मागील भागात आपण बघितले…
अजिंक्य सकाळी फाईल घेऊन घरी निघून गेला. दोन दिवसांनी ताराला देखील हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली. आता प्रतीक्षा होती कोर्टाच्या तारखेची. शेवटी तो दिवस उजाडला. अजिंक्य खूप सावध पणे ती फाईल घेऊन कोर्टात आला. कार्यवाही सुरू झाली. आरोपी म्हणून संजू आणि विजू उभे होते. त्यांना बघून ताराच काय तर, अजिंक्यच्या सुद्धा तळ पायाची आग मस्तकात गेली. दोन्ही पक्षाच्या वकिलांचे आरोप प्रत्यारोप सुरू होते.
आता पुढे….
आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेत परत परत ताराच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात होती. ताराने आज पर्यंत हे अनेकदा अनुभवले होते. बलात्कार करणारे ते दोघे निलज्ज पणे समाजात वावरत होते. आणि तारावर मात्र रोजच बलात्कार होत होता. कधी लोकांच्या बोलण्यातून, तर कधी नजरेतून. तरी सगळं सहन करत तारा मोठ्या धीराने सगळ्यांचा सामना करत होती. शेवटी विजय सत्याचाच होतो. आणि तसेच झाले. तारा जवळ असलेल्या एका मोठ्या पुराव्यापुढे सगळे आरोप खोटे ठरले. आणि निर्णय ताराच्या बाजूने लागला.
ताराच्या वकिलांनी पुराव्या ची ती फाईल न्यायधिशांकडे सुपूर्त केली. त्यात मानसोपचार तज्ञ ते स्त्रीरोग तज्ञ अशा सगळ्या डॉक्टरांचे रिपोर्ट्स होते. गुणसूत्र मिलनाचा अहवाल सुद्धा होता जो सगळ्यात मोठा पुरावा होता. किरण ने लिहिलेले सुसाईड नोट देखील होती. सगळं वाचून बघून न्यायधीशांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले. इतक्या लहान वयात तारावर अन्याय झाला. हे न्यायलयाने मान्य केले. संजू आणि विजू ह्यांना तारा सोबत केलेल्या अमानुष कृत्यासाठी, तिच्यावर केलेल्या जीव घेण्या हल्ल्यासाठी, किरणला आत्महत्येसाठी प्रवृत्त कऱ्यण्याच्या गुन्ह्यात आजीवन कारावासाची, जामीन मिळू न शकणारी म्हणजे ज्याला आपण नॉन बेलेबल म्हणतो ती शिक्षा झाली. सोबतच ताराने आणि तिच्या कुटुंबीयांनी आजवर जो काही मानसिक त्रास सहन केला, त्याची तुलना पैशात होणार नाही तरी सुद्धा त्यांच्या झालेल्या मान हानी साठी रुपये दहा लाख इतकी रक्कम आरोपींनी दयावी असा फर्मान काढला.
संजू आणि विजूला अटक झाली. त्यांना असं बघून ताराला एक वेगळच समाधान मिळाले. तिला आणि तिच्या भावाला न्याय मिळाला होता. न्यायालयाचा निर्णय ऐकून तारा तिथेच बसून खूप रडली. अखेर तिची लढाई संपली होती. तब्बल पाच वर्षांच्या प्रतिक्षे नंतर तिला न्याय मिळाला होता आणि ह्या सगळ्या संघर्षात तिच्या घरच्यांची खंबीर साथ तिला होती. अजिंक्यचे प्रेम आणि विश्वास तिला हिम्मत देत होते.
आता अजिंक्य आणि तारा आता कायम सोबत येणार होते. शेवटच्या वर्षाची परीक्षा संपली आणि त्यांचा साखरपुडा झाला.
" काका काकू तुम्ही ताराची अजिबात काळजी करू नका तिच्या डोळ्यात कधी अश्रू येणार नाहीत. आजवर खूप सहन केले तिने. पण आता ती फक्त सुख अनुभवेल. ज्यावर तिचा हक्क आहे. मी तुम्हाला वचन देतो." साखरपूड्याच्या दिवशी अजिंक्यने रमाताई आणि श्रीरंगरावांना वचन दिले.
त्याच्या बोलण्याने रमाताई आणि श्रीरंग राव भारावून गेले. इतकं सोसलेल्या ताराला अखेर तिच्या हक्काचं प्रेम मिळणार होते.
