मागील भागात आपण बघितले…
अजिंक्य ताराला एकटक बघत होता. डोक्यात विचारांचे काहूर दाटत होते. त्यानी कॉलेजची बॅग उघडली त्यात अजून एक बॅग होती जी मीताने ठेवली होती. ती बॅग बाहेर काढली. त्यात एक फाईल होती. त्यात काही कागद पत्र होती. पण त्याला ताराची ती डायरी वचायची होती, जी तिने त्याच्या साठी दिली होती. अजिंक्यने ती डायरी उघडली पहिल्याच पानावर एक कागद ठेवलेला होता. त्याने तो कागद उघडला. त्यात लिहिले होते,
" आता सुद्धा वेळ आहे, नाहीतर मरायला तयार रहा." हा तोच कागद होता. जो काल दगडा सोबत आला होता.
ते वाचून अजिंक्यच्या पाय खालची जमीन सरकली.
आता पुढे…
अजिंक्यने तो कागद पुन्हा घडी करून ठेवला. पुढच्या पानावर त्याला अजून एक कागद सापडला. त्यावर अजिंक्यचे नाव लिहिले होते. त्यानी तो कागद उलगडला.
ताराने तिच्या छान स्वच्छ गोल गोल अक्षरात लिहिले होते.
" अजिंक्य, आय लव्ह यू. मला वाटलं नव्हतं की, कधी मी कोणाच्या प्रेमात पडेल. पण तू माझ्या आयुष्यात एक नवीन आशा घेऊन आलास. पण मला तुला कोणत्याही भ्रमात ठेवायचे नाहीये. खरं तर मलाच तुला सत्य सांगायचे होते पण. असो तुला ह्या डायरीतून सगळं समजेल. मला माहित नाही जेव्हा तुला ही डायरी मिळेल तेव्हा मी कुठे आणि कशी असेल. असेल की नाही हा सुद्धा एक प्रश्नच आहे. शक्य झालं तर मला माफ कर.
तुझी,
तारा"
हे वाचून अजिंक्यने एक दीर्घ श्वास घेतला. तारा कडे तो बघत होता. "किती अचूक होता ताराचा अंदाज. ती म्हणाली तसच झालं. पण असं का? हे आता कळलेच पाहिजे मला." अजिंक्य विचार करत होता. तितक्यात रमाताई कॉफी घेऊन आल्या. अजिंक्यने ती फाईल वराच ठेवली होती. ती बघताच त्या घाबरल्या.
" अजिंक्य ही फाईल खूप महत्त्वाची आहे. अशी वर ठेऊ नकोस. आत ठेव. ताराची इतक्या वर्षांची प्रतीक्षा आहे ही फाईल. तिचं भविष्य आहे ह्यात." असं म्हणत रमा ताईंनी कॉफीचा कप टेबल वर ठेवत खोलीचे दार पटकन बंद केले.
अजिंक्यने ती फाईल परत बॅगेत टाकली.
" काकू असं काय आहे ह्यात?" अजिंक्य
" तू बघितलं नाहीस अजून? असो आधी ती डायरी वाच मग समजेल तुला सगळं." रमाताई कॉफीचा एक कप अजिंक्यच्या हातात देत म्हणाल्या.
अजिंक्यने कप घेतला. मान डोलालावी आणि एका हाताने परत डायरी उघडली. त्यात अगदी थोडक्यात ताराने सगळी घटना लिहिली होती. डायरीच्या पहिल्याच पानावर एक तारीख टाकलेले होती.
मार्च २००२
"माझ्या आयुष्यातील काळा दिवस. ह्या दिवशी माझे आयुष्य पार बदलून गेले. हसत खेळत राहणारी मी स्वतः ला हरवून बसले. असा काय दोष होता माझा? कोणावर विश्वास ठेवू नये म्हणतात ते खरंच आहे. मी पण विश्वास ठेवला आणि त्यांनी माझा विश्वास घात केला.
आम्ही तेव्हा अहमनगरजवळील एका छोट्या गावात राहायचो. आमचं सुखी एकत्र कुटुंब होतं. पण ह्या दिवसानी ते विस्कळीत झालं. मला चांगलं आठवतं जवळच्या नातेवाईकाच्या घरी साखरपुडा होता. आजी आजोबा मोठे काका -काकू, आई - बाबा सगळे गेले. साखरपुडा दुसऱ्या गावाला होता त्यामुळे दोन- तीन दिवसांनी परत येणार होते. तेव्हा मी दहावीला आणि किरण दादा बारावीला होता. किरण दादा म्हणजे मोठ्या बाबांचा मुलगा. परीक्षा तोंडावर होती त्यामुळे आम्ही दोघे घरीच थांबलो. आमचं खूप जमायचं एकमेकानशी त्यामुळे भांडणाचा प्रश्न नव्हता.
त्या दिवशी सकाळीच घरातील सगळे मोठे निघून गेले. मी शाळेत आणि दादा कॉलेजला गेला. दुपारी सोबत जेवण करू असं ठरलं होतं आमचं. त्यानुसार मी बरा वाजता शाळेतून घरी आले. दादा अजून आलेला नव्हता. मी फ्रेश झाले आणि दादाची वाट बघत बसले. तितक्यात दार वाजले. मला वाटलं दादा आला असेल म्हणून मी दार उघडले. तर समोर दादा चे दोन मित्र होते. मी त्यांना चांगली ओळखत होते. ते नेहमी घरी येत. दादा आणि ते दोघे एकत्र अभ्यास करत . ते दोघे म्हणजे संजू आणि विजू पाटील. गावच्या पाटलाची जुळी मुलं.
