचा डाव्या बाजूला बघत"

मला जे कळायचं ते कळलं पण पुन्हा एकदा मला वहिनीचा खूप राग आला .

रात्री इतकं समजावून सुद्धा वहिनी अजूनही दादाला दिसते मी" स्वत:शीच बडबडलो.आणि थोड्या रागातच दादाचा रुमचा बंद दरवाजा लोटला.

तसा दादा दचकला आणि दरवाजातून आत शिरणार्या माझ्या वर एक कटाक्ष टाकत"

‌सदा काय? रे ...ही सवय कधी जाणार आहे तूझी"न विचारता आमच्या खोलीत येण्याची आणि ते ही अशा पद्धतीने दार लोटायची गरज काय? होती आजारी आहे ती माहित आहे ना"रात्र रात्र झोप नाही लागत तीला आवाजाने उठली असती तर...झोप खराब नसती का? झाली.जा...आता इथून दादा माझ्या शी ज्या पद्दतीने बोलत होता ते ऐकून मला सुचायचं बंद झालं. मी "तसाच तिथे उभा राहात हतबलते ने त्याचाकडे बघत होतो.

ऐकू नाही आलं का? जा म्हणालो "ना" मी तिथून हलत नाही म्हटल्यावर, दादा माझ्या वर पुन्हा खेखसला.त्याचा वाढलेला आवाज मला सहन झाला नाही.पण त्याची मनस्थिती समजून घेता मी "तिथून जाण्यासाठी वळलो तेवढ्यात दादा पुन्हा ओरडला,

सीमा".... सीमा....वहिनीचं नाव दादाचा तोंडून ऐकताच मी" एकदम चमकलो.आणि माझी चालणारी पावलं थांबली.दादाचा दिशेला वळलो तसा तो पुन्हा बोलू लागला.

सदा"..... अरे माझी सीमा कुठे?आहे आता तर इथे या, इथे झोपलेली होती तूझ्यांशी थोडावेळ बोलायला नजर काय? हटवली तर गायब "...नाही आहे इथे आणि तशी ती आजारी आहे ती ही इतकी की अंथरूणावरून उठत नाही पण मग हे काय? आहे बरी झालीयं  का? रे.... ती तूला ती सर्व सांगते ना, मग तूला माहित असेल ना ,असं तर नाही ना "सीमा बरी झालीयं पण ती माझा काही दिवस एप्रिल फुल करतेयं वगैरे आणि त्यातं तू तीची साथ देत, नाहीस ना, दादा अस्वस्थ होत विचारत होता तसे,तसे माझे डोळे मात्र मोठे झाले.

सदा अरे काय? विचारतोय मी"आणि काय? झालंय असा काय? बघतोस कुठे? आहे माझी सीमा, .... सांग ना"
मला काही दिवस झाले खूप शंका येतेयं पुर्ण घरात वावरणारी सीमा मला दिवस भर घरात कुठेच दिसत नाही.पण रात्री मात्र खूप उशीरा जेव्हा मला जाग येते तेव्हा ती माझ्या शेजारी  निपचित पडलेली असते.

मला सांग रात्री ती माझ्या शेजारीच असते. मग ती दिवस भर कुठे? असते हाँस्पिटल मध्ये वगैरे नाही ठेवत ना"तूम्ही तीला माझ्या नकळत सांग ना, मला विचारता विचारता दादाने डोक घट्ट पकडलं आणि तोल न सावरल्या मूळे मला काही कळायचा आत जमीनीवर कोसळला.

दादा दादा अरे ...काय? झालं तूला मी"त्याला आवाज देत उठवण्याचा प्रयत्न केला.पण तो काही उठे ना, मी, घाबरलो
समोरच्या टेबलावरचा पाण्यांने भरलेला जग घाई गडबडीत उचलला त्यातून पाणी आजूबाजूला सांडलं ही त्याकडे दुर्लक्ष करत मी"त्या चेहर्यावर पाणी शिंपडलं.

दादाने हळूहळू डोळे उघडले माझा जीव भांड्यात पडला.
तो अजूनही वहिनीचं नाव घेत नजर सैरभैर फिरवत होता.
मला मात्र त्याला काय? सांगाव सुचत नव्हतं पण आता तरी त्याला सावरण गरजेचं होतं महत्वाच गुरूजी येण्याची वेळ झाली होती.त्यासाठी दादाला खाली घेऊन जाणं महत्वाचं होतं. मी" विचारात मग्न होतो की,पुन्हा दादाचा आवाज माझ्या कानावर पडला.

सीमा अग... कुठे? आहेस मला त्रास होतोय दिसतंय तरी तूला समोर याव वाटत नाही का?असचं काही तरी बरळत होता.
तर...दुसरीकडे मला ओरबाडून ओरबाडून विचारत होता.त्याची ती हतबलता मला बघवत नव्हती.

दादा अरे... शांत हो आणि हे काय? बडबडतोस काही झालेलं नाही वहिनीला खाली आहे ती आज पुजा आहे म्हणून मीच तीला खाली घेऊन गेलो तू गाढ झोपला होतास म्हणून म्हटलं झोपू द्यावं तुला, पण तू का? तूला दिलेल्या सुटेचा खूप फायदा घेतलास बरं सुर्य डोक्यावर आला पण ...अंथरूणावरून उठायचं नाव नाही घेत आहेस मी"त्याला कळू नये म्हणून मनातली दु:खाची छटा तात्पुरती हटवली आणि मस्तीचा सुर लावला.