साखरपुडा झाला. अजिंक्य आणि ताराने पुढील दोन वर्ष पुढील शिक्षण घेतले. त्या दोन वर्षात अजिंक्यने ताराला भर भरून प्रेम दिले. एक प्रियसी म्हणून तिला त्या सुखाचा मनसोक्त आस्वाद घेऊ दिला. त्याच्या प्रेमात तारा बुडाली होती. भूतकाळ विसरणे सोपे नव्हते पण अजिंक्यने दिलेल्या प्रेमामुळे तिच्या जखमांवर खिपली बसत होती. एकमेकांच्या सहवासात दोघे हरवून जात. सोबतच दोघांनी प्रामाणिक पणे आणि मन लावून अभ्यास केला. त्याची फलश्रुती म्हणून दोघे उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.
अजिंक्य आणि ताराला मिळालेल्या यशामुळे त्यांना लगेच चांगली नोकरी मिळाली. आणि त्यांनी लगेच लग्नं करण्याचा निर्णय घेतला.
पण अजिंक्यच्या डोक्यात काही वेगळेच सुरू होते. राहू राहून त्याला ताराच्या डायरीत लिहिलेल्या पत्याची आठवण येत होती. मध्यंतरीच्या काळात तो दोन तीन वेळा त्या पत्यावर जाऊन आला. दुरूनच त्यानी त्यांना बघितले. साखरपुड्याला सुद्धा ते त्याला भेटले होते. त्याला त्यांच्याशी काही बोलायचे होते. त्याच्या मनात काय चालू आहे ह्याचा थांगपत्ता त्याने ताराला लागू दिला नाही.
घरात लग्नाची तयारी सुरू झाली. रमाताई, श्रीरंगराव, प्रतिभाताई आणि अजिंक्यचे बाबा सगळेच तयारीला लागले.
अजिंक्यच्या अनेक नातेवाईकांचा ह्या लग्नाला विरोध होता. कारण ही तसेच होते. आपल्या समाजात बलात्कारित मुली कडे सहानुभूतीने बघितले जाते पण तिचा स्वीकार मात्र कोणी करत नाही. तिला जगण्याची दुसरी संधी कोणी देत नाही. इथे ही तेच होते. अजिंक्य हँडसम होता. शिवाय चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता. त्याला त्यांच्या जातीची, ओळखीतली चांगली सुंदर मुलगी मिळेल असे त्यांचे म्हणणे होते.
पण अजिंक्य आणि त्याच्या घरच्यांनी कोणाचेच न ऐकता ताराला स्वीकारले होते. ह्या गोष्टीचा अनेकांना राग होता. तसेच ताराकडे सुद्धा काही जवळचे नातलग सोडले तर, इतर कोणी येणार नव्हते कारण तारा किंवा तिच्या घरच्या लोकांशी संबंध ठेवून त्यांना त्यांची इज्जत घालवायची नव्हती. अशा लोकांशी रमाताई आणि श्रीरंगरावांनी कधीच संबंध तोडले होते. ताराच्या लढाईला सुद्धा ह्या लोकांचा विरोध होता. " आधीच लाज गमावली पोरीने, आता ती उघड्यावर आणून अजून बदनामी करून घेत आहात. त्या पेक्षा गप्प बसा आणि लग्नं करून दया तिचं त्यातल्याच एकाशी. ती मुलं अशी वागली कारण तारानेच त्यांना काहीतरी खून केली असेल म्हणून असं झालं." अशा विचार सरणीची ही लोकं होती.
अर्थात दोघी पक्षा कडून काही मोजकेच लोक लग्नाला येणार होती. तरी सुद्धा लग्नं हे थाटात करण्याचा निर्णय घेतला. विशेषतः ताराच्या आवडीचा विचार करून सगळी तयारी करण्यात आली. शेवटी तो दिवस उजाडला ज्याची प्रतीक्षा अजिंक्य आणि तारा दोघांना होती. आज ते कायमचे एक होणार होते. मनाने ते कधीच एक झाले होते पण आता देवाच्या साक्षीने सात फेऱ्यांच्या बंधनात ते अडकणार होते.