" तारा, किरण नाही आला का अजून?" संजू
" नाही दादा. किरण दादा आला नाही अजून." तारा
" अगं आम्ही अभ्यास करायला आलो होतो. " विजू
" हो, पण दादा नाहीये घरात." तारा
" घरात कोणीच नाही का? " विजू
" हो सगळे बाहेर गावी गेलेत. तुम्ही दादा आला की या." तारा
" अगं आता इतक्या उन्हात परत ये जा करावं लागेल त्या पेक्षा आम्ही इथेच थांबतो. किरणची वाट बघत." संजू
" पण." तारा
" अगं आम्ही काय अनोळखी आहोत का? लहानपणा पासून एकत्र खेळलो आपण. त्यात संकोच कसला? विश्वास नाही का आमच्यावर?" विजू
" नाही नाही, तसं नाही दादा. या तुम्ही दोघे आत. दादा पण येईलच थोड्यावेळात." तारा
मला काही वावगं वाटलं नाही कारण, लहान पणापासून आम्ही सोबत होतो. म्हणून मी त्यांना घरात घेतलं. थोडावेळ दोघे शांत बसले.
" काय हा इतका उशीर लावतो आहे. तारा तुम्हा दोघांना बर्फी आवडते ना म्हणून आईने पाठवली आहे तुमच्या साठी. तो येईल तेव्हा खाईल आधी तू खा." असं म्हणत संजूने माझ्या हातावर डब्यातील बर्फीचा एक तुकडा ठेवला.
मला काय माहीत होतं त्यांच्या मनात काय आहे? मी नेहमी प्रमाणे ती बर्फी खाल्ली आणि तिथेच चूक झाली.
बर्फी खताच मी बेशुद्ध पडले आणि त्या दोन सैतानानी त्यांचा डाव साधला. किरण दादा यायच्या आत त्यांना त्यांचा हेतू साधायचा होता. घराचं दार लावून ते मला आतल्या खोलीत घेऊन गेले. आणि एखादे जंगली जनावर तुटून पडावे असे माझ्या वर तुटून पडले. मी बेशुद्ध होती त्याचं त्यानी पुरे पूर फायदा घेतला. मनसोक्त लचके तोडून झाल्यावर मला तशाच अवस्थेत ठेऊन त्यानी तिथून पळ काढला.
किरण दादा घरी यायची आणि त्या दोघांची घरातून पाळायची वेळ एकच झाली. घराचे दार उघडून बाहेर पडले तोच दादा त्यांना धडकला. पळता पळता त्यानी दादाला धमकावले.
" कोणाला सांगशील तर तुझा आणि तिचा जीव घेऊ."
किरण दादाला काही समजलेच नाही की, त्याचे मित्र असे का बोलले. पण ते इतक्या घाईत घरातून निघून गेले, ह्यावरून काहीतरी झालं आहे हे त्याच्या लक्षात आले. तो पळत आत आला. मी बेशुद्ध होते. पण माझी अवस्था बघून त्याला कळले की काय झाले आहे. तो रडत होता. त्यानी पटकन माझ्या अंगावर चादर टाकली. तोंडावर पाणी मारून उठवले. मला जाग आली तेव्हा माझे अंग अंग दुखत होते. जरी मी तेव्हा शुद्धीत नव्हते तरी माझी परिस्थिती बघून काय झालं आहे हे न समजण्या इतपत मी लहान नक्कीच नव्हते. आम्ही दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होतो. त्यानी कसे बसे मला उठवले. मी अंघोळ केली तेव्हा चेहेरा सोडला तर, त्यांच्या वासनेच्या खुणा अंगावर दिसत होत्या. दोन दिवस दादानी मला खूप समजावले आई बाबांना काही सांगू नकोस नाहीतर कोणाला जिवंत सोडणार नाही. ह्याची कल्पना दिली. त्यानुसार मी पण तयार झाले.
त्या दिवसा नंतर दादा सावली सारखा माझ्या सोबत रहायचा. पण माझे वागणे बदलले होते. कायम हसणारी मी कोणाशी बोलत नव्हते. एकटीच राहायचे. अशाच परिस्थितीत दहावीची परिक्षा दिली.
मनात खूप घुसमट होत होती. असेच चार पाच महिने गेले. घरच्यांना माझी काळजी वाटू लागली. आणि एक दिवस सगळं घरच्यांच्या समोर आलं. सगळ्यात आधी किरण दादाला खूप मार बसला. बाबांनी तडक पोलिसात तक्रार केली, पण काही उपयोग झाला नाही कारण पोलिस पण पाटलांचेच होते.
त्या नंतर काही दिवसांनी दादानी आत्महत्या केली. त्या आधी एक पत्र लिहिले होते.
" ताराच्या ह्या परिस्थितीला मी जबाबदार आहे. मी विश्वास केला त्या नराधमांवर. त्या दिवशी मला यायला उशीर झाला कारण, त्यांनीच माझी बाईक पंचर केली होती. ही गोष्ट मला नंतर आमच्या एका मित्राने सांगितली. त्यामुळे ताराचा दोषी मी आहे. म्हणून मे स्वतः ला संपवतो आहे. मला माफ करा. तारा मी तुझा गुन्हेगार आहे."
हे सगळं वाचताना अजिंक्य च्या डोळ्यात पाणी होतं. लहान पाणीच किती यातना सहन कराव्या लागल्या तारा ला ह्याची कल्पना सुद्धा त्याला करवत नव्हती.
पुढे बघू अजून काय आहे ताराच्या डायरीत.
क्रमशः
©वर्षाराज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा