२०) अलवार अशा वळणावरती

....
थोडासा वेळ गेला मी" डोळ्यांत पणी आणून त्याचाशी अजूनही बोलत होतो.

तेवढ्यात बाबा डाँकंटरांना घेऊन दादाचा खोलीत आले. तीर्था त्याचा खांद्यांवरच होती.

डाँक्टरांनी कसं झालं विचारताचं मी" वहिनीच्या जाण्यापासून ते आतापर्यंत सर्व घडला प्रकार सांगितला.आणि डाँक्टरांनी तपासलं.

खरं सांगायचं तर खूप वाईट वाटलं मला हे सर्व ऐकून पण हा आमचा पेशाच आहे त्यामूळे दिवसांतून बराच वेळा आम्ही या सर्व केस मधून जातो किंवा यापेक्षा विचित्र केस सुद्धा असते.पण मला जे वाटलं ते सांगतो.डाँक्टर बोलू लागले आणि आम्ही ते पुढें काय? सांगितल आणि काही नाही या विचारात उभे होतो.

माहित नाही पण त्याचा मनावर खूप मोठा आघातच झालायं,

हो डाँक्टर वहिनीच्या जाण्यांचा आघात मी "डाँक्टरांचा बोलण्यावर प्रती उत्तर म्हणून म्हणालो.

नाही हा त्याचा जाण्याचा आघात नाही मला तर जरा वेगळीच शंका आहे.

वेगळ म्हणजे? मी" समजलो नाही.

मी" जरा स्पष्टच बोलतो हे सर्व सूरू तेव्हाच झालंय,जेव्हा त्या आजारी पडल्या,तेव्हाच त्याचा मनात त्याची बायको त्याना कधीही सोडून जाऊ शकते ही भिती बसली होती.कदाचित पण तुम्हाला त्याचा वागण्यातून कधी ते जाणवलं नसावं.

नाही डाँक्टर ही त्याची अवस्था तर वहिनी गेल्या वरच दिसू लागलीयं,नाही म्हणजे? या आधीही वहिनीच्या काळजीने अस्वस्थ असायचा पण तसं कधी जाणवलं नाही मला की, तो तेव्हापासून मानसिक रुग्ण वगैरे असेल म्हणून,हा पण सतत वहिनी सोबत तीच्या रूम मध्येच असायचा तीच्या शिवाय दुसर्या कामाला महत्व ही नाही दिलं त्याने नेहमी एकच मनायचा ती शांत झोपलीयं पण तीला चूकून जाग आली आणि तेव्हाच तीला आपली गरज वगैरे लागली तर ...तीच्या सोबत कुणीतरी असायला हवं म्हणून,मी"तीच्या सोबतच राहातो.पण तेव्हा असं वाटायचं बायको आहे तर तीची काळजी वाटण साहाजिकच आहे.

हो पण तो ही एक धक्काच होता आशा केस मध्ये आपल्या समोर वावरणारी व्यक्ती मानसिक रूग्ण असून ही ती तशी जाणवत नाही.पण खर तर ते मुळात मानसिक तणावाखाली असतात आपल्यातून आपलीच व्यक्ती कायमची निघून जाणार याच विचारात ती व्यक्ती स्वत:पेक्षा त्या व्यक्तीचा पुढे मागे  करते.आणि एक दिवस अल्पवयी आजाराने ती व्यक्ती निघून जाते.आणि मग जो धक्का बसतो तो एकदम त्या व्यक्तीला इतकं सुन्न करते की, ती मानसिक रूग्ण व्यक्ती आपल्या व्यक्तीला गमावल्याने आपल्याचं कोशात जात दुसरं तिसरं कुणीही नाही तर ती रूग्ण व्यक्ती फक्त आपल्या गमावलेल्या व्यक्तीचा आठवणी कवटाळून बसलेली असते.

हळूहळू त्याचं वेड जगासमोर येऊ लागत आताही तूमचा व्यक्ती शुद्धिवर तर ...येईल पण तो त्यानंतर कसं रियाक्ट करणार आहे हे नाही सांगता येत.कदाचित एकदम बरी होईन किवां मग नेहमीपेक्षा अजून घराब होऊ शकते.त्याची अवस्था किवां मग आहे तशीच राहू शकते.त्यामुळे मला तर वाटतं आपणच असे तर्क वितर्क लावण्यापेक्षा आता थोडक्यात आहे तर...चांगल्या मानसतंज्ञा कडे तूम्ही त्याची ट्रिटमेंट चालू केली तर....कदाचित पुढे जे काही घडू शकत ते या ट्रिटमेंटने आटोक्यात येऊ शकते.

थोडा वेळ लागेल त्याना शुद्धिवर यायला.त्यामूळे मी"निघतो काही वाटलंच तर काँल करा,डाँक्टरांचं बोलून झालं आणि डाँक्टर निघून गेले.

आता काय? करावं पेचातच पडलो वहिनीच्या तेर्याव्याची पुजा ज्याचा हाताने करायची तो तर...बेशुद्ध अवस्थेत होता. शुद्ध येणार तर होती पण नक्की किती वेळ लागणार हाच अंदाज लागत नव्हता. वेळ ही निघून चालला होता. गुरुजी एव्हाना पोहोचले होते.नाईलाजाने जी पुजा दादाच्या हाताने करणार होतो ती मला करावी लागली.

डाँक्टर निघून गेले तसे वेळ न दवडता मी" ही इशार्याने बाबांना चलायला म्हटलं तसे बाबा तूला घेऊन बाहेर पडले. दुसरीकडे मी" एकदा दादावर कटाक्ष टाकला.आणि मी" ही बाहेर पडताच  त्याचा रूमचा दरवाजा लावून घेतला.

खाली जाताच पुजेला सुरूवात झाली.काही वेळ असाच गेला आणि पुजा संपन्न झाली. कार्य निर्विघ्नपणे पार पडाव असं म्हणण्यांसारख काही झालं नाही पण अडी अडचणी तून सुद्धा विहिनीला मुक्ती मिळवू शकलो. याचचं काही ते समाधान,....

कार्यात जे काही शेजारी पाजारी आले होते हळूहळू तेही आपल्या घरी जाऊ लागले.जवळजवळ अर्धा तासात घरातली रेलचेल अचानक कमी झाली आणि पुन्हा एकदा भयान शांताता पसरली. हे सर्व आटपण्यात जवळजवळ दुपारचा एक वाजला.तूझे ही डोळे जवळजवळ पेंगायला लागले होते. पहाटे लवकर जे उठली होतीस,बाबांना सांगून तूला झोपवायला सांगितलं आणि मी" दादाला बघायला त्याचा रूमच्या दिशेने गेलो.

दादा हालचाल करताना दिसला डोक्याला दोन्ही हातांने दाबत बेडवरच तळमळत होता कदाचित बराच वेळ बेशुद्ध असल्याने डोक वगैरे दु:खत असावं अस फक्त त्याच्या हालचाली वरून मला वाटलं पण तसं काही नव्हतं. तो तर माझा गैरसमज होता.


🎭 Series Post

View all