"मारून रंगाची डीझायनर साडी. कुंदन हार, कानातले, बिंदी, नाकात मोठी नाथ. गोरी गोरी कामनीय बांध्याची. हळदीने गोरीकांती अजूनच खुलून आली होती. लाल ओठ, टपोरे डोळे. हातावरच्या मेहेंदीवर अजिंक्यच्या प्रेमाचा रंग चांगलाच चढला होता. अशी ही नाजूक कळी समोर आली आणि अजिंक्य तिला बघतच राहिला. तारा सुंदर आहे पण आज तिच्या रूपाला काही वेगळीच बहार होती. आत्ताच तिला मिठीत घ्यावं असे अजिंक्य ला वाटतं होते. आजूबाजूला कोण काय बोलते आहे ह्या कडे अजिंक्य चे लक्ष नव्हते. तो तर त्याच्या तारा च्या मादक सुंदरतेची न्याहळत होता. त्याच्या मनात संगीत वाजत होते.
'छू लेने दो नाजुक होठों को
कुछ और नहीं है जाम है ये
छू लेने दो नाजुक होठों को
कुछ और नहीं है जाम है ये…'
तितक्यात प्रतिभा ताईंनी त्याला चिमटा काढला.
" ती आता आपल्या कडेच येणार आहे. हनिमूनला गेलात की मग बघत बस तिला. पण आधी लग्नं कर. पंडितजी वाट बघत आहेत." असं म्हणत प्रतिभा ताई गालात हसला. आणि त्यांच्या चिमट्या मुळे अजिंक्य भानावर आला.
" काय गं आई, लागलं ना." म्हणत गालातच हसला. मनात मात्र लाडू फुटत होते. गाल लाजून गुलाबी झाले होते.
गुरुजींनी मंगलाष्टके म्हणायला सुरू केली. आणि सावधान म्हणत दोघांनी एक मेकांच्या गळ्यात माळ टाकली. बाहेर फटाके फुटत होते. वाजंत्रीने नादघोष केला. तारा आणि अजिंक्यने एकच वेळेस त्या एका व्यक्ती कडे बघितले. निरागस ती व्यक्ती त्यांना सोबत बघून नाचत होती. तितक्यात सगळ्यांनी आजू बाजूला गर्दी केली. फोटो काढले. सप्तपदी, फेरे, होम, कन्यादान सगळं पार पडले. तारा निघताना खूप रडली.
अजिंक्यच्या घरी ताराच्या गृह प्रवेशाची जय्यत तयारी केली होती. वाजत गाजत ताराने माप ओलांडले. कुंकवाच्या पावलांनी फुलांच्या पाकळ्यांवर नाजूक पाय ठेवत तारा घरात आली.
दोन तीन दिवसात लग्ना नंतरचे विधी आटोपून तारा आणि अजिंक्य हनिमून साठी निघून गेले. ह्या दिवसाची अजिंक्य आतुरतेने वाट बघत होता. साखरपुड्या नंतर दोघे खूप भेटले पण त्यांनी त्यांच्या मर्यादा पार केल्या नाहीत. त्यांच्या भेटीत फक्त निखळ प्रेम होते. पण आज ते प्रेम फुलणार होते. अजिंक्य आणि तारा एक होणार होते.
रात्री अजिंक्यने ताराला हळूच जवळ घेतलं. परत त्याच्या मनात गाणं वाजत होते.
छू लेने दो नाजुक होठों को
कुछ और नहीं है जाम है ये
छू लेने दो नाजुक होठों को
कुछ और नहीं है जाम है ये…
त्यानी तिच्या ओठांवर हळूच त्याचे ओठ टेकवले. त्याच्या प्रेमळ स्पर्शाने तारा शहारली आणि सुरू झाला दोन जीवांच्या मिलनाचा प्रवास. त्या प्रवासात दोघे चिंब भिजत होते. इतक्या वर्षांची प्रतीक्षा आज संपली होती. अजिंक्यतारा एक झाले.
अजिंक्य ताराच्या साडीला अजूनही कवटाळून बसला होता. त्या प्रेमाचा अनुभव आज सुद्धा त्याला होत होता. सकाळ कधी झाली त्याला कळलेच नाही. तितक्यात दार वाजले आणि अजिंक्य ताराच्या आठवणीतून बाहेर आला.
त्याने दार उघडले. समोर किरण होता.
पुढील भागात बघू. किरण कसा काय आला तिथे? कोण आहे हा किरण?
क्रमशः
© वर्षाराज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा