Login

फिर भी तुमको चाहुंगा... भाग ५

आई खरंच प्रेम करतो तिच्यावर. म्हणून तिला सांगण्या आधी मी तुला आणि बाबांना सांगितलं." अजिंक्य

मागील भागात आपण बघितले…


" शांत हो. आज रडून घे नंतर मला तुझ्या डोळ्यात अश्रू दिसायला नको. मला नाही आवडत तुझ्या डोळ्यात पाणी. तारा सांग मला काय झालं आहे?" अजिंक्य एका हाताने तिच्या डोक्यावर हात फिरवत दुसऱ्या हाताने तिला अजून घट्ट मिठीत घेत बोलला.



थोडावेळ अजून तारा त्याच्या मिठीत शांत होण्याचा प्रयत्न करत होती. नंतर बाजूला होत तारा अजिंक्यच्या डोळ्यात बघून बोलू लागली.



" अजिंक्य मी आता जे काही सांगणार आहे त्या नंतर कदाचित तू माझ्या पासून दूर जाशील." तारा.




आता पुढे…



" तारा तू आधी शांत हो. हे घे पाणी." अजिंक्यने ताराला पाणी दिले. तिचे डोळे पुसले.


तारा सोफ्यात बसली. पाणी पिऊन झाल्यावर ताराने मोठया हिमतीने बोलायला सुरुवात केली.



"कसं रे सांगू तुला? तू काय विचार करशील? पण आता तुला सगळं कळलच पाहिजे. तुझ्या जीवन संगिनीच्या रुपात तू मला बघतो आहेस. पण मी आत्ताच सांगते की ते शक्य नाही. मला सुद्धा तुझ्या सोबत आयुष्य घालवण्याची इच्छा आहे. पण इच्छा असणं आणि ते प्रत्यक्षात आणण ह्या दोन्ही गोष्टी वेग वेगळ्या आहेत. मी जे काही आहे किंवा जो माझा भूतकाळ आहे त्यामुळे आपण कधीच एकत्र येऊ शकतं नाही. 


खरं तर आजच्या ह्या परिस्थितीसाठी दोष माझाच आहे. मला सगळं माहित असून मी प्रेम करायची चूक केली, आणि त्याहून मोठी चूक प्रेमाची कबुली देऊन केली." तारा बोलत होती.



" ते आपण नंतर ठरवू की कोणाची चूक आहे की नाही आणि किती आहे. त्यामुळे तू आता मला बाकी सांगू नकोस फक्त सत्य सांग.सांगून मोकळं कर स्वतः ला त्या भूतकाळाच्या बेडीतून." अजिंक्य.


" मी" तारा बोलायला सुरुवात करणार तितक्यात दाराची घंटी वाजली. 'ह्यावेळी कोण आलं असेल?' ह्याच विचारात अजिंक्यने दार उघडले.



" अरे तू लवकर आलास? बाहेर तुझी बाईक दिसली म्हणून समजलं." प्रतिभाताई म्हणाजे अजिंक्यची आई घरात शिरत अजिंक्यला बोलल्या.


" अरे तारा तू पण आहेस! बरं झालं आलीस, आपली भेट नाही झाली बरेच दिवस झालेत. असं ही आज तुला बोलणारच होते मी." घरात आल्यावर प्रतिभाताई ताराला बघून बोलत होत्या.


अजिंक्य आणि तारा एकमेकांच्या घरी येत जात असत त्यामुळे अजिंक्यच्या आईला ताराला बघून काही वावगं वाटलं नाही. पण आईला बघून अजिंक्यचा मात्र मूड ऑफ झाला होता. त्याचा पडलेला चेहेरा प्रतिभाताईंच्या नजरेतून सुटला नाही. 

"नाकोत्या वेळेस आली आई. थोडं अजून उशीर आली असती तर, बोलून झालं असतं ताराचं." अजिंक्य मनातच बोलत होता.