काय? खाली आहे मग हे आधी सांगायला काय? झालं होत रे... तूला,कधीचा गप्प राहून जीव घेतोस माझा माझं बोलणं गंमतीशीर समजून दादा आज खूप दिवसांने बोलला तेही  अगदी नेहमी सारखं ते बोलणं ऐकून माझ्या डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळले. पण ते दादाचा नजरेस पडणार नाही याची काळजी घेत,मी ...पुसले आणि स्वत:ला सावरत त्यालाही सावरलं आणि उभ केलं.

बरेच दिवसांपासून पोटात अन्नांचा कण नसल्यांने त्याला अशंक्तपणा जाणवतो होता.त्यामूळे त्याची उठतानाही थोडी धडपड होतं होती.पण त्याला यापूर्वी घडून गेलेली घटना आाणि त्यामूळे त्याची झालेली अवस्था यातलं पुसटसं ही आठवत नसल्यांने त्याचा काही दिवसांपासून पोटात अन्नांचा कण नाही हे कळायला मार्ग नव्हता.मी"कसं बस त्याला पकडलं आाणि त्याला फ्रेश करून थोड्याच वेळात खाली घेऊन आलो.

तयारी तर खूप छान आहे पुजेची पण कसली पुजा हे काही सांगितलं नाहीस खाली येताच  माझा हात सोडला,आणि त्याने एक नजर सर्वत्र फिरवत म्हणाला.

दादा अरे.... मी

ते सोड तू मगाशी म्हणाला होतास सीमा खाली आहे. मग मला ती इथे कुठेच दिसत कशी नाही सदा काय? विचारतोयं मी" काहीच का? बोलत नाहीस.मी काही बोलणार की, पुन्हा तोच बोलला. पण मला मात्र त्याचा या प्रश्नांवर काहीच बोलता नाही आलं.

सदा अरे... लक्ष कुठे? आहे तूझं काय? विचारतोस सीमा इथे नाही मग कुठे? आहे आणि हे काय? मी, मगाच पासून बघतोयं तू इतका शांत का? आहेस काही लपवत तर नाहीयेस  ना, माझ्यापासून माझं त्याचा बोलण्याकडे लक्ष नाही समजून
दादा माझ्या कडे शंकेने बघत पुन्हा म्हणाला.

आता मात्र मी" पुर्ण पेचात पडलो.आणि त्याचा पासून काही न लपवता थोडक्यात खरं सांगितलं.आणि मग काय? मी "जे काही सांगितलं त्या सरशी दादाचा हाताची चपराक माझ्या गालावर बसली. मला काही कळायचा आत त्याचा हाताची पाच बोटं माझ्या गालावर ठसठशीत उमटली. पण काही क्षणांत दादा भोवळ येऊन खाली कोसळला. तसे बाबा आमच्या दिशेने आले.

दुसरीकडे दादा बेशुद्ध पडला होता मी "त्याला दोन्ही हातावर उचललं आणि वरच्या दिशेला असणाऱ्या त्याचा रूमच्या दिशेने गेलो.आणि बेडवर झोपवलं. तसाच खिशातून मोबाईल काढला आणि डाँक्टराना काँल केला.थोडसं बोलून काँल कट केला.पुन्हा दादा जवळ गेलो.

दादा अरे.... काय? झालं तूला खूप दिवसांने नेहमी सारखा बोलायला लागला होतास पण होत्यांच नव्हतं व्हायला वेळ नाही लागला.काय? औदसा सुचली मला आणि मी "तूला खर सांगून टाकलं.पण हे मी "जाणून बुजून नाही केलं काय? करू किती दिवस तूझ्या बायको विषयी तूझ्याशी मनात नसताना खोट बोलावं लागत होतं त्या गौष्टीला वैतागलो होतो पण तूझी मनस्थिती ठिक नव्हती म्हणून तूझ्या विचार करून लपवत ही होतास. पण आज नेहमी सारखा वाटलांस अगदीच तूला काहीच न झाल्यासारखा आाणि म्हणून मागचा पुढचा विचार न करता सर्व बोलून गेलो.वाटलं होतं काही नाही होणार तूला हे सर्व ऐकून तूझी ही अवस्था होईल हा विचार नाही केला मी"आणि तिथेच चुकलो पण तूला काही होणार नाही मी, डाँक्टरांना बोलवलंय एकदा ते आले की ,तू ठिक होशील.आणि मग मात्र आपण एका चांगल्या डाँक्टराना दाखवून तूला मानसिक त्रासातून सुद्धा बाहेर काढेन मी" दादाचा कपाळावरून हात फिरवतच बोलत होतो खरं सांगायचं तर तो तर ...बेशुद्ध होता त्यामूळे त्याला माझा आवाज ऐकू येत तर नव्हता पण कुठे? ना, कुठे? मी हे सर्व बोलून  माझ्या मनाची समजूत घालत होतो.


🎭 Series Post

View all