" आई तू मावशीकडे जाणार होतीस ना आज? मग इतक्या लवकर कशी आलीस?" अजिंक्यने आईला लवकर येण्याचे कारण विचारले.


" अरे हो पण मावशीला काही महत्त्वाच्या कामासाठी अचानक बाहेर जावं लागलं. त्यामुळे माझं जाणं रद्द झालं. मी निघणारच होते बस स्टॉपवर जायला, तेव्हाच तिचा फोन आला. मग म्हंटल तयारी केलीच आहे तर भाजी बाजार घेऊन यावा म्हणून मंडीत गेले होते. 



बरं झालं तारा इथेच आहे. नाहीतर तुला पाठवणार होते आल्यावर तिला आणायला. आज मोकळा दिवस आहे म्हंटल कोंबडी वडे करू. ताराला आवडतात म्हणून. मी रमाताईंना फोन करून सांगते की तारा आज इथेच जेवेल." असं म्हणत प्रतिभा ताईंनी हातातील पिशवी किचन मध्ये ठेवली आणि फोन करायला गेल्या.



" काकू नको मी जते. नंतर येईल कधीतरी." तारा


" अरेच्चा तू कधीपासून परक्या सारखी वागायला लागलीस गं. ते काही नाही तू थांब. मी फोन करते." असं म्हणत प्रतिभाताईंनी रमाताईंना फोन केला सुद्धा आणि तारा आज जेवायला घरी येणार नाही हे सांगितले देखील.


आता प्रतिभाताईंनी आपला मोर्चा परत तारा कडे वळवला.


" तारा काय झालं? तुझे डोळे असे सुजलेले का दिसत आहेत?" प्रतिभाताई तारा जवळ बसत बोलल्या.


तारा काही बोलणार तितक्यात अजिंक्यनेच त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले.


" काही नाही आई. आज मॅडमच भांडणं झालं समीराशी त्यात भर म्हणजे तारा ची चूक नसताना सर तिला रागावले. म्हणून तिचा मूड गेला. मग म्हटलं चल घरी जाऊ चहा घे मस्त. बरं वाटेल." अजिंक्य 



" भांडणं चालतात मैत्रिणीनं मध्ये. इतकं मनाला नाही लावून घ्यायचं. चल आपण सगळे चहा घेऊ मग आपण दोघी मिळून स्वयंपाक करू आणि खूप गप्पा मारू." प्रतिभाताई.



प्रतिभाताईंना तारा खूप आवडायची. त्या ताराचे खूप लाड करायच्या त्यांच्या त्यामुळे त्यांच्या इतक्या प्रेमाच्या आग्रहाला तारा नाही म्हणू शकली नाही. चहा झाल्यावर दोघींनी स्वयंपाक केला. तिघांनी भरपूर गप्पा मारल्या. मस्त जेवणझाल्यानंतर प्रतिभा ताईंनी तारा सोबत रमाताई आणि श्रीरंगरवांसाठी डब्बा दिला. त्या नंतर अजिंक्य ताराला तिच्या घरी सोडून आला.



दोघे रस्त्यांनी काही बोललेच नाही. प्रतिभाताईंशी बोलून मात्र ताराला जरा बरं वाटतं होतं. 



" उद्या भेटू." असं बोलून अजिंक्य तिला सोडून निघून गेला खरं पण डोक्यात विचारांचे थैमान सुरू होते.



घरी आल्यावर देखील त्याचं चित्ता कशात लागतं नव्हते. तो अगदी बेचैन झाला होता. त्याची ही अवस्था प्रतिभाताई बघत होत्या.



" काय झालं अजिंक्य? बोलणार होतास ना तू आज तारा शी? बोललास का?" प्रतिभाताई



" हो आई बोललो." अजिंक्यचा चेहेरा पडलेला होता.



" अरे मग काय बोलली तारा? मला माहित आहे ती सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करते. नक्कीच हो म्हणाली असेल." प्रतिभाताई.



" हे खरं आहे की, ती माझ्यावर प्रेम करते पण …" अजिंक्यने एक लांब श्वास घेतला.



" पण काय?" प्रतिभाताई.



" आई तिने नकार दिला." आता मात्र अजिंक्य चा बांध सूटला तो आतून पूर्ण पणे तुटला होता.



" पण नकार का? तू गंमत करतो आहेस ना माझी?" प्रतिभा ताई अजिंक्य ला एक हलकी प्रेमाची चापट देत म्हणाल्या.



" आई हे गंमत असती तर बरं झालं असतं. पण माझं दुर्दैव की ही गंमत नाहीये." अजिंक्य च्या डोळे भरून आले होते.


त्याच्या डोळ्यातल्या वेदना प्रतिभा ताईंना समजल्या.



" पण का?" प्रतिभा ताई



" ती म्हणते की ती माझ्या योग्य नाही. तिच्या भूतकाळात काहीतरी दडलेल आहे. ज्यामुळे ती नकार देते आहे." अजिंक्य खिन्न स्वरात बोलत होता.



" पण काय आहे ते?" प्रतिभाताई सुद्धा विचारात पडल्या.



" तेच सांगणार होती ती. की तितक्यात तू आलीस. आता तिच्या समोर तुला काय सांगू मी? म्हणून समीराच करणं सांगितलं. तू उगाच आलीस आई. थोडं उशिरा आली असतीस तर." अजिंक्य जरा वैतागलेल्या स्वरात बोलला.



" ताराला बघून मला वाटलेच होते की मी चुकीच्या वेळेत आले. पण मला काय माहीत की, ती असेल तुझ्या सोबत!" प्रतिभा ताई.



" आई, तारा बोलली तेव्हा पासून मी विचार करतो आहे गं की, असं काय घडलं असेल तिच्या सोबत की ज्यामुळे ती स्वतः च्या प्रेमाची आहुती द्यायला निघाली?" अजिंक्यने मनातील प्रश्न बोलून दाखवला.



" माहीत नाही पण नक्कीच काहीतरी गंभीर असेल. त्या शिवाय ती असं करणार नाही." प्रतिभाताई



" आई तारा म्हणते, तिचा भूतकाळ ऐकून मी तिच्या पासून लांब जाईल. म्हणून तर ती प्रेमाची कबुली सुद्धा देत नव्हती. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे." अजिंक्य



" हे बघ जे असेल ते असेल तो तिचा भूतकाळ होता." प्रतिभाताई



" पण इतकं सोपं असेल का सगळं?" अजिंक्य



" अजिंक्य तिचा भूतकाळ नक्कीच गंभीर असेल ह्यात वाद नाही. पण ती तुला सगळं सांगणार आहे आणि तू तिच्या वर प्रेम करतोस. अर्थात जर खरं प्रेम करत असशील तर तिला तिच्या भूतकाळासह साकारायला तुला अडचण यायला नको." प्रतिभा ताई



" आई खरंच प्रेम करतो तिच्यावर. म्हणून तिला सांगण्या आधी मी तुला आणि बाबांना सांगितलं." अजिंक्य


" हो. आता तू उद्या भेट तेव्हा कळेलच तुला सगळं. त्यावर तू ठरव काय ते. आम्ही तुझ्या कोणत्याही निर्णयात तुझ्या सोबत आहोत. पण तू तिचा स्वीकार केला तर आम्हाला जास्त आनंद होईल." प्रतिभा ताईंनी अजिंक्यच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत त्याची हिम्मत वाढवली. पण त्यांच्या मनात देखील प्रश्न होताच की 'काय झालं असेल तारा सोबत?'



ती रात्र अजिंक्यने कशी बाशी काढली. नेहमी उशिरा जाणारा तो, सकाळीच तयार होऊन कॉलेजला गेला. कॉलेगच्या गेट जवळच ताराची वाट बघत बसला होता.



पुढील भागात बघू तारा अजिंक्यला भेटेल का? 



क्रमशः




©वर्षाराज


0

🎭 Series Post

